आत्ता कुठे कॉलेज सुरू होतंय.. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या ब्रँड न्यू अवतारासाठी खरेदीची तयारी करायलाही सुरुवात झालेय. कॉलेजमध्ये आपलं स्टाइल स्टेट्मेंट काय असेल, आपण कशी आणि काय फॅशन करायची याचे प्लॅनिंग सुरू होते.  या सगळ्याची जास्त उत्सुकता तरुणांमध्ये पाहायला मिळते. त्यातच रिमझिमत्या पावसाचंही फायनली आगमन झालेलं आहे. पावसाळा हा ऋतू तसा पाहायला गेला तर फॅशनच्या दृष्टीने किंचित गरसोयीचा. म्हणजे साचलेलं पाणी, कोसळणारा पाऊस, चिखल, छत्रीचं लोढणं सावरत फॅशन सावरणं जरा मुश्कीलच होतं नाही का? पण पावसाचा मनमुराद आनंद घ्यायचा असं ठरवल्यावर मग कसली चिंता सांगत्येय सीमा महांगडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसातली हट के क्लोदिंग
मान्सूनच्या या फ्रेश मूडमध्ये भन्नाट प्रकारच्या रंगांचे प्रयोग, मिक्स अँड मॅच, कॉण्ट्रास्ट असे सगळे हमखास ट्राय करता येईल. सध्या कॉलेजमधील मुलांच्या-मुलींच्या  फॅशनमध्ये नवीन बदल झालेला दिसतो. पॉप पँट्स, चुणीदार आणि बलून ट्राउझर्स, थ्री-फोर्थ आणि हाफ पँट असं बरंच वैविध्य बॉटम वेअरमध्ये उपलब्ध आहेत. त्यातील आकार, प्रकार, रंग आणि डिझाइन यांचा झक्कास मेळ साधता येतो. यावर कॅज्युअल टी-शर्ट किंवा फॉर्मल शर्टवर बिनबाह्य़ांचं प्लेन जॅकेट असं कॉम्बिनेशन मस्त दिसतं. वजनाने हलके, पटकन वाळतील असे सुटसुटीत कपडे पावसाच्या दिवसात केव्हाही उत्तमच ठरतात. शिफॉन कुत्रे अगदी लगेच सुकत असल्यामुळे पावसाळ्यात ते फारच उपयोगी पडतात. साधारण टिपिकल डेनिम, पेस्टल किंवा लाइट रंगाचे बॉटम्स आणि तितकेच कलरफूल टॉप हे उत्तम. थ्री फोर स्लिव्हज, स्लिव्हलेस, स्पगेटी असल्यास हादेखील उत्तम पर्याय आहे.
जीन्स, ट्राउझर्स या नेहमीच्या प्रकारांबरोबरच अलीकडे बलून ट्राउझर्स, िरकल ट्राउझर्स, चट्टेरी-पट्टेरी थ्री फोर्थ असे विविध प्रकार आणि पॅटर्न वापरतात. पावसाळ्यासाठी हे एकदम उपयुक्त असल्याने त्यावर स्मार्ट टॉप्सशी मॅच करून स्मार्ट लूक आणता येऊ शकतो. पण हे सगळं घेताना लवकर वाळण्याच्या दृष्टीने निवड करावी. शिफॉन, क्रेप, पॉली नायलॉन यांसारखे सिंथेटिक कपडे कधीही योग्य. काही तरी ‘हट के’ च्या शोधात असलेल्यांनी सलवार, पॅण्ट, हॅरम्स, केप्रीज इत्यादी कंबरेखाली घातल्या जाणाऱ्या कपडय़ांच्या प्रकाराचे रंग घालावेत त्यामुळे एक वेगळा लूक मिळू शकतो आणि ते स्टायलिशही दिसतात. पावसाळ्यात लाँग स्कर्ट्स वापरणं टाळलं आणि त्याऐवजी गुडघ्यापर्यंतच्या लांबीचे स्कर्ट्स वापरले तर उत्तम आणि सोयीचे ठरू शकेल. त्यावर शॉर्ट टॉप्स खुलून दिसू शकतात.
पावसाळ्यात नेहमीसारखे ट्रेंडी वेअर्स नाही वापरले, तरी पेहेरावात वेगवेगळ्या रंगांचा वापर केला, तर तो चेंज चटकन लक्षात राहू शकतो आणि लक्ष पण वेधून घेतो.

पावसाळ्यातील इतर अ‍ॅक्सेसरीज
पाऊस म्हटल्यावर सगळ्यात आधी आठवण येते ती छत्रीची. लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या अशा ब्राइट रंगांच्या छत्र्यांची निवड पावसाळ्याच्या दिवसात सर्रास होताना दिसते.  थ्री फोल्ड छत्र्या छोटय़ा पर्समध्ये सहज मावतात. त्यामुळे तरुणींना त्या सोयीस्कर पडतात. छत्र्यांबरोबरच कलरफुल असे िवडचिटर पण दिसून येतात. यांचा जास्तीत जास्त उपयोग लोक करताना दिसून येतात त्याचे कारण म्हणजे छत्र्यांसारखं त्यांना धरावं लागत नाही. त्याच्या जोडीला पावसाळ्यात तरुण-तरुणी आणि एकंदरीत सगळेच चामडय़ाच्या बॅगा कपाटात ठेवून त्याला ऑप्शन म्हणून साध्यातल्या बॅगा विकत घेतात. सध्या प्लॅस्टिकच्या पारदर्शक बॅगा आल्या आहेत. वॉटरप्रूफ बॅग्समध्ये ट्रान्स्परंट अशा किंवा कार्टून डिझाइन्स असलेल्या बॅग्जची चलती आहे. या बॅगा दिसायलाही ट्रेण्डी आहेत. तसंच त्या हव्या त्या रंगात, हव्या त्या आकारात सहज उपलब्ध होऊ शकतात. रेनप्रूफ कलरफुल बेल्ट्स, बॅग्स , घडय़ाळं, मोबाइल कव्हर्सही पावसाळ्यासाठी बाजारात सहज उपलब्ध होतात. आपल्या बॅगेतील छोटय़ा छोटय़ा वस्तूंसाठीही ‘हट के’ कलर कॉम्बिनेशन्स मिळू शकतात.
काय मग आहात ना तयार पावसासाठी आणि पावसाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी ते पण आपली फॅशन सांभाळून!

फोटो : आशिष सोमपुरा
मॉडेल : भक्ती राठोड
मॉडेल : रोझे वालिया

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon fashion tips