या प्रकारचा मेकअप सकाळी खूप छान दिसतो. कमीत कमी फाऊंडेशन व वॉटरप्रूफ मस्कारा डोळ्याला लावावा. गालाला हलकेच रंगवा व ओठांना कोरल लिपग्लॉस लावा.
द नियॉन इफेक्ट : पावसाळ्यात आपली त्वचा डिहायड्रेटेड असणे आवश्यक असते. तसेच वॉटरप्रूफ मेकअप करणे पण तेवढेच महत्त्वाचे. डोळ्यांना जास्त मेकअप न करता साधा वॉटरप्रूफ मस्काऱ्याचा एक कोट लावा. गालांना पण थोडाच मेकअप करा. ओठांना मात्र ब्राइट नियॉन रंगाची लिपस्टिक लावा. हा मेकअप दिवसभर टिकेल.
फंक अॅण्ड फन :
डोळ्याभोवतालची काळी वर्तुळे किंवा चेहऱ्यावरचे काळे डाग झाकण्यासाठी चेहऱ्याला कन्सिलर लावा. त्याचबरोबर रंगीबेरंगी आयपेन्सिलही लावू शकता. डोळ्यांच्या कोपऱ्याला स्मोकी लुक देऊ शकता. निळा, हिरवा, गुलाबी व नारंगी रंगांचे कपडे अशा मेकअपवर शोभून दिसतात .गालाला पण हलकाच मेकअप करा व ओठांनादेखील थोडीशी लिपस्टिक लावावी.
स्मोक इन हॉट : हा मेकअप संध्याकाळसाठी आहे. डोळ्यांच्या पापण्यांवर, डोळ्याखाली व डोळ्याच्या कोनांना डार्क ब्राऊन रंगाची आयश्ॉडो लावावी. तुम्ही हिरव्या रंगाचा प्रयोगदेखील करू शकता. मान्सून स्पेशल हिरवा रंग हा या वर्षांचा नवीन रंग आहे. डोळ्यांच्या पापण्यांवर किंचित व्हाइट गोल्ड शिमर वापरा. ज्यामुळे डोळ्यांचा मेकअप उठून दिसेल. अधिक उठावदार बनवण्यासाठी काळ्या रंगाचे वॉटरप्रूफ काजळ व मस्कारा लावावा. हे केल्यास डोळे खूप सुंदर दिसतात. हलक्या गुलाबी रंगाचे रुज गालाला लावावे. तसेच फिक्या रंगाची लिपस्टिक लावल्यास हा मेकअप खुलून दिसेल.
मान्सून मेकअप ट्रेंड्स
या प्रकारचा मेकअप सकाळी खूप छान दिसतो. कमीत कमी फाऊंडेशन व वॉटरप्रूफ मस्कारा डोळ्याला लावावा. गालाला हलकेच रंगवा व ओठांना कोरल लिपग्लॉस लावा.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-06-2013 at 12:54 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon makeup trends