तेजश्री गायकवाड

व्हेगन हा शब्द आता बऱ्यापैकी भारतातही वापरला जाऊ लागला आहे. खरं तर व्हेगन हा शब्द आत्तापर्यंत आपल्याला खाद्यपदार्थापुरता परिचित होता. व्हेगन म्हणजे कुठल्याही प्राण्यावर कुठल्याच प्रकारचा अत्याचार न करणे. जे फक्त व्हेगन पदार्थच खातात ते कोणतेही दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी वगैरे काहीच खात नाहीत. हे झालं फक्त खाण्यापुरतं, पण काही लोकांनी संपूर्ण व्हेगन जीवनशैली स्वीकारली आहे. ते प्राण्यांपासून बनवलेल्या कोणत्याही गोष्टी वापरत नाहीत. हेच हेरून फॅशन बाजारात आता व्हेगन फूटवेअरचा ट्रेण्ड आला आहे.

Bipin preet singh Success Story
Success Story : आठ लाखांच्या बचतीतून सुरू केला व्यवसाय अन् उभी केली करोडोंची कंपनी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Success story of Richa Kar the owner of Zivame company her family was ashamed from her business where she earned crores
ज्या व्यवसायाची जन्मदात्या आईला वाटायची लाज त्यातूनच कमावले कोटी, वाचा टीका झुगारून यश मिळविणाऱ्या उद्योजिकेचा प्रेरणादायी प्रवास
Kanguva Box office collection Day 1
Kanguva: ३५० कोटींचे बजेट असलेल्या ‘कंगुवा’ची निराशाजनक सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
author samantha harvey wins the booker prize 2024 with orbital novel
समांथा हार्वे यांच्या ‘ऑर्बिटल’ला बुकर ; अंतराळावरील कादंबरीचा पहिल्यांदाच सन्मान

भारतातील काही कंपन्या व्हेगन फूटवेअर विकतात आणि ग्राहकही हे फूटवेअर आवर्जून मिरवतात. याचं कारणही अगदी सरळ आहे. आपण वापरत असलेलं फूटवेअर कोणत्याही प्राण्याला इजा न करता बनवलेलं आहे हे त्यांना माहिती असतं. व्हेगन शूज हे बाकीच्या सर्वसाधारण शूजप्रमाणेच असतात, पण ते बनवण्याची पद्धत मात्र वेगळी असते. हे शूज बनवताना कोणत्याही प्राण्यांच्या चामडय़ाचा वापर केला जात नाही. हे शूज बनवण्यासाठी रिसाइकल्ड पॉलिस्टर मटेरिअल आणि अन्य काही घटक एकत्रित केले जातात. भारतात व्हेगन फूटवेअर बनवणारे अनेक ब्रॅण्ड्स आहेत. टॉप ब्रॅण्ड्समध्ये मंकस्टोरी, पायओ, व्हेज शूज, नोपेले, सौवैत, मलाय असे अनेक ब्रॅण्ड व्हेगन फूटवेअरसाठी लोकप्रिय आहेत.

व्हेगन फूटवेअरच्या ट्रेण्डबद्दल बोलताना ‘पायओ’ या ब्रॅण्डच्या संस्थापक श्वेता निमकर सांगतात, ‘‘एक प्राणिप्रेमी आणि एकाधिक प्राणी पुनर्वसन (मल्टिपल अ‍ॅनिमल रिहॅबिलिटेशन) एनजीओचे समर्थक या नात्याने आम्ही हा ब्रॅण्ड लाँच केला. फॅशन कोणाच्याही जीवाच्या किमतीवर विकत घेतली जाऊ शकत नाही, हे एक भक्कम मूलभूत तत्त्व आहे. आमचा त्यावर विश्वास असून याच तत्त्वाच्या आधारे आमच्या ब्रँडची स्थापना झाली.’’ खऱ्या लेदरचे उत्पादन करताना होणारे गैरप्रकार आणि गैरवर्तनाबद्दल ग्राहकांना माहिती मिळत असते. त्यामुळे व्हेगन पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या लेदरचं मार्केट वाढतं आहे. हा पर्याय पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक असणाऱ्या फॅशनप्रेमींसाठी नक्कीच एक स्वच्छ आणि आनंदी पर्याय आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्राण्यांचे कातडे न कमावता व्हेगन पद्धतीने फूटवेअर बनवताना नक्की कोणते घटक वापरले जातात, याबद्दलही श्वेता यांनी सविस्तर माहिती दिली. ‘‘आम्ही कृत्रिम लेदर ते भांगेच्या (Hemp) झाडापासून आणि तागापासून अन्य विविध प्रकारच्या घटकांचा वापर करून हे फूटवेअर बनवतो. आम्ही सध्या अननस आणि कॅक्टससारख्या इको लेदरचीही कार्यक्षमता आणि टिकाऊपणा किती आहे, याचा अभ्यास करत आहोत.’’

व्हेगन फूटवेअर हे बाकीच्या फूटवेअरप्रमाणेच दिसतात. या फूटवेअरमध्येही वेगवेगळे रंग, डिझाईन वापरता येतात. याची किंमत १ हजारापासून सुरू होते. हे व्हेगन लेदर अधिक टिकाऊही असतात, त्यामुळे किमती जास्त असल्या तरी दीर्घकाळ टिकणारे असे हे फूटवेअर आहेत.

व्हेगन संकल्पनेची सुरुवात कशी झाली?

व्हेगन या संकल्पनेची सुरुवात १९४४ साली झाली होती. ही संकल्पना डोनाल्ड वॉटसन यांनी सुरू केली. त्यांनी युकेमध्ये व्हेगन सोसायटीह्णची स्थापनाही केली होती. ते स्वत: शाकाहारी होतेच, पण डेअरी उद्योगामध्ये प्राण्यांचा होणारा छळ त्यांना सहन न झाला नाही. आणि म्हणून त्यांनी एक नवी संकल्पना जन्माला घातली. डेअरी उत्पादनांचा वापर न करणारे शाकाहारी म्हणजेच व्हेगन ही ती संकल्पना. आता या बाबतीत नित्यनवे प्रयोग होत असून खाद्यपदार्थापासून ते चपलांपर्यंत अनेक वस्तू व्हेगन पद्धतीने बनवल्या जाऊ लागल्या आहेत.