‘ती’ म्हणजे मायेचा गोडवा, प्रेमाचा शिडकावा.. ‘ती’ असते ममता, सहनशील, त्यागी, वात्सल्याची मूर्ती.. ‘ती’ असते मत्रीचं दालन, शिस्तीचं पालन.. ‘तिची’ सतत जन्माच्या क्षणापासून ते मृत्यूच्या वेदनेतही असते सोबत.. लहानपणापासूनची मनात कोरलेली एक प्रतिमा ‘तिची’च.. आपुलकीची.. ‘तिच्या’ आश्वस्त असण्याची.. आपल्या अस्तित्वाला पुरून उरणारी ‘ती’.. मनातलं ओळखणारी मनकवडी.. ‘तिचा’ हात डोक्यावरून फिरल्यावर मिळणारी मन:शांती नि ‘तिच्या’ ऊबदार साडीच्या गोधडीत लागणारी निवांत झोप!! कधीकधी मात्र ‘ती’ जाम पकवते.. डोकं सॉलिड पिकवते.. आपल्याला समजूनच नाही घेत.. आपलंच म्हणणं खरं करते.. ‘तिचा’ सारखा सूचनांचा भडिमार नि अनंत काळची काळजी.. करते आपल्याला काही वेळा त्राही भगवान.. क्वचित माय-लेकरांत उभा राहतो ‘स्वत्वा’चा अतिविषारी नाग.. एकदम फणा काढलेला.. मग दोघांत निर्माण होतो द्वेष.. पण त्यातूनही माय-लेक तरतात ते केवळ त्या एकमेव अनादी अनंत काळ अतूट राहिलेल्या मायेच्या धाग्यानं!
मे महिन्याचा दुसरा रविवार केला गेलाय खास ‘तिच्या’साठी मुक्रर.. ‘तिच्या’ प्रेमाचा, तिच्या ‘आईपणा’चा सन्मान करण्यासाठीचा.. त्या दिवशी होतं, जोरदार सेलिब्रेशन..‘तिच्या’ थोरवीच्या गोष्टी येतात पानोपानी छापून.. मुलाखती घेतल्या जातात भरभरून.. माय-लेकांच्या भावना होतात मोकळेपणी व्यक्त.. एरवीही आपण शेअर करतोच आपल्या फििलग्ज ‘तिच्या’शी.. लाडीगोडीतली भांडणं.. हव्या त्या गोष्टी मिळवण्यासाठी मारलेला मस्का-चस्का.. बरेचदा ‘तिला’ गृहीत धरणं नि ‘इतना तो चलता हैं’, असं आपलं म्हणणं.. आपला हा सारा आगाऊपणा नि अरेरावी सहन करत आपल्यावर सतत डोळस प्रेम करणाऱ्या आपल्या ‘आई’ला नि ‘आईपणा’ची समृद्ध जाणीव उराशी बाळगून वावरणाऱ्या प्रत्येकालाच ‘मदर्स डे’च्या हार्दकि शुभेच्छा!
आपण ‘तिला’ माहीत असतो.. आपलं मन-स्वभाव, आपल्या आवडी-निवडींसकट.. पण ‘ती’आपल्याला किती माहीत असते? तेच शोधण्यासाठी आम्ही काही जणांना आईविषयी विचारलं. आईची आवड सांगताना काहींनी अगदी लगेच थेटपणे ती जाहीर केली, तर काहींना जरा वेळच लागला. विचार करावा लागला. काहींनी तर चक्क आईला विचारून सांगतो, असं सांगितलं. आईच्या आवडत्या हीरोचं नाव विचारल्यावर बहुतेकांची दांडी गुल झाली. आपण आपल्या आईला किती ओळखतो, हे बघण्यासाठी तुम्हीसुद्धा हा एक्झरसाईज करायला हरकत नाही.
गौरी फणसे
अश्विनी बेहरे
रुपाली जोशी
आवडती डिश अर्थातच – मी केलेले सगळे पदार्थ. आईचा आवडता छंद, माझ्यामते, कॉम्युटरवर काम करणं, आवडती मालिका – सीआयडी आणि मराठीमध्ये अस्मिता. तिला पावसाळा आवडतो. आवडतं गाणं म्हणाल तर तिला माणिक वर्माची सगळी गाणी आवडतात. आवडतं ठिकाण विचारल्यावर मला वाटलं, आम्ही नेहमी जातो त्यापैकी एक असेल. पण आईला विचारलं तेव्हा तिने पॅरिस सांगितलं. मला ते माहीतच नव्हतं. माझ्यासाठी आई म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड. (पण अजून या बेस्ट फ्रेंडची सगळी आवड- निवड मला माहिती नाहीय तर!)
मयूर सोमण
माझ्यालेखी आई म्हणजे – प्रेम नि माया
श्रीयांस कानिवदे
आवडती डिश – मुगाचा हलवा, आवडता छंद – गृहसजावट, आवडती मालिका – महाराणा प्रताप, आवडता ऋतू – पावसाळा, आवडतं गाणं असं एक नाही सांगता येणार. पण ६० ते ७० च्या दशकामधली गाणी तिला आवडतात. तिचं आवडतं ठिकाण – केरळ
माझी आई म्हणजे माझं सर्वस्व!
तन्मय तोरसकर
आवडतं गाणं.. तिला आशा भोसलेंची सगळी गाणी आवडतात. आवडतं ठिकाण – कोकण. माझी आई म्हणजे माझी फेव्हरेट फ्रेण्ड, एक स्ट्राँग बॉिण्डग!