आपल्या चतुरस्र अभिनयाने वेगळा ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला भेटण्याची, तिच्याशी थेट संवाद साधण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून वाचकांना मिळणार आहे. नाटक, चित्रपट, मालिका अशा तीनही माध्यमांतून अभिनेत्री म्हणून लीलया वावर करणारी मुक्ता आता नाटय़निर्माती बनली आहे. तिच्या या नव्या भूमिकेविषयी आणि आतापर्यंतच्या प्रवासाविषयी तिच्याकडून ऐकायची संधी मिळणार आहे. या निमित्तानं ‘व्हिवा लाउंज’ची मैफल प्रथमच ठाण्यात रंगणार आहे. टिपटॉप प्लाझा या कार्यक्रमाचा व्हेन्यू पार्टनर आहे.
कधी : शुक्रवार, ७ मार्च, कुठे : टिप-टॉप प्लाझा, एल.बी. एस. मार्ग, ठाणे (प), वेळ : दुपारी ३.४५ वा.

Story img Loader