आज जरा हवेत गारवा आहे, बाहेर छान पाऊस आहे. किती छान वाटतंय, आता हे छान वाटणं तुमच्या नेलपॉलिशमधूनही व्यक्त होऊ शकतं. टेम्परेचरनुसार रंग बदलणारं नेलपॉलिश हा नवा फंडा नुकताच बाजाराच आलाय. म्हणजे बाहेरचं टेंपरेचर वाढेल तसतसं तुमचं नेलपेंट लाईट कलरचं होत जाणार. थंडावा असेल तर डार्क काळसर शेडचं नेलपेंट उन्हात गेल्यावर हळू हळू रंग बदलतं. अगदी डार्क रेड, ब्लड रेड पासून पिंक शेडपर्यंत वैविध्य यामधून दिसेल.
ऑर्ली कंपनीनं हे कलर चेंजिंग नेल पॉलिश नुकतच बाजारात आणलंय. हा खरं तर नेल कलर नसून टॉप कोट आहे. म्हणजे कुठल्याही एका बेसिक कलर कोटवर या नेल पॉलिशचा टॉपकोट दिला की, रंग बदलणारं नेलपेंट तयार होतं. विशेष म्हणजे हा टॉपकोट रंगहीन आहे तरीही ही रंगाची गंमत त्यातून साधली जाते.
यामध्ये टॉपकोटमधून खरी किमया साधली जात असल्यानं, मूळात ज्या शेडचं नेलपेंट लावलेलं असेल ते कायम राहील. यामध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. बॉडी टेंपरेचरनुसार शेड बदलणारा कोट, बाहेरच्या नैसर्गिक प्रकाशात गेल्यानंतर रंग बदलणारं पॉलिश, सूर्यप्रकाशात शेड बदलणारं पॉलिश आणि असे आणखी काही पर्याय देण्यात आले आहेत. यापूर्वी रंग बदलणारे मूड कलर्स बाजारात आलेले होते. आता मूड कलर्स नाही तर टेंपरेचरनुसार रंग बदलणारा हा वेगळा फंडा आणला गेला आहे.
नवं काही हवं : टेम्परेचरनुसार रंग बदलणारं नेलपेंट
आज जरा हवेत गारवा आहे, बाहेर छान पाऊस आहे. किती छान वाटतंय, आता हे छान वाटणं तुमच्या नेलपॉलिशमधूनही व्यक्त होऊ शकतं.
First published on: 19-07-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nailpent changing as per temperature