गणेश उत्सवानंतर सर्वाना वेध लागलेत ते नवरात्रोत्सवाचे. नऊ दिवस साजरा होणारा हा नवरात्रीचा सण म्हणजे गुजरातचा गरबा आणि पश्चिम बंगालची दुर्गापूजा यांचा संगम असतो. दोन समाजांपर्यंत गरबा-दांडिया मर्यादित न राहता आजकाल तो गल्लीगल्लीत खेळला जातो. आता नवरात्रीचे नऊ दिवस जागवायचे तर गरबा-दांडियाशिवाय दुसरा कोणता पर्याय नाही. कारण, गरबा-दांडियाच्या ठेक्यावर तर तरुणाईची पावलं थिरकतात त्यामुळे दुर्गापूजेपेक्षाही गरबा-दांडियाला प्रचंड महत्त्व आले आहे. तरुणाई तर जणू या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असते. तरुणाईसाठी तर उत्सव हे जणू जल्लोष आणि त्यांचा उत्साहच आहे. गणेश उत्सवाचा उत्साह पुढे तसाच ओसांडून वाहतो ते नवरात्रोत्सवापर्यंत. तसा उत्सव कोणताही असो पण तरुणवर्गाने फॅशन ट्रेडला प्रथम प्राधान्य दिले आहे. अर्थात बदलत्या उत्सवांसोबत फॅशन ट्रेडही बदलतो. शेवटी तरुणवर्ग आपल्या लुक आणि फॅशनबद्दल फार कॉन्शियस आहे. मग नवरात्रोत्सवाला फॅशनचा टच कसा नसेल? अगदी नवरात्रीच्या नऊ दिवसांत कोणत्या रंगाचे कपडे घालायचे हेपण आधीच ठरलेले असते. नवरात्रीच्या प्रत्येक नऊ दिवसांसाठी एक रंग असतो आणि तरुणाईदेखील त्याच रंगांमध्ये रंगलेली असते. मुंबईसारख्या शहरात तर गरब्याचं मदान म्हणजे भलामोठा रॅम्पच. मदानात दाखल होताना सर्वाचं लक्ष आपल्याकडे जावं, आपण सर्वामध्ये उठून दिसावं ही सर्वच तरुणवर्गाची इच्छा असते. या रॅम्पवर ट्रॅडिशनल, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्या प्रकारची फॅशन पाहण्यास मिळते.
मुंबईसारख्या शहरात तर या दिवसात गरबाच्छुक मंडळींच्या उत्साहाला जे काही उधाण येतं त्याची सुरुवात नवरात्रीचा पेहराव आणि दागिन्यांच्या खरेदीपासून होते. नवरात्र उत्सवाचे वेध लागताच बाजारात पण एम्ब्रॉयडरी केलेल्या चनिया-चोली, विविध प्रकारचे घागरा चोली, मुन्नी स्टाईल घागरा-चोली, मेटलचे दागिने, मुलांसाठी केडीयू ड्रेसेस असे भरपूर प्रकार उपलब्ध झाले आहेत.
तरुणींसाठी दांडियासाठीचा पेहराव म्हणजे मस्त घेरदार घागराचोली आणि त्यावर पल्लेदार चुनरी. या घागराचोलीवर बांधणी िपट्रचे, अबला वर्कचे, कशिदा वर्कचे भरगच्च भरतकाम केलेले असते त्यामुळे घातल्यावर तर सुंदरतेत तर चार चाँद लागतात. आजकाल तर बॅकलेस चोलीची तर जास्त फॅशन आहे. त्यामुळे बॅकलेस चोली हापण एक चांगला पर्याय आहे. बॅकलेस चोलीमध्ये धागऱ्यांच्या नाडय़ा खूप चांगल्या प्रकारे सजवलेल्या असतात, त्यामुळे पाठ सुंदर दिसते. ज्यांना बॅकलेस चोली घालण्याचे धाडस होत नसेल तर त्यांच्यासाठी स्लिव्ह्जलेस, डीप यू नेक व त्यावर केलेले वर्क अशा चोलीपण बाजारात उपलब्ध आहेत. घागऱ्यामध्ये बांधणी, राजस्थानी, लेहरीया िपट्रचा वापर होतो, पण घागऱ्यामध्ये राजस्थानी िपट्रचा जास्त वापर असेल तर ते जास्त ऑथेन्टिक वाटते. हल्ली मुन्नी, शीलाचा जमाना असल्याने गुडघ्यापर्यंत व घेरदार असणारा घागरा जास्त चलतीत आहे. या घागराचोलींची किंमत २००-३००० पर्यंत आहे. घागऱ्यांना कवडय़ा, कच्छी वर्क, आरसे, मोती लावून सजवलेले असते त्यामुळे रात्रीच्या गरब्याच्या मदानात चमकणारे घागरे व घागरा घातलेले तुम्ही अप्रतिम दिसाल. अशा घागऱ्यांची किंमत बाजारात ५००-३००० किंवा त्याच्या वर असू शकते. जसा तुमचा घागरा असेल तशी किंमत अधिक असेल. चनिया-चोली आधी कॉटनमध्ये
गेल्या काही वर्षांत सणाला कमíशयल इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे बाजारात गरब्याच्या पोशाखापासून ते दागिन्यांनपर्यंत सर्व वस्तूंची चलती आहे. पण महागाईमुळे गरबा पोशाखांचे भावपण वाढलेत, शिवाय वर्षांतून एकदाच तो पेहराव घालायचा असल्याने विकत घेण्यापेक्षा तो भाडय़ाने घेऊ असा विचार करणारे अनेकजण आहेत, त्यामुळे हे सर्व साहित्य विकत घेण्यापेक्षा ते भाडेतत्त्वावर देण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबईतील प्रसिद्ध बाजार जर म्हटले ह्य खरेदींसाठी तर एक तर चर्नीरोड येथील मंगलदास, भुलेश्वर व मालाड येथील नटराज मार्केट. इतर ठिकाणी असलेल्या बाजारातपण तुम्हाला नवरात्र उत्सवाची खरेदी करता येऊ शकते. त्यामुळे आता वाट न बघता लवकरात लवकर खरेदीस लागा.
नवरात्री शॉपिंग…
गरब्यासाठी अवघे चार दिवस राहिले असताना, नवरात्रीमध्ये काय घालून गरबा खेळायला जायचं? त्याची खरेदी कुठे करायची? चला तर करूया नवरात्रींसाठीचे शॉपिंग..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-10-2012 at 07:52 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri shopping