हाय मॅम,
मला जे सांगायचंय ते प्रेमाबद्दल नाहीये. माझा एक बेस्ट फ्रेंड आहे. आमची व्हॉट्सअॅपमुळे ओळख झाली. आधी आम्ही इतके बोलायचो नाही. पण एका मुलीला ग्रुपमध्ये अॅड करायचं की नाही यावरून आमच्यात भांडण झालं आणि ते मिटलं पण. त्यानंतर गेल्या चार-पाच महिन्यांत आमची छान मैत्री झाली. त्यानं फॅमिली प्रॉब्लेम्समुळे शिक्षण सोडलंय, तो जॉब करतो. तो मेंटली स्ट्राँग नाहीये. लगेच चिडतो पण मला हे माहिती असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. आजपर्यंत माझ्या लाइफमध्ये खूप काही घडलंय, म्हणजे रिलेटेड तू बॉइज, लव्ह, इ. बोलता-बोलता मी त्याला काही ना काही सांगायचं ह्य़ातलं. पण तो चिडायचा म्हणून सांगायचं बंद केलं. हे सगळं ऐकून आता तो म्हणतो की त्याचा माझ्यावरचा विश्वास पूर्ण उडालाय. मी त्याला मेसेज केला की माझं चुकलं, तू माझा परत मित्र होशील का? तर त्याचं उत्तर आलं की ‘आय नीड टाइम’. माझ्या चुकीमुळे मी माझा एक चांगला मित्र घालवला. तो एकच मित्र असा आहे की ज्याच्याशी मी मनातलं बोलायचे. मी जर त्याच्याशी बोलले नाही तर मी एकटी पडेन. मी काय करू समजत नाहीये.
-निशा
हॅलो निशा,
कुठलंही नातं तुटणं ही सहन करायला फार अवघड गोष्ट असते नाही? एखादी गोष्ट जवळ असली की त्याचं महत्त्व इतकं वाटत नाही, पण ती हातातून सुटली की मात्र ती आपल्यासाठी किती प्रेशियस होती हे कळतं. या दु:खाची तीव्रता जो त्यात होरपळून निघत असतो त्यालाच कळते. आणि मनातल्या गोष्टी कुठलाही आडपडदा न ठेवता कुणाशी तरी शेअर करता येणं यासारखं दुसरं लक नाही. कारण खरं तर अनेक बाबी अशा असतात की आपण त्या आपल्या स्वत:शी शेअर करायलाही घाबरतो. तुझ्या मित्राशी तू जेव्हा सगळं शेअर करत होतीस तेव्हा तुला खूप रिलीफ मिळत असणार. आता मात्र तुझा कोंडमारा होतोय.
तुझ्या पत्रातून, स्पेशली त्यातल्या पहिल्या वाक्यातून, असं दिसतंय की तू त्याच्याकडे फक्त एक चांगला मित्र म्हणून पाहात होतीस. पण त्याचा दृष्टिकोन याहून वेगळा होता की काय? तो चिडका आहे हे समजलं पण म्हणून तुझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांनी त्यानं इतकं डिस्टर्ब व्हायचं काय कारण? आणि तेही इतकं की त्यानं मैत्रीच तोडून टाकावी? यावरून असं नाही वाटत की तो तुझ्याबाबतीत फार पझेसिव्ह आहे?
त्याच्या या पझेसिव्हपणाबरोबरच तुझा त्याच्यावरचा डिपेन्डन्स तुझ्या पत्रातून जाणवतोय. कुणाशी तरी शेअर केल्यानं बरं वाटतं हे खरं आहे. पण तसं झालं नाही तर तू अगदी एकटी पडशील असं तुला वाटतंय. तुझ्या त्याच्याकडून असणाऱ्या अपेक्षा या तुमच्या नात्यामध्ये एक ओझं होऊन राहतायत का? तू त्याच्याकडून सारखा इमोशनल सपोर्ट एक्स्पेक्ट करायला लागली होतीस का? बॉइज, लव्ह याबाबतीतली तुझी मतं त्याला पटतही नसतील कदाचित. अनेकांची असते तशी जजमेंटल अॅटिटय़ूड त्याचीही असू शकेल.
निशा, तुमच्या दोघांमध्ये तुमच्या नात्याबद्दल कधी मोकळेपणानं बोलणं झालं होतं का? म्हणजे ही फक्त मैत्री आहे, यात रोमॅन्टिक काही नाही वगैरे? मुलामुलींची ‘फक्त मैत्री’ हा कन्सेप्ट पचायला अनेकांना जड जातो. त्या दोघांमध्ये ‘तसं’ काहीतरी नक्की असणार असं वाटतं अनेकांना. तुझ्या या मित्राशी मोकळेपणानं बोलण्याचा त्यानं काही वेगळा अर्थ तर नसेल ना काढला? ‘तिला माझ्याविषयी काही खास वाटत असल्याशिवाय कशाला ती हे सगळं मला सांगेल’ असं त्याला वाटलं असेल का? दोन व्यक्तींमधलं कम्युनिकेशन स्पष्ट नसेल तर अनेकदा असे गैरसमज होतात. असं मला म्हणायचंच नव्हतं. ‘अरे, मला तर तुझ्या बोलण्यावरून असं वाटलं’ असे आरोप-प्रत्यारोप नंतर केले जातात. त्याच्या मित्रांनी चिडवल्यामुळे आधी नसलेली रोमँटिक भावना नंतर त्याच्या मनात आली असेल, अशीही एक शक्यता आहे.
त्याला वेळ हवाय असं तो म्हणतोय, तर तसं करून बघ. इन द मीन टाइम, तुझ्या-त्याच्या दोस्तीच्या स्वरूपाविषयी तुझी मतं क्लीअर कर. म्हणजे नंतर या घटनेची पुनरावृत्ती नको.
Great friends are hard to find, difficult to leave and impossible to forget.
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.
ओपन अप -मैत्रीच्या नात्यात क्लॅरिटी हवी
मला जे सांगायचंय ते प्रेमाबद्दल नाहीये. माझा एक बेस्ट फ्रेंड आहे. आमची व्हॉट्सअॅपमुळे ओळख झाली. आधी आम्ही इतके बोलायचो नाही. पण एका मुलीला ग्रुपमध्ये अॅड करायचं की नाही यावरून आमच्यात भांडण झालं आणि ते मिटलं पण.
First published on: 19-09-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need clarity in relationship of friendship