रंग : नियॉन कलर ड्रेसिंग म्हणजेच नजरेत भरणारे, आकर्षक संगतीचे कॉम्बिनेशन. हॉट पिंक, लाईम ग्रीन, सिट्रॉन यलो, इलेक्ट्रिफाईड ब्लू ही त्याची उदाहरणं. याशिवाय नारिंगी, मोरपंखी हेसुद्धा नियॉन कलर्स असू शकतात.
फॅब्रिक्स : नियॉन कलरचा टॉप वापरणार असाल तर तो हलक्या-फुलक्या कापडाचा असावा. फ्लोइंग फॅब्रिक्सवर नियॉन उठून दिसतात. साडय़ांसाठीसुद्धा हे रंग वापरता येतील. पँट किंवा लेगिंगसाठी जाड कापड असेल असं बघायला हवं. कारण पाय व्यवस्थित शेपमध्ये नसतील आणि असे नियॉन कलर्स हलक्या फॅब्रिकमध्ये वापरले तर वाईट दिसतं. तुमच्या फिगरमधलं वैगुण्य झाकायचं असेल तर जाड कापड बॉटम्ससाठी वापरणं चांगलं. हलकं- फुलकं कापड आणि नियॉन कलर यामुळे तो भाग उठून दिसतो. त्यामुळे आपल्याला काय सूट होईल ते ठरवून मगच तयारी करावी.
मिक्स अँड मॅच :
हे रंग काही हलक्या रंगाबरोबर कंबाईन करून वापरले तर उठून दिसतील. तुम्हाला वेषभूषेचा जो भाग जास्त हायलाईट करायचा असेल त्यासाठी नियॉन कलर्स वापरावेत. कारण हे रंग लगेच लक्ष वेधून घेतात. पांढऱ्या किंवा काळ्या रंगाबरोबर मिक्स अँड मॅच केलेले नियॉन्स उत्तम दिसतात. काळा रंग छान पाश्र्वभूमी तयार करतो. पांढरा तर नियॉनसाठी सगळ्याच छान कॅनव्हास ठरतो. कलर ब्लॉकिंग पॅटर्न वापरणार असाल तर नियॉन कलर्सचा गडदपणा एकसारखा ठेवा. तुमचा वर्ण, केसाचा रंग यानुसार नियॉन कलर निवडा. नियॉन कलर्स खूप गडद असतात. त्यामुळे या रंगांना टोन डाऊन करणाऱ्या अॅक्सेसरीज वापरा. म्हणजे त्यांचा भडकपणा अंगावर येणार नाही. नियॉन कलर्समधले कपडे आणि त्याच कलरमधल्या अॅक्सेसरीज असं कॉम्बिनेशन कधीही करू नका. तुम्हाला नियॉन कलर कपडय़ांसाठी वापरणं अवघड वाटत असेल किंवा ते फार भडक वाटत असतील तर पेस्टल कलरच्या आऊटफिट्सवर एखादा नियॉन स्कार्फ वापरून बघा. त्यातून छान ‘ ‘कूल’ लुक मिळेल. एका वेळी एकच नियॉन कलर आणि त्याच्या जोडीला सौम्य रंगाचं कॉम्बिनेशन केलं तर गडद रंग लक्ष वेधून घेणारा ठरेल. अशा ट्रीटमेंटमुळे बोल्ड तरीही सौम्य लुक येईल.
नियॉन कलर्स
नियॉन कलर्स ही या सिझनची एकदम इन फॅशन आहे. पण हे नियॉन्स कसे कॅरी करायचे हे समजणं आवश्यक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neon colors in fashion