२१ तारखेला पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन झोकात साजरा झाला. अनेकांनी या दिवसानिमित्ताने योगसाधनेला सुरुवात केली असेल. योगसाधना म्हटलं की डोळ्यापुढे येतात ती अवघड आसनं, प्राणायाम आणि ध्यानधारणा. पण पारंपरिक योगसाधनेपासून प्रेरणा घेऊन काही नवीन प्रकार सध्या रुळू लागले आहेत. योगासनं ही खरं तर भारतानं जगाला दिलेली देणगी. आज जगभरातल्या फिटनेस फ्रीकमध्ये योगाची मोठी क्रेझ आहे. पण पारंपरिक योगामध्ये बदल करत योगाचे अनेक नवीन प्रकार सध्या येत आहेत. पॉवर योगा, बिक्रम योगा, अॅक्वा योगा, अँटी ग्रॅव्हिटी योगा या नावांनी ते प्रसिद्ध होत आहेत. याच योगाच्या क्रेझमधले चार नवीन प्रकारांची ही माहिती आणि वेगवेगळ्या तज्श्वांशी बोलून घेतलेला आढावा.
हे सगळे योगोपचाराचे नवे ट्रेण्ड आपल्या देशातही आता फोफावू लागलाय. अनेक कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये टीम बिल्डिंग अॅक्टिव्हिटी म्हणून वॉकिंग योगाचा आधार घेतला जातो. अनेक हेल्थ क्लब अॅक्वा योगाचे सेशन्स ठेवतात. पॉवर योगाला अनेक सेलेब्रिटींनी आपलंसं केलंय. तणावमुक्ती, रिलॅक्सेशन आणि फिटनेस यासाठी अनेक तरुण प्रोफेशनल्स याकडे वळत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा