या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्लिट म्हटल्यावर डोळ्यासमोर कुर्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेले कट्स येतात.  एरवी स्लिटचंअस्तित्व अदखलपात्र होतं. गेल्या वर्षभरात मात्र याच स्लिटने फॅशनविश्वाला नवं सौंदर्य दाखवून थक्क केलंय. एक साधीशी  स्लिट, त्यात विचार केला तरी फारसं वैविध्य आणता येणार नाही. पण तिलाच ड्रेसमध्ये योग्यरीतीने वापरल्यास ड्रेसचा चेहरामोहराच बदलून जातो. त्यामुळेच डे ड्रेस असो किंवा कॉकटेल गाऊन, फॉर्मल स्कर्ट असो किंवा एथनिक कुर्ता स्लिटने महत्त्वाची जागा पटकावली आहे. सध्या फ्रंट स्लिट (शेरवानीच्या समोरच्या बाजूस असलेली), मल्टीपल स्लिट्स (ड्रेसच्या दोन्ही बाजूला आणि समोरच्या बाजूला), शॉर्ट स्लीट (तीन- चार इंचाची स्लिट) हे स्लिटचे प्रकार ट्रेण्डमध्ये आहेत.

तसं पाहायला गेलं तर स्लिट हा केवळ ड्रेसचा एक भाग आहे. हालचालीमध्ये सहजता मिळावी म्हणून स्ट्रेट कुर्त्यांसारख्या कपडय़ांच्या प्रकारात तो महत्त्वाचा आहे. तरीही या स्लिटचं ट्रेण्डमध्ये येणं साहजिक नव्हतं. स्लिट ही सध्या बोल्डनेसचं, आत्मविश्वासाचं प्रतीक म्हणून समोर येतेय. या स्लिटमुळे ड्रेसला आणि एकूणच लुकला येणारा क्रिस्प, शार्प आणि बोल्ड लुक यावर तरुणाई फिदा होतेय. फॉर्मल्समध्ये स्लिटला महत्त्व अधिक. तुमच्या स्वभावातला आत्मविश्वास स्लिटमुळे अधोरेखित होतो. स्लिटचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तिला कापडाच्या किंवा पेहरावाच्या मर्यादा नाहीत. त्यामुळे तुम्हाला प्रयोगासाठी भरपूर वाव मिळतो. वेस्टर्न, इंडियन सगळ्या प्रकारच्या आऊटफिट्समध्ये स्लीट शोभून दिसते आणि शोभा वाढवते.

शॉर्ट ए लाइन किंवा फ्लेअर ड्रेसला शॉर्ट किंवा मध्यम उंचीची स्लिट दिल्यास त्यालाही उठाव मिळतो. विशेषत: ड्रेस शिफॉन, जॉर्जेट अशा सुळसुळीत कापडाचा असेल तर त्याची मजा अजूनच वाढते. कॉटन ड्रेस, कुर्त्यांवर स्लीट शोभून दिसते, हे काही वेगळं सांगायला नकोच. मॅक्सी ड्रेसला लाँग स्लीटमुळे अजूनच मजा येते. एक प्रयोग म्हणून ड्रेसच्या मूळ कापडाला मोठी स्लीट आणि अस्तर किंवा लायनिंगला मध्यम आकारची स्लिट देऊन बघा. अर्थात त्यासाठी ड्रेस अर्धा नेहमीप्रमाणे अस्तर आणि मूळ कापड एकत्र घेऊन शिवायचा आणि स्लिटपासूनच्या भागात मात्र त्यांना वेगळं ठेवायचं. या प्रकारात अस्तर लपवण्याऐवजी फोकसमध्ये येणार असल्याने त्याच्यासाठीही तितकंच आकर्षक कापड निवडणं गरजेचं आहे. मॅक्सी ड्रेसला कमरेपर्यंत मोठी स्लिट घेण्याऐवजी गुडघ्यापर्यंत मध्यम लांबीची स्लिटसुद्धा छान दिसते. गाऊन्समध्ये हल्ली ए लाइन किंवा स्ट्रेट गाऊन वीथ स्लिटचा ट्रेंड आहे.

स्कर्टमध्येही स्लीटला पसंती मिळते आहे. नेहमीच्या स्ट्रेट स्कर्टला स्लिटमुळे नवा लुक मिळतो. फॉर्मल शॉर्ट, स्ट्रेट स्कर्टला मागच्या बाजूला स्लिट असतेच. पण त्याऐवजी पुढच्या बाजूला छोटी स्लिट घेऊन तिला कॉन्ट्रास्ट पायपिंगने हायलाइट करता येईल. लेहेंगासोबतच्या लाँग कुर्ता किंवा शेरवानीवर मल्टिपल स्लिट शोभून दिसतात. स्ट्रेट  सलवार किंवा लेगिंगसोबत पण छान दिसतात. जुन्या जॅकेट किंवा श्रगला नवा ट्विस्ट द्यायचा असेल तर दोन्ही बाजूंची शिलाई उसवून तिथे स्लिट बनवा, वाटल्यास डेकोरेटिव्ह बॉर्डर्स, लेसने त्या सजवतासुद्धा येतील. ओव्हरसाइज शर्टचा अशाचप्रकारे श्रग बनवता येईल. स्लीट दिसायला आकर्षक असली तरी तुमच्या शरीरयष्टीनुसार तिची निवड करणं गरजेचं आहे.

  • स्लिटमुळे उंची अधिक असल्याचा भास निर्माण करता येतो. पण कमी उंचीच्या मुलींनी हाय स्लिटचा ड्रेस घातल्यास त्या अधिक बुटक्या दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी मध्यम आकाराची स्लिट निवडावी किंवा हाय स्लीट असलेल्या ड्रेससोबत लेगिंग वापरावी.
  • हाय स्लिटच्या ड्रेससोबत वेगवेगळ्या स्टाइलच्या नेकलाइन्स उठून दिसतात. त्यामुळे नेहमीची बोट किंवा वर्तुळाकार नेकलाइन घेण्यापेक्षा त्यात प्रयोग करायला हरकत नाही.
  • तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला, कुठे आणि कधी जाणार आहात त्यानुसार स्लिटची उंची ठरवा. मोकळ्या मैदानावर पार्टीमध्ये जॉर्जेटचा हाय स्लिटचा ड्रेस घातल्यास हवेमुळे सतत उडणाऱ्या ड्रेसमुळे अवघडलेपणा येऊ शकतो. तसेच पेअर शेप बॉडीच्या मुलींनी शक्यतो हाय स्लिट ड्रेस टाळावेत.
  • हाय स्लिटचा ड्रेस किंवा स्कर्ट घालायला अवघडलेपणा येणार असेल, तर त्यासोबत कॉन्ट्रास्ट लेगिंग किंवा स्टॉकिंग घालू शकता.
  • स्लिट फोकसमध्ये ठेवायची असल्यास शूज शक्यतो ड्रेसच्या रंगाचे किंवा न्यूट्रल असू द्या. फॅन्सी शूजमुळे स्लीटवरचा फोकस बाजूला होईल.

स्लिट ड्रेससोबत सिक्वीन्स लेगिंग किंवा कॉन्ट्रास्ट लेगिंगने छान वेगळेपणा येऊ  शकते.. (छाया १ आणि २). सिंपल ड्रेसमध्ये एक स्लिटसुद्धा लुक बदलू शकते.. (छाया ३ आणि ६). लेअरिंग, प्रिंट्समुळे स्लिटला अजूनच उठाव आणता येतो.. (छाया ४ आणि ७). स्लिटमुळे येणाऱ्या क्रिस्प आणि कॉन्फिडंट लुकमुळे सध्या हा ट्रेण्ड फॉर्मल्समध्ये गाजतोय.. (छाया ५). स्लिट ड्रेस तुम्ही कॅरी कसा करताय यालाही महत्त्व असते. तुमच्या वावरण्यात आत्मविश्वास हवा नाहीतर लुक फसू शकतो.. (छाया ८)