दरवर्षी फॅशनविश्वात काही नवीन फंडे येतात. न्यू ईअरही फॅशनचा नवा ट्रेण्ड सुरू करायचा काळ. २०१४ सालात कुठली फॅशन इन असेल आणि कुठली फॅशन आऊटडेटेड होईल याचा अंदाज आणि काही खास फॅशन टिप्स..
नुकत्याच सुरू झालेल्या नवीन वर्षांला उत्साहात सामोरं जाताना, फॅशनच्या बाबतीत काही गोष्टींचं भान ठेवूया. नवीन ‘ट्रेण्ड’ नव्याने सुरू करण्यासाठी ‘न्यू ईयर’ सीझन ही एक नामी संधी आहे. गेल्या वर्षांसाठी केलेले संकल्प आपण भले पाळले नसतील तरी या नवीन वर्षांत फॅशनेबल दिसण्यासाठी जागरूक राहायला काय हरकत आहे? तुमच्या फॅशन रिझोल्यूशन्स ना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी चिअर करायला आम्ही आहोत ना ! नवीन वर्षांतले फॅशनचे अंदाज आणि टिप्स खास तुमच्यासाठी. सर्वप्रथम आपण तुमच्या असलेल्या कपडय़ांच्या ‘कलेक्शन’मध्ये लक्ष घालूया. कदाचित यांतील काही कपडय़ांचा आपल्याला दानधर्मही करावा लागेल. पण नेव्हर माइंड, अशा दानकर्मातून मदत करण्याचे पुण्यही मिळते आणि नवीन कपडे खरेदीसाठी निमित्तही.
कलर स्टोरी
२०१४ वर्षांसाठीचा रंग असेल जांभळट, गुलाबी अर्थात ‘रेडियंट ऑíकड’. जवळजवळ सर्वच स्कीनटोन्सना म्हणजे त्वचेच्या रंगछटांना सहज शोभून दिसणारा हा आकर्षक, मोहक, शाही रंग आपल्या सगळ्यांनाच आवडण्यासारखा आहे. तेव्हा या वर्षी रंगांच्या भरपूर शेड्सचे कपडे घालता येतील, हे काही वेगळं सांगायला नको. गेल्या वर्षीच्या फॅशनमधील कलर ट्रेण्डशी तुलना करता हा बदल स्वागतार्हच आहे. गेल्या वर्षी फॅशनच्या जगात डोळ्यांत भरतील अशा ‘ब्राइट’ रंगांचा भडिमार सुरू होता. त्याला काहीसा ब्रेक लावत २०१४ साली मनाला उल्हसित करणारे, रोमँटिक पेस्टल म्हणजे फिकट रंग वापरूया. हे रंग तुमच्या कपडय़ांना डौलदार आणि आकर्षक बनवतातच शिवाय तुम्हाला ‘फेमिनाइन’ लूक द्यायला मदत करतात.  
सिलोएट
सिलोएट किंवा ड्रेसचे बाहय़ाकार किंवा पॅटर्नस्- गेल्या वर्षी फेमस असलेले हाय, लो हेमलाइन किंवा म्युलेट या कपडय़ांच्या पॅटर्नस्ची फॅशन या वर्षी अजिबात नसेल. उलट ‘बॉक्सी’ पॅटर्न ‘इन’ असेल. अंगातली कुर्ती किंवा टॉपपासून हिवाळ्यातील स्वेटशर्टपर्यंत सर्व कपडय़ांचे प्रकार सलसर फिटिंगचे असतील. अंगासरशी बसणाऱ्या जीन्सही आता आरामदायी फिटिंगच्या असतील. चला, म्हणजे या वर्षी नक्कीच मिडी स्कर्टची फॅशन करायला हरकत नाही. ‘मिडी’ या ड्रेस प्रकाराची लांबी, जुन्या-नव्याचा संगम असलेल्या एखाद्या स्त्रीसारखी, माफक शालीन पण स्मार्ट लूक देणारी. मग व्हाय नॉट मिडी?
प्रिंट्स
आता कपडय़ांवरच्या प्रिंट्समध्ये काय बदल घडतील ते पाहू. या वर्षी प्रिंट्समध्ये सत्तरच्या दशकातील ‘कॅलिफोíनया’ लूक, तसंच ‘हिप्पी’ लूक देणारे फ्लोरल प्रिंट्स मोठय़ा प्रमाणावर दिसतील. साहजिकच ‘डित्झी’(छोटय़ा आकारातील फुलांचे दाट डिझाइन), ‘मॅमोथ’(अजस्र आकाराची चित्रे) , ‘बोटॅनिकल’(वनस्पती, झाडे-पाने), आणि ‘ट्रॉपिकल’(मोठय़ा आकारातील फुले, पाने यांचा घनदाट एकत्रित वापर) अशा प्रकारची िपट्र्स, तुम्हाला टी-शर्टवरची शांत, मंद रंगातली, पोट्र्रेट्स(व्यक्तिचित्रे) पाहिलेली आठवतायत का? तसे ‘इन्स्टाग्राम’ प्रिंट प्रकारही दिसतील. शिवाय ट्रायबल प्रिंट्सही  फॅशनमध्ये असतील. जर तुमचा स्वभाव नॉटी किंवा जुन्या गोष्टींची आवड असणारा असेल तर फॅशनच्या बाबतीत या वर्षी ‘नो इश्युज.’
मेक-अप
लिप स्टिकमध्ये लाल रंगाची चमकोगिरी याही वर्षी कायम असेल. २०१४ वर्षांत, भारतीय स्त्रियांच्या स्कीनटोनशी मिळताजुळता ऑरेंज कलर आणि त्याच्या छटा यांची फॅशन असेल. हा रंग मादक असतोच, शिवाय आपल्याला ‘जस्ट बॅक फ्रॉम द बीचेस’ लूक देतो. ‘पेप्टोिपक’ (आकर्षक, मॅट फिनिश, गुलाबी रंग) आणि ‘रिच प्लम’ या लिपस्टिकच्या शेड्सही ‘इन’ असतील.
अ‍ॅक्सेसरीज
हेड बॅण्ड्स – २०१३ या वर्षांत ‘बिब नेकलेस’ची स्टाइल होती. परंतु २०१४ हे वर्ष असेल ‘हेड बॅण्ड’च्या फॅशनचे. विणलेले, िपट्रेड, किंवा चमकदार खडे लावलेले, साधे असे हेड बॅण्ड्सचे सर्व प्रकार तुमच्याजवळ हवेत. पुन:पुन्हा चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या चुकार बटांना आवर घालत असल्याने ते वापरायला सोयीचे असतातच, शिवाय कोणताही ड्रेस घातला तरी तुम्हाला (बोहो- अपारंपरिक) लूक बहाल करतात.
ईअिरग्ज – आधुनिक विचारसरणीच्या भारतीय ललनांना आवडणारे आणि मानेच्या हालचालीने नाजूक, मोहक हेलकावे घेणाऱ्या पारंपरिक ‘झुमके’ किंवा ‘झुंबरं’ या दागिन्यांशी साधम्र्य असणारे लोंबते कानातले याही वर्षी फॅशनमध्ये असतील.
पादत्राणे – शेवटची पण स्त्रीमनाला सर्वात जास्त प्रभावित करणारी एक गोष्ट म्हणजे फूटवेअर. २०१४ सालात यांचा लूक ‘स्पोर्टी’ असेल. उदाहरणार्थ ‘हाय टॉप्स’, ‘कॅनव्हास’, ‘स्नीकर्स’ वगरे प्रकार प्रचलित असतील. यामुळे पायांना आरामही मिळेल आणि स्टाइलही, सो इट्स परफेक्ट.