विनय जोशी

पाहता पाहता वर्ष २०२३ संपायला आलं आहे. दरवर्षी वर्षांअखेर केली जाणारी  ‘टु -डू  लिस्ट’ म्हणजे नव्या कॅलेंडरची खरेदी, थर्टी फर्स्टचं प्लॅनिंग आणि नव्या वर्षांसाठीचा संकल्प ठरवणं ! रोज जॉगिंगला जाणं,  डाएट काटेकोर फॉलो करणं इथपासून तर अगदी नवीन पॉडकास्ट ,युटय़ुब चॅनेल सुरू करणं असे एक से एक भन्नाट संकल्प या आठवडयात आखले जातात. एका सव्‍‌र्हेनुसार फिटनेस राखणं, आर्थिक स्तर वाढवणं, वजन कमी करणं, डाएटिंग करणं हे दरवर्षी सर्वाधिक केले जाणारे संकल्प आहेत. संकल्प वर्षभर पाळणारच, अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा मावळत्या वर्षांच्या साक्षीने केली जाते खरी.. पण बहुतांशी संकल्प कॅलेंडरचं जानेवारीचं पान उलटेपर्यंत देखील टिकत नाहीत. आणि मग यावर्षी नाही जमलं बुवा, पुढच्या वर्षी मात्र नक्की करेन असं म्हणत संकल्प बासनात गुंडाळले जातात.

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Rohit Shetty Singham Again movie Circus of entertainment news
मनोरंजनाची सर्कस
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Brijbhushan Pazare warned about to commit suicide if he pressured to withdraw candidature
“उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव आणल्यास आत्महत्या करणार,” ब्रिजभूषण पाझारे यांचा इशारा
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Abhijeet Sawant
“लाखो-हजारात माझी ताई तू…”, भावा-बहिणीच्या नात्यावर अभिजीत सावंतचे मंत्रमुग्ध करणारे गाणे
Samvadini Group, Social Transformation,
शहरबात… कृतीतून बोलणारी ‘संवादिनी’

स्क्रँटन विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनानुसार दरवर्षी  ३८ टक्के लोक नवीन वर्षांचे संकल्प करतात, पण यातील फक्त  ८ टक्के लोकांचे संकल्प वर्षभर सिद्धीस जातात. म्हणजे ९२ टक्के लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने अपयशी ठरतात. यातील ८० टक्के लोक तर चक्क फेब्रुवारीतच संकल्पाला रामराम ठोकून मोकळे होतात. आळस, नियोजनाचा अभाव, अवास्तव ध्येय, अधीरता ही संकल्प अयशस्वी होण्याची प्रमुख कारणं म्हणता येतील. काही सोप्या टिप्स फॉलो करून आपला संकल्प यशस्वीपणे वर्षभर पार पाडता  येऊ शकतो.

हेही वाचा >>> फुडी आत्मा : अन्न हे पूर्णब्रह्म!!

सगळयात महत्त्वाचं म्हणजे आपला संकल्प वास्तववादी असणं अगदी आवश्यक आहे. ‘या वर्षी मी १०० पुस्तकं वाचेन’ किंवा ‘सोशल मीडियाचा वापर पूर्ण बंद करेन’ असे अवास्तव संकल्प हमखास अपयशी ठरतात. तसंच ‘मी  काहीतरी व्यायाम करेन’, ‘जमेल तसं  जॉिगगला जाईन’ असे अघळपघळ निश्चयही फारसे तग धरत नाहीत. याउलट ‘स्मार्ट’ संकल्प  पूर्ण होण्याची शक्यता अधिक असते.  रटअफळ म्हणजे  र (specific), 

M (measurable), A (achievable), R (realistic) आणि  T  (time- bound)!’ मार्चच्या अखेरीस ५ किमी धावण्याच्या उद्देशाने मी पुढील तीन महिन्यांसाठी, आठवडयातून तीन वेळा किमान ३० मिनिटं घराबाहेर जॉिगग करून माझी शारीरिक तंदुरुस्ती सुधारेन’.. हा झाला एक स्मार्ट संकल्प !

मोठा संकल्प छोटया छोटया भागात विभागून त्याप्रमाणे नियोजन केलं तर यशस्वितेची शक्यता वाढू शकते. समजा नव्या वर्षांत पुस्तक लिहिण्याचा संकल्प असेल तर पहिल्या आठवडयात रूपरेषा लिहिणं, पुढच्या आठवडयात पात्र किंवा प्रसंग रचना आखणं, पुढच्या १५ दिवसांत पहिलं प्रकरण लिहिणं अशी विभागणी करून त्याचं वेळापत्रक बनवता येऊ शकतं. ‘वर्षभर लवकर उठेन’ या संकल्पात वारंवार खाडा होण्याची शक्यता जास्त आहे. यापेक्षा ‘हा एक आठवडा लवकर उठेन’ हे ध्येय पूर्ण करणं सोपं आहे. आणि यातूनच एक एक आठवडा करत वर्षभर संकल्प पाळला जाऊ शकतो.

कार्याचं नियोजन आणि प्रगतीचा नियमित आढावा ही यशस्वितेची गुरुकिल्ली आहे. वजन कमी करण्याचा निश्चय असेल तर व्यायाम आणि डाएटची व्यवस्थित आखणी करून एक जर्नल बनवता येऊ शकेल. यात रोजचा आहार, त्यातून मिळालेले घटक, रोज केलेला व्यायाम याची नोंद ठेवता येईल. दर आठवडयाला वजन मोजून यात लिहिता येईल. यातून प्रयत्न आणि प्रगती  यांचा आलेख डोळयासमोर उभा राहील. आपल्या संकल्प पालनाच्या प्रवासातील लहानमोठे टप्पे साजरे करत स्वत:ला शाबासकी द्यायला हरकत नाही. यातून ध्येयपूर्तीसाठी उत्साह टिकून राहण्यास मदत होईल.

हेही वाचा >>> अवकाशाशी जडले नाते: ऐक मानवा तुझी कहाणी!

प्रेरणा हा संकल्पसिद्धीचा कणा आहे. ज्या विषयात रस असेल किंवा ज्याचं महत्त्व पटलं असेल असे संकल्प आवडीने पार पाडले जातात. या उलट कोणाच्या तरी प्रभावाने  घेतलेले  संकल्प अर्धवट राहतात. मित्र जातो म्हणून जिमला जायचं या संकल्पातील प्रेरणा हळूहळू सरत जाणं स्वाभाविक आहे. अशा वेळी व्यायामाचं महत्त्व मनाला वारंवार पटवत राहून प्रेरणा टिकवणं गरजेचं आहे.

प्रेरणा टिकून राहण्यासाठी सतत दिसेल अशा जागी आपला संकल्प लिहून ते लावणं फायदेशीर ठरतं. आपल्या ध्येयासंबंधी वस्तूंवर देखील संकल्प लिहिता येईल. डाएट फॉलो करताना फ्रीजवर मोठया अक्षरात ध्येय लिहिता येईल किंवा खर्च कमी करायचा संकल्प असेल तर पाकिटात अशी चिठ्ठी ठेवता येईल. संकल्पाचा ‘व्हिजन बोर्ड’देखील बनवता येऊ शकतो. डेस्कटॉप इमेज, मोबाईलची लॉकस्क्रीन म्हणूनही तो वापरता येईल.

आपल्या कुटुंबीयांना, जवळच्या मित्रमंडळींना आपल्या संकल्पाबद्दल सांगितलं तर ते देखील प्रोत्साहन देऊ शकतील. आपला संकल्प मोडू शकतो अशा क्षणी ते आपल्याला सावध करू शकतील. या उलट जर िनदकाचं  घर शेजारी असेल तर त्यांच्या टिंगलटवाळीने आपला विश्वास डळमळीत होऊ शकतो. आपल्या संकल्पाच्या विरुद्ध आचरण असणाऱ्या व्यक्तींचा सहवास संकल्प मोडण्यात हातभार लावू शकतो. स्मोकिंग सोडण्याचा संकल्प असेल तर सिगारेट पिणाऱ्या मित्रांना पाहून  पुन्हा स्मोकिंगची इच्छा होऊ शकते. जोपर्यंत आपला निश्चय दृढ होत नाही तोपर्यंत आपल्या संकल्पाची टिंगल करणाऱ्या किंवा त्याच्या आड  येऊ शकणाऱ्या मंडळींपासून अंतर राखणं श्रेयस्कर ठरतं.

समान संकल्प असणारी मंडळी एकमेका सहाय्य करत सुपंथ गाठू शकतात. वाचनाचा परीघ वाढवण्याचा संकल्प असणारे वाचनप्रेमी दर आठवडयाला भेटून वाचलेल्या पुस्तकांविषयी चर्चा करू शकतात. फिटनेस फ्रीक एकत्र जिमला जाऊन सोबत व्यायाम करू शकतात. एकत्र प्रयत्न करणं, एकमेकांना प्रोत्साहन देणं, विविध टप्प्यातील यश एकत्र साजरं करणं यातून नक्कीच मदत होईल.

टेक्नॉलॉजीचा उपयोग करत आपल्या संकल्प पालनाच्या प्रयत्नांना स्मार्ट रूपही देता येऊ शकतं. आपल्या संकल्पातील विविध टप्पे गुगल कॅलेंडरवर नोंदवून रिमाइंडर मिळवता येऊ शकतात. विविध फिटनेस ट्रॅकिंग अ‍ॅप्स व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचा लेखाजोखा ठेवू शकतात. स्क्रीन टाइम मॉनिटिरग अ‍ॅप्स वापरत आपला सोशल मीडियावरील वावर मर्यादित ठेवता येईल. आर्थिक नियोजन आणि खर्चाची नोंद यासाठी  देखील अ‍ॅप्स मदतगार ठरतात. व्हिजन बोर्ड क्रिएटर अ‍ॅप वापरत आपल्या ध्येयातील संकल्पना कागदावर चितारता येतील. सोशल मीडियावर समान संकल्प असणाऱ्या मंडळींना शोधून ग्रुप  बनवता येऊ शकतील.

शेवटी सकारात्मक वृत्ती आणि प्रयत्नातील सातत्य हेच यशाचं गमक आहे. तुकोबा म्हणतात तसं सत्य संकल्पाचा दाता नारायण! जेव्हा अगदी मनापासून आपण काही निश्चय करतो तेव्हा जणू विश्वातील सगळी सकारात्मकता आपल्या पाठीशी उभी राहते. गरज असते ती आपण पहिलं पाऊल टाकण्याची! नव्या वर्षांचा सूर्योदय हेच पहिलं पाऊल टाकायला बळ देवो आणि येणारं  २०२४ वर्ष आपलं संकल्प पूर्ण करणारो ठरो या सदिच्छा!! viva@expressindia.com