‘नव्या वर्षांचं नेमकं सेलिब्रेशन कसं करावं’ हा प्रत्येकालाच डोकं खाजवायला लावणारा प्रश्न! याबाबत केल्या जाणाऱ्या तगडय़ा प्लानिंगचे वारे मित्र-मत्रिणींच्या घोळक्यात महिना-दीड महिना आधीपासूनच वाहू लागतात. परंतु ‘न्यू इयर’ सेलिब्रेशनचा हा प्रोग्राम प्लान करणं प्रत्येक यंगस्टरसाठी मोठा टास्क असतो. हे सेलिब्रेशन इतरांपेक्षा हटके आणि वर्षभर आठवणीत राहावं याकरता खटाटोप सुरू असतो.
‘नव्या वर्षांचं नेमकं सेलिब्रेशन कसं करावं’ हा प्रत्येकालाच डोकं खाजवायला लावणारा प्रश्न! याबाबत केल्या जाणाऱ्या तगडय़ा प्लािनगचे वारे मित्र-मत्रिणींच्या घोळक्यात महिना-दीड महिना आधीपासूनच वाहू लागतात. परंतु ‘न्यू इयर’ सेलिब्रेशनचा हा प्रोग्राम प्लान करणं प्रत्येक यंगस्टरसाठी मोठा टास्क असतो.
अरे सुन्या, दिवस काय हे, अस्से संपतील. त्यामुळेच आज मी ग्रुपमधल्या प्रत्येकालाच संध्याकाळी आपला नेहमीचा कट्टा घेरायला सांगितलंय. ‘न्यू इयर’ सेलिब्रेशन कसं करावं? काय धमाल मस्ती करावी? वगरे गप्पांचा धिंगाणा घातल्याशिवाय आज कुणालाही कट्टय़ावरून ‘एक्झिट’ नाही हे नक्की! शिवाय यंदाच्या सेलिब्रेशनची मजा जपून, तरीही न घाबरता आणि बिनधास्तपणे लुटायची. थोडक्यात काय त्या एका दिवसासाठी सगळ्यांनी या पठ्ठय़ाने दिलेला एकच मंत्र घोकायचा, तो म्हणजे ‘नो फिअर ओन्ली चिअर्स..’
३१ डिसेंबरची ती बेभान रात्र असेल. आसमंतावर गुलाबी थंडीची चादर असेल. सारं वातावरण आनंदानं भरून गेलं असेल. माझ्या अलिबाग येथील फार्महाऊसच्या अंगणात कुटुंबीयांसोबत शेकोटीभोवती गोलाकार बसून आपले हास्यविनोद होत असतील. हातातला प्याला काठोकाठ भरलेला असेल, फेस पण ओसंडून वाहत असेल.. हा पठ्ठय़ा तुला त्या वेळेस एकच आवाहन करेल, ‘कर हा प्याला प्राशन, अन् हो स्वार त्या वारुणीवर, विसरून जा साऱ्या काळज्या अन् कटकटी, जुन्या वर्षांला निरोप दे अन् नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत कर. प्याला! हा शब्द ऐकताच पठ्ठय़ाने चकवून नेलेल्या सेलिब्रेशनच्या स्वप्ननगरीतून सुन्या खडबडून उठतो आणि त्या फेसाळत्या प्याल्यावर टीका करतो. मग त्यावर पठ्ठय़ा जस्ट चिल यार, मस्करी करत होतो. ‘प्यालाऐवजी सॉफ्ट िड्रक घेऊ’ म्हणत पुन्हा मूळ पदावर येतो. सेलिब्रेशन मूड पुन्हा रंगवू लागतो. म्युझिकच्या मंद आवाजात स्टार्टर झाल्यानंतर ग्रुपमधल्याच काही हौशी मंडळींकडून गाण्याची किंवा अॅिक्टगची हुन्नर वगरे दाखवण्यासाठी फर्माईश होईल. ‘झूम बराबर झूम’च्या तालात काउंटडाऊन सुरू होईल. नववर्षांच्या स्वागताकरिता सारी मित्रमंडळी सज्ज होऊन एकच जल्लोष करू. घडय़ाळाचा काटा बाराच्या ठोक्याकडे जसजसा सरकत जाईल तसतसा जल्लोष वाढेल आणि मग बाराचा ठोका पडला रे पडला की बेधुंद स्वरात वातावरणात एकच आवाज घुमेल, तो म्हणजे ‘हॅपी न्यू इयर’. शुभेच्छांचा एकमेकांवर वर्षांव झाल्यानंतर पार्टीच्या मजेची रंगत आणिकच वाढेल, ती म्हणजे ‘न्यू इयर’ रिझोल्यूशनने म्हणजेच ‘संकल्प’ सांगण्याच्या कार्यक्रमाने. कोणी नवा जॉब शोधण्याचा, कोणी रिलेशनशिपचा सीरियसली शोध घेण्याचा, कुणी तर चक्क वाढत्या भ्रष्टाचाराला कंटाळून समाजसेवा अथवा राजकारणात एन्ट्री करण्याचा संकल्पही घेतील. प्रत्येकाचे संकल्प जाणून घेताना हास्यांचे फवारे उडय़ा घेतीलच, शिवाय आपण प्रत्येकजण प्रत्येकाला त्याच्या रिझोल्यूशनमध्ये मदत करू आणि कोणी जर ‘मी केलेला संकल्प काय’!
‘नव्या वर्षांचं सेलिब्रेशन कसं करावं’ हा प्रत्येकालाच डोकं खाजवायला लावणारा प्रश्न! काही ग्रुप्समध्ये अशा खास प्लानिंगदरम्यान अनेकदा वाद उद्भवतात. तो खास दिवस, वेळ एन्जॉय करण्यासाठीच्या प्रत्येकाच्या मागण्या, विचार, थीम्स वेगवेगळ्या असतात. काहीजण जास्त पसा खर्च करून सेलिब्रेशन मोठय़ा हर्षांत करू इच्छितात. पण काहींना मात्र ते परवडणार नसतं. काही तर केवळ आपल्या मित्राची कंपनी आपल्याला सेलिब्रेशनदरम्यान मिळावी म्हणून स्वत:च त्याचा खर्च करण्याची तयारी दाखवतात, यापलीकडे काहींचं जग इतकं वेगळं असतं की ते फक्त या दिवशी ‘एसएमएस’चा डाव मांडून नववर्षांची धमाल लुटताना दिसतील. ‘इट्स सो बोरिंग ना!’ असं तुम्हाला वाटेल, पण त्यांच्या ‘एसएमएस’ सेलिब्रेशनची गाडी फारच जोशात धावत असेल. नेटवर्क प्रॉब्लेम येण्यापूर्वीच मावळत्या वर्षांची अखेरची रात्र संपत असतानाच मित्रांमध्ये शुभेच्छा संदेशांची रेलचेल सुरू होईल. यातही भर म्हणजे नववर्षांच्या स्वागतासाठी शहरातील लहानमोठे रेस्टॉरंट्स, आडोशाला असणारे छोटे धाबे, हुक्का पार्लर्स, पब्स, डिस्कोज, बीयर बार्स, केक शॉप्स, मॉल्स, गिफ्ट शॉप्स आपल्या तरुण मित्रांनी तुडुंब भरून वाहत असतील. सेलिब्रेशन कितीही जोशात केलं, कितीही मजा केली तरी ती आपल्याला कमीच वाटते. म्हणून ‘न्यू इयर’ सेलिब्रेशन हटके करण्यासाठी कुठे जावं? काय करावं? याबाबतचे विचार नक्कीच मनात गोंधळ घालत असणार. ‘नवे वर्ष-नवे संकल्प-नवे धोरण’ अशा कित्येक नवीन प्रकल्पांची गणितं सोडवताना नवीन वर्षांत सेलिब्रेशनसोबतच काही नवे निश्चय करण्याचे विचारही तुमच्या मनात तरंगत असणार. असो, ‘न्यू इयर’ सेलिब्रेशनच्या निमित्ताने का होईना, पुन्हा ‘नवी स्वप्ने जागी होतील.. पुन्हा मनमोर नाचू लागतील.. संकल्पांचे ढग आयुष्यात पुन्हा एकदा दाटू लागतील..
समीर पवार
‘नवीन वर्ष, नव्या आशा, शोधत नव्या दिशा. .जाऊनी व्हिवाच्या देशा. .साऱ्यांना देतो नववर्षांच्या हार्दकि शुभेच्छा. कदाचित नववर्षांच्या उत्साहामुळे ती लगेच मला स्फुरली असावी. माझं नवीन वर्षांचं सेलिब्रेशन शंभर टक्के नाटकाच्या रिहर्सलमध्येच होऊन जाईल. त्याचं काय ना, याच महिन्यात विविध एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धानी तळ ठोकल्याने नवीन वर्षांचं सेलिब्रेशन नाटकाच्या मूडमध्येच कधी संपेल हे कळणारसुद्धा नाही. मुळात मी नाटकवेडा असल्यामुळे रिहर्सल रूममध्ये ‘न्यू इयर’च्या दिवशी होणारा दंगा खूपच लक्षात राहण्यासारखा असेल हे नक्की. माझ्यासारख्या नाटकवेडय़ा माणसासाठी यापेक्षा मोठं आणि हटके सेलिब्रेशन कुठे असूच शकत नाही. या वर्षी अभिनयाचं कौशल्य दाखवून जास्तीतजास्त अभिनय क्षेत्रात कसं काम मिळवता येईल याकडे लक्ष देण्याचा संकल्प मी केला आहे. यंदाच्या नव्या वर्षांत मी चाळून सगळी नाटकं, चित्रपट पाहून आनंद व्यक्त करीन आणि त्यातून अभिनयाच्या दृष्टिकोनातून बरंच काही शिकेन.
प्रणिता मोहिते
३१ डिसेंबरच्या त्या रात्री १२ चे ठोके पडतील, तसेच हृदयाचे ठोकेदेखील नववर्षांच्या उत्साहाने गतिमान होण्यास उत्सुक असतील. वर्षांतील अखेरचा ३६५ वा दिवस त्यापकी. ३६४ दिवस आपण काय आणि कसला गोंधळ घातला याचा काहीच नेम नसतो. दरवर्षी नवी कोरी संकल्पांची तयार केलेली डायरी वर्षांच्या अखेरीस धूळ खात पडलेली दिसते. मग करावे तरी कशाला असे संकल्प! त्यापेक्षा नववर्ष मस्त उत्साहात साजरं करावं. मी नववर्षांचं सेलिब्रेशन आजवर घरच्या घरीच करीत आले, पण यंदाचं माझं सेलिब्रेशन कदाचित जहाजावर सेलिब्रेट होईल. निळा शांत समुद्र, त्यात लखलखीत प्रकाशाने उजळलेल्या २ ते ३ मजली तरंगणाऱ्या जहाजातून बसून साऱ्या जगाला पाहून वेगळ्याच सेलिब्रेशनचा आनंद मी या वेळी घेईन. किती सुंदर असेल तो क्षण. आता फक्त काही दिवसांचाच कालावधी उरलाय. मग माझं सेलिब्रेशन जहाज अगदी हवेत असेल.
महेश कुलकर्णी
मित्रांनो, नववर्षांच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. ‘न्यू इयर’ सेलिब्रेशनचा आनंद व्यक्त करावा असं कुणाला वाटत नाही! लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकजण याची आतुरतेने वाट पाहत असतो. अलीकडे नववर्षांच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली रात्री-अपरात्री बाइक्स, डिस्कोज, बीयर बार्सचा गरवापर केला जातो. शुद्ध हरपलेल्या तरुणांना अखेरीस पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर ते शुद्धीत येऊन गुन्हा कबूल करतात, पण हे कितपत योग्य आहे? नववर्षांची सुरुवातच जर गुंडगिरी, गुन्हेगारीने होत असेल तर अशा सेलिब्रेशनचा काय फायदा? म्हणून यंदाच्या वर्षी तरी तरुणांनी उत्साहात, पण स्वत:ची शुद्ध हरपू न देता नववर्षांचं सेफ सेलिब्रेशन करावं.
नचिकेत परदेशी
तीन वर्षे होऊन गेली, कॉलेजला अलविदा केलं आणि नववर्षांच्या साथीने नवीन गोष्टी शोधण्यासाठी नव्या जगाच्या शोधात बाहेर पडलो. पूर्वी कॉलेजचा कट्टा म्हणजे आम्हा मित्रांची सेलिब्रेशनची हक्काची जागा. सकाळच्या कॉलेज असल्यामुळे मित्र सकाळी उठून कॉलेजला यायला कंटाळायचे; पण आजही आठवतंय, कॉलेजच्या त्या शेवटच्या वर्षी नववर्षांच्या निमित्ताने प्रत्येक जण वर्गात नाही तर कट्टय़ावर येऊन हजर होता. टपरीवरचा चहा, जवळचाच शिववडापाव, भय्याचा गोळा आणि चायनीज कॉर्नरवरची हक्का नूडल्सची एक प्लेट सगळ्यांनी वाटून खाल्ली होती. पण आता गेले ते दिवस. तो कट्टा, ती मजा, ते मित्र आणि ते सेलिब्रेशनसुद्धा. या वर्षी देवाकडे फक्त एकच मागणं, नव्या वर्षांच्या वाटेवर चांगले मित्र मिळूदेत आणि तीन वर्षांपूर्वी रंगलेलं सेलिब्रेशन पुन्हा पुन्हा प्रत्येक नव्या वर्षांत रंगूदे. माझ्या आठवणीतल्या माझ्या प्रत्येक मित्राला माझ्यातर्फे हॅपी न्यू इयर’.
श्वेता नारायणी
नवीन वर्षांच्या सगळ्या व्हिवा वाचकांना माझ्यातर्फे हार्दकि शुभेच्छा. अगदी नकळत कधी, केव्हा कळलंसुद्धा नाही आणि नवीन वर्ष समोर येऊन उभं राहिलंय. मित्र-मत्रिणींना नववर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिवातर्फे चांगली संधी मिळाली. यंदाच्या न्यू इयर सेलिब्रेशनचे माझे फंडे काहीसे वेगळे आहेत. गेल्या वर्षी मित्र-मत्रिणी, नातेवाइकांसोबत धमाल केली होती, पण यंदा मात्र मी माझ्या आवडत्या उपक्रमास म्हणजेच जंगल सफारीला जाऊन जंगलातच प्राणी-पक्ष्यांच्या सान्निध्यात न्यू इयर सेलिब्रेशन करणार आहे, कूल ना! लहानपणापासून पशुपक्ष्यांचं मला आकर्षण. पण रोजच्या बिझी शेडय़ुलमुळे ही हौस पूर्ण करता आली नाही, पण यंदा मात्र सेलिब्रेशन जंगलातच होईल हे नक्की!
रिमा जोशी
‘न्यू इयर’ची मी दरवर्षी आतुरतेने वाट बघते, याचं मुख्य कारण म्हणजे या दिवशी मस्त मस्त आवडत्या पदार्थावर ताव मारता येतो. दररोजच्या पोळीभाजीचा कंटाळा कोणाला येत नाही अहो! पण या दिवशी मात्र हक्काने आईबाबांकडे हट्ट करून गोड, तिखट, आंबट अशा चवदार पदार्थाची फर्माईश करता येते. मित्र-मत्रिणींबरोबर आवडत्या मॉलमध्ये जाऊन पिझ्झा, बर्गर, चायनीज वगरे पदार्थ मागवून आम्ही धमाल करणार आहोत. खाओ, पियो, ऐश करो हा आमच्या त्या दिवशीचा सेलिब्रेशन फण्डा असेल.
नीलेश विचारे
नववर्ष साजरं करीत असताना ओसंडून वाहत असणाऱ्या उत्साहात काय बरं दडलेलं असतं की सेलिब्रेशनचं मुलांना इतकं वेड असतं, या प्रश्नाचे उत्तर मला आजवर मिळालेले नाही. दारू पिणं, नॉनव्हेज खाणं किंवा इतरही वेगवेगळ्या पद्धतींनी हे सेलिब्रेशन होतं. पण यामागचं तात्पर्य काय असावं? केवळ नव्या वर्षांची सुरुवात एवढंच! माझ्या नवीन वर्षांची सुरुवात देवाचा आणि मोठय़ांचा आशीर्वाद घेऊनच सुरू होईल. आई-बाबांच्या अपेक्षा पूर्ण करणं, असा माझा साधासरळ संकल्प असेल आणि संध्याकाळी मोकळ्या वातावरणात मित्रांबरोबर फेरफटका मारला की माझी सेलिब्रेशनची व्याख्या पूर्ण होईल.