चुलबुली संगीतकार स्नेहा खानवलकर व्हिवा लाऊंजच्या व्यासपीठावर अवतरली आणि एक अनोखा माहौल तयार झाला. तिच्यातला अल्लडपणा अनेकांना भावला. पण त्याबरोबरीने तिचं गाणं आणि संगीताप्रती असलेलं तिचं प्रेम याचीही झलक पाहायला मिळाली. लाऊंजच्या व्यासपीठावर स्नेहाने उपस्थितांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंदोरी गायकी..
संगीत आणि स्नेहा हे समीकरण एवढं अतूट आहे की, त्याशिवाय वेगळा विचार ती करू शकत नाही. लहानपणापासून तिच्यावर संगीताचे संस्कार झाले. तिचं बालपण इंदोरमध्ये गेलं. ग्वाल्हेर घराण्याचे पं. राजुरकर हे स्नेहाच्या आईचे काका. तिच्या आईच्या कुटुंबातले अनेकजण संगीताशी निगडित होते. हे संगीतमय वातावरण ती लहानपणापासूनच अनुभवत होती. ऐकत होती. तिथं तिनं तानपुरा लावताना ऐकलंय. पहाटे उठून तासन् तास चालणारा रियाज ऐकला. ‘ऐकला’ अशासाठी की, ती लहान असल्यानं तिला खूप गायला लागायचं नाही. गायकी, शास्त्रीय संगीतादी विषयांवर चर्चा होत असे. या संगीताचं औपचारिक शिक्षण तिनं घेतलं नसलं तरी ते ऐकून तिचा बेस तयार झाला होता. या शास्त्रीय संगीताच्या माहोलमध्ये फिल्मी संगीत कुणाला फारसं आवडायचं नाही. मात्र स्नेहाला फिल्मी संगीत आवडायचं.

मुंबई आणि मी
पाचवीत असताना स्नेहा घरच्यांसोबत मुंबईला आली होती. दादरला काकूकडे उतरली होती. तिथं जाताना ती पोस्टर पाहत होती तिथंच उभी राहिली. भरपूर शोधाशोध झाल्यावर दीड तासानं ती तिथंच चित्रपटाचं पोस्टर पाहत उभी असलेली आढळली. ती सापडल्यावर आईचं आनंदानं रडणं आणि काकूचे प्रेमाचे धपाटे मिळाले होते. नंतर एस्सेल वर्ल्डला जाताना ट्रेनमध्ये बाबांची चुकामूक झाली होती. असे बरेच ‘हरवले-गवसले’चे प्रसंग घडल्यानं तिला मुंबई आवडली नव्हती. पण पुढं मुंबईला शिफ्ट झाल्यावर इथल्या जीवनानुभवांनी तिला केव्हाच आपलंसं केलं नि मुंबई आवडायला लागली.

गायिका व्हायचं होतं?
गायिका व्हायचं होतं की संगीतकार? यावर मिश्कीलपणं ती म्हणाली की, ‘त्यांना मला गायिका करायचं होतं.. मला फक्त गाणी आणि ती गाणाऱ्यांच्या स्टाइलबद्दल उत्सुकता असायची. त्या वेळी काही स्पर्धात्मक म्युझिक शो चालू होत होते. त्यात सहभागी होण्यासाठी खूप प्रॅक्टिस करायचे. पण त्यातून काही निष्पन्न झालं नाही. रियाज करून पुढं यात करिअर करण्यासाठी घरातल्यांचं थोडं प्रेशर होतं. असा रियाज करून शाळेत परफॉर्म करत असे, तेव्हा बाईंकडून नेहमीच ‘आगे बढो’चं प्रोत्साहन मिळत असे.’
स्नेहाचं कुटुंब ती अकरावीत असताना मुंबईला शिफ्ट झालं. तेव्हा तिच्या डोक्यात आíकटेक्ट व्हायचं होतं. कारण तिचे वडील इंजिनीअर. भावंडं इंजिनीअर-डॉक्टर. पण नंतर अ‍ॅनिमेशनचा कोर्स करता करता तिला वाटलं की, हे आपण पूर्ण वेळ करू शकणार नाही. सतत कॉम्युटरवर बसून सलगपणं काम करणं जमणार नाही. मग ज्यात रस नाही त्या अभ्यासक्रमात पुढं परदेशात वगरे जाऊन पसे का फुकट घालवेत, असं तिला वाटलं नि ती आर्ट डिरेक्शनकडे वळली.

माझी गाणी ऐका..
व्होकल ट्रेनिंग घेऊन मी गायिका होईन, असं घरी सांगितलं होतं. अ‍ॅनिमेशन आणि आर्ट डिरेक्शन मला अपील झालं नाही. ते व्यक्त करतानाही डोक्यात टय़ून्सच चालू असायच्या. अशा रीतीनं म्युझिक अपील झालं. जे काही आवडलं, त्यांचं लगेच कॉम्पोझिशन बनवलं. या आठ महिन्यांच्या ट्रेिनगमध्ये मी वॉकमनवर टय़ून्स रेकॉर्ड करत होते. आपल्या हातात काही तरी आहे, हे जाणवलं. करिअर करायचं तर बॉलिवूडमध्ये जायला पाहिजे, हे मनाशी ठरवलं. तिग्मांशू धुलियांना फोन केला. ‘सिनेमांसाठी गाणी करायचेत. मी तुम्हाला माझी गाणी ऐकवते,’ सांगितलं. त्यांनी मला भेटायला बोलावलं. गाणी ऐकून त्यांनी काम दिलं. त्यानंतर एक शीर्षकगीतही करून दिलं. पण दुर्दैवाने ती रिलीज झाली नाही. हे होतं माझं बॉलिवूडचं पहिलं काम. पण ते कुणाला माहीतच नाही. त्यानंतर माझी बॉलिवूडमध्ये एंट्री झाली ती वेगळ्याच सिनेमातून.    

असा होता दिलबहार..
‘सुपरचोर’ आणि ‘जुगनी’चं रेकॉìडग एकत्र होत होतं. दिलबहार हे गायक निरक्षर होते. पण त्यांची एक अट होती की, त्यांना वाचता येत नाही, हे कुणाला सांगायचं नाही. तालमीच्या वेळी इतर जण मला सांगायचे, त्यांना लिहून दे, मी आपलं, पाठ करू दे, म्हणायचे. तिकडं देशराजजींची दुसरी तऱ्हा. त्यांना वाचता येत होतं. ते वाचून पाठ करत. पण वयोमानामुळं थोडं विसरूनही जात. रेकॉìडगच्या दिवशी दिवाकरचे आई-वडीलही आले होते. पहिलं रेकॉìडग दिलबहारचं झालं. लंचनंतर देशराजना बोलवायला गेले तर ते झोपले होते. उठवल्यावर ते म्हणतात कसे, आत्ताच तर जेवलो. आता दोन तास गाणं शक्य नाही.. यावर मी अवाक झाले. दिवाकरनं ते समजून घेतलं.

यश आणि पैसा
संगीतात करिअर करण्याचा विचार ती करू लागली तेव्हा संगीतात करिअर करताना हे काही केवळ करिअर नाहीये, तर हे त्याहीपेक्षा निराळं काही तरी आहे. त्यात खूप डेप्थ आहे, असं जाणवत गेलं. कारण करिअर म्हणजे एक डेसिग्नेशन मिळालं, फिल्म मिळाली. यश मिळालं नि पसा कमवायला सुरुवात झाली. आपली एक लाइफस्टाइल तयार होणं वगरे. पण या चौकटीच्या पल्याड जाऊन संगीताचा विचार केला तर आपल्या आत दडलेल्या सूर-तालाचा शोध घ्यायला हवा. स्वरांशी संधान बांधायला हवं.. हे विचार मनात घोळत असताना लहानपणी ऐकलेल्या-गायलेल्या संगीताच्या सुरांची शिदोरी सोबत होतीच. इंदोरला असताना संगीत गाणं-ऐकणं हे थोडं जबरदस्तीनं झालं होतं. पण एका अर्थी ते बरं झालं. एखादं गाणं ऐकव, असं सांगितल्यावर आपला खेळ थांबवून आता गाणं गाऊन समोरच्याला इम्प्रेस करायला पाहिजे, आपलं गाणं चांगलं व्हायला पाहिजे.. असे विचार मनात यायचे. यातला गमतीचा भाग सोडला तर त्यामुळंच संगीत, त्यातली आवड-निवड आणि त्याविषयी विचार करणं ही प्रोसेस सतत चालू होती.

लोकसंगीत प्रिय
अभिजात संगीतापेक्षा लोकसंगीताचा बाज मला आवडला. त्यातला बंडखोरपणा भावला. तो अधिक जवळचा-आपलासा वाटला. संगीताच्या साहाय्यानं ते जणू संवादच साधतात. त्यामुळं एक्स्प्रेसिव्ह, गोड, हवं तिथं अग्रेसिव्हही असतं. त्यातल्या भावना, साधेपणा, सच्चेपणा मनाला स्पर्शून जातो. शहरात हे सगळं ऐकायला-शिकायला मिळालं नसतं. त्यादृष्टीनं हा एक मोठा खजिनाच मला गवसला. लोकसंगीताचा आधिक्यानं वापर मी संगीतात केला. लोकसंगीताविषयी आमच्या कुटुंबात नकारार्थी भावना उमटलेली नाहीये. ‘राजुरकर खानदान में क्रांती हो रही हैं’, असं असूनही अजूनही हार्मोनियम शिकलीस का नाही, असं मला विचारलं जातं.. रिबेल करायला निघाले होते, त्यात शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीतातल्या गाण्यांतली मजा कळली आणि ते अधिक खोलपणं समजून घेता आलं.

जरा शांत बस
इंदोरला असतानाही मी शांत नव्हते. कॅडबरीचं आमिष दाखवून मला शांत बसायला संगितलं जायचं. अशांतपणामुळंच मी अ‍ॅनिमेशन पुढं केलं नाही. माझ्या आत जास्त स्वस्थपणा आहेच. आपल्याकडं खूप माहिती आहे आणि त्याचं काय करावं, ते कळत नाहीये, यामुळं येणारी ही अस्वस्थता आहे. बिहारी गाणी नेहमीच तडकफडक असतात असं नाही, त्यातही सुरांतला शांती, गोडवा मला ऐकायला मिळाला. प्रांताप्रांतातलं संगीत भिन्न प्रकारचं आहे. त्यात शांतता, भक्तिभाव, विरह इत्यादी सूर असतातच.

चित्रपटांची निवड
रामूसोबत काम केलं तेव्हा मी आता रहमानसारखी ‘रंगिला’ होणार असं वाटलं होतं. पण ते घडलं नाही. यादरम्यान अनेक फेझेस आल्या. प्रत्येक बॅनर, प्रॉडक्शन, दिग्दर्शक वेगळा असतो. दिवाकरचा ‘खोसला’ कमíशअली गुड ठरला होता. ‘ओय लक्की लक्की ओय’ आणि ‘वासेपूर १’ आणि ‘वासेपूर २’ यांचं संगीत खूपच लोकप्रिय ठरलं. दिवाकर, अनुरागसोबत काम चालू असतं. नेहमी विचित्रच-वेगळं कर, असं नसतं. मी शिल्पा शेट्टी प्रॉडक्शनसोबतही एक गाणं करत्येय.

सूर आणि शब्द महत्त्वाचे
लोकसंगीतात तालाला महत्त्व आहे. तर चित्रपट संगीतात अनेकदा शब्दांना महत्त्व असतं. मी या दोन्ही प्रकारची रचना करते. समजा, ‘तार बिजली..’ ही एक ओळ लोककविता असेल. पुढं त्यात घरातले प्रश्न मांडले गेल्येत. आमच्या गीतकारानं विषयानुरूप ओळी लिहिल्या. काही वेळा काय होतं, ‘ओ वुमनिया’ एवढंच माझ्या डोक्यात होतं. पुढचं लिहिलं गेलं. मीटर अ‍ॅडजस्ट केलं जातं. लोकसंगीत गाणारे गायक परंपरेनुसार कडक दमात गाणारे असतात. त्यांना वरवर माहिती असते. लोकसंगीतात सूर आणि शब्दांना खूप महत्त्व आहे, हे जाणवलं.

पंजाबी गाण्याची मजा काही औरच..
‘ओय लक्की’नंतर मला पंजाबी गाण्याच्या ऑफर्स आल्या, मी फक्त पंजाबी संगीत थोडंच करणार? म्हणजे आता मी ते करू शकतेय. ‘टुंग..टुंग..’, ‘एलएसडी’नंतर, ‘वासेपूर’नंतर लोकसंगीताचा शिक्का माझ्यावर लागला होता. लोकसंगीताचा ही आधार घेते असं म्हटलं गेलं. पण मी ओरिजनली ते कम्पोज केलं होतं. म्हणून मला माझं असं काही दाखवायचं होतं. ‘ओय लक्की लक्की ओय’ हा त्याचा ट्रेलर होता. ‘वासेपूर’मध्ये ते दिसलं. त्यासाठी रस्टिक व्हॉइस हवा होता. पण तोही चौकटीपलीकडचा असावा, असं वाटलं. फोक म्युझिकचं कॅटॅगरायझेशन मला अजिबात आवडत नाही. माझ्यावर गाण्याचे संगीताचे संस्कार झाले असले तरीही हे पुस्तकी ज्ञान आहे, असं वाटत होतं. मग स्वत: अनुभव घ्यावा, असा विचार मनात आला. ओघानंच जिथलं संगीत द्यायचं आहे., तिथं जायला हवं, ते अनुभवायला हवं, असा विचार मनात आला. असा प्रवास न करताही संगीत देता येतं हे खरं, पण मला हा अनुभव घ्यायचा होता.

मराठीसाठी अजून वेळ आहे.
आपल्याकडं अजय-अतुलनी खूप काम केलंय. फक्त फिरून केलंय, असं नाही. थोडं दूर राहिलं तर आपल्याला हे काम करायचंय, ही भावना मनात राहते. मोठमोठय़ा गायकांनाही अमुक एक काम करायची इच्छा असते. पण त्यासाठीची योग्य संधी नि काळ येईपर्यंत थांबावं लागतं. तशी मी थांबल्येय..

थ्रिलिंग एक्सपिरिअन्स
खरक गावात मी मित्रासोबत गेले होते. एका रागिनी गायकाच्या घरी आम्ही राहिलो होतो. रागिनी गायक म्हणजे लोकगायक! तर त्यांचा कार्यक्रम होता. सगळेजण हे.. असे धिप्पाड आणि उंचपुरे! सोबत गांजा, दारू आणि गन्स असलेले हे लोक. आम्ही आठजण गाडीत बसलो होतो. गुडुप्प अंधार होत होता. जीव मुठीत धरून आम्ही प्रवास करत होतो, अशा वेळी धीर द्यायचा सोडून मित्र, ‘मी आता इथंच उतरतो, जातो’ची भाषा करायला लागला होता. बाकीचे सगळे आमच्याकडे रोखून बघत होते. असा प्रवास करत करत आम्ही मुक्कामी पोहोचलो, तेथे बायका – मुलं असलेली पाहून आम्ही भीती विसरलो, तिथल्या बुफेचा आस्वाद घेता घेता टिमसोबत बोलू लागलो, हळूहळू बायका-मुलांनी काढता पाय घेतला, मी एकटीच उरले. पुन्हा एकदा भीती वाटली. मग आम्ही भरपूर फोनाफोनी केली, तेव्हा एक सरदारजी गाडीवाले येऊन आम्हाला जाइन झाला. रात्री त्यांनी संगीत सुरू केलं. रागिनी स्पर्धा सुरू झाली. कोण सगळ्यात वरच्या पट्टीत गातं, हे पाहिलं जातं. संगीताचा पहाडीपणा, काहीसा आरडाओरडा असूनही ते कानाला गोड वाटत होतं. ‘गाणं विथ गन’ असा तो सॉलिड प्रसंग होता.
‘बहुत खूब’ म्हणून गाणं केलं होतं ‘वासेपूर’साठी. तिथल्या मुसहरांच्या गावात गेलो होतो. हे गरीब आणि अशिक्षित शेतकरी उंदीर मारून खातात. गावात गेल्यावर मुलांचा घोळका आमच्या मागं लागला होता. तिथं २० मिनिटांचं सेशन रेकॉìडग केलं. धक्काबुक्की चालली होती. त्यातल्या काही मुलांची नाकं गळत होती, कुणी रडत होतं.. ते सगळे आवाज रेकॉर्ड केले. त्यांच्या ताना-बोलणं हे सगळं रेकॉर्ड केलं. हे रेकॉर्डिग हा एक स्वीटेस्ट एक्सपिरियन्स होता.

‘काला रे’ची जादू
‘काला रे’ हे गाणं टेबलवर पडून मान खाली झुकवून गायलंय, असं सांगत स्नेहानं ‘काला रे सैंया..’च्या दोन ओळी गुणगुणल्या. त्याला ‘क्या बात हैं’ अशी दाद मिळाली. ज्या प्रांतात संगीतकार राहतो, वावरतो, तिथलं संगीत त्याच्या रचनांत डोकावतं, जसं बर्मदांच्या रचनांत दिसतं. मी अजून महाराष्ट्रीय किंवा इंदोरी संगीत केलेलं नाहीये. कदाचित ते अजून माझ्यात पूर्णपणे रुजायचंय..
पंजाबी संगीत ऐकायला कडक असंच आहे, आधी असं वाटायचं. पण त्यातही गोड संगीत आहे. टेम्पोवरही आहे. रागांवर आधारित आहे. नोटस् मिळून त्यांचं गाणं होतं. त्यांचा मरासिमपणा-निर्वासितपणा त्यातून डोकावतो. त्यांचा मारधाडीचा-पॅशनेट स्वभाव दिसतो. तर बिहारी संगीतात तिथली माणसं इतरत्र कामाला जायची त्या अनुषंगानं परदेसिया वगरे विषय येतात. तिथल्या माणसांचं दु:ख असतं, हे तिनं सोदाहरण दाखवून दिलं.

प्रवासाने खूप काही शिकवलंय..
प्रत्येक गाण्याच्या आधी थोडीशी भीती वाटते. आपण जे करतोय ते रसिकांना आवडेल का, हे आपण काय करतोय, असे विचार मनात येतात. मग गाणं होता होता हे काही तरी छान आकारास आलंय हे कळतं नि बरं वाटतं. व्होकल कािस्टगमध्ये सगळ्यात जास्त आनंद मिळतो. संगीतासाठी खूप फिरल्यामुळं निरनिराळे आवाज मी ऐकलेत. अगदी घाबरलेला आवाज, पान खाणारा आवाज आदींतही गोडवा आहे. विशेषत: आपल्या देशात वर्ल्ड म्युझिक आहे. बाहेरच्या देशातल्या लोकांना ते कळलं तर ते नक्कीच हे आवाज आपलेसे करतील. कर्नाटकातल्या येलापूरमध्ये आफ्रिकन जमातीतले काही सिद्दी लोक राहतात. त्यांच्यासोबत रेकॉर्ड केलं. त्यांचा आवाज आणि ऱ्हिदमसेन्स भारी आहे. त्यांनी मनात आणलं तर ते जगाला शिकवू शकतात. ते गाताना-वाजवताना एक आफ्रिकन फील येतो. ते गाणं दुर्गाने गायलंय. दुर्गा ही आंध्रमधल्या एका आदिवासी जमातीतली मुलगी. ती ट्रेनमध्ये गाते. ती कर्कश गात असली तरी सुंदर गाते.

डिसिजन मेकर
ओय लक्कीचं ‘तू राजा की’ गाणं टीनएज मुलांवर चित्रित होणार होतं. लहान मुलं भेटली होती.   ‘रागिनी’मध्ये लहान मुलांकडून गाऊन घेतलं जातं. टीनएजमध्ये त्यांच्याकडून गाणं तयार करून घेतलं जातं. या गाण्याच्या रचनेनुसार बालगायकाची निवड केली. संगीत करताना दिग्दर्शकाचा हस्तक्षेप नेहमीच असतो असं नाही. या गाण्याच्या वेळी दिवाकरनी स्ट्रेन काही वेळा चांगला वाटतो, असं सांगितलं होतं. ते मी ऐकलं. सिनेमॅटिकली ते चांगलं वाटतं. मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकल्येय.

तंत्रज्ञानाने क्रांती केलीय..
पूर्वीच्या काळी चित्रपटसंगीताचं ध्वनिमुद्रण म्हणजे मोठं प्रस्थ असायचं. शंभर शंभर वादकांचा ताफा,  एकाची चूक झाली तरी पुन्हा पहिल्यापासून ध्वनिमुद्रण करणं, गायक-गायिकांची तालीम या सगळ्यामुळं स्टुडियोमध्ये राजेशाही वातावरण असायचं. त्या वेळी त्या परिसरात सामान्य माणसाला शिरकाव करणंही शक्य नव्हतं. मात्र तंत्रज्ञान आल्यानंतर यापकी अनेक गोष्टींना फाटा मिळाला आणि ज्यांचा संगीताशी फारसा संबंध नाही, अशांनाही या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. एका अर्थानं तंत्रज्ञानानं केलेलं हे संगीताचं लोकशाहीकरणच आहे. त्यामुळं थोडं नुकसान होईलच.

चंदा रे माझ्या जवळचं गाणं..
माझ्या आवडीची अशी खूप गाणी आहेत. त्यातही ‘चंदा रे’ हे गाणं खूप स्वीट गाणं आहे.. एकदम मेलोडिक.. काय त्याची अरेंजमेंट आहे. काय त्यावर प्रभूदेवानं डान्स केलाय.. सूर वगरे सुंदर आहेत.. तसं गाणं करायचंय. तशी डाइव्ह मारायचेय.

प्रत्येक काळाशी संगीत बांधलेलं आहे..
काही वर्षांपूर्वीचं संगीत सुश्राव्य आहे, असं म्हटलं जातं. पुढच्या पन्नास वर्षांतलं संगीत तेवढंच परिणामकारी असेल का, असा प्रश्न प्रेक्षकांतून विचारला गेला. त्यावर स्नेहानं ‘असेल,’ असं उत्स्फूर्त उत्तर दिलं. काळानुसार काही गोष्टी बदलतात, काही तशाच राहतात. तंत्रज्ञानामुळं माणूसकीवर काही परिणाम होईल का, हा आधुनिकीकरणात पडलेला प्रश्न कायम असला तरी माणूसकी अजूनही कायम आहे. आपली बोलण्याची ढब बदलल्ये, त्याचं प्रतिबिंब गाण्यांत पडलेलं दिसतंय. म्हणून आताची एकमेकांशी संवाद साधण्याची स्टाइल पुढं जाऊन कदाचित कालबा ठरेल. पण संवादीपणा कायम राहील.
काळाशी बांधलं जाणं ही गोष्ट सगळीकडंच होते. नॉस्टेल्जिया असतोच. हल्लीच्या संगीतात दम नाही, हे काय गाणं आहे का, असं नौशाद म्हणाले होते. ते असं बोलले तर त्यांना तो अधिकार आहे. त्यांनी त्यांच्या काळात एकदम ग्रेट म्युझिक दिलंय. कालानुरूप संगीत दिलंय. एक उदाहरण देते- मी सध्या माझ्या वयाच्या किंवा थोडय़ा मोठय़ा वयाच्या ग्रुपसोबत काम करत्येय. आमचं टय़ुनिंग जमतं. पुढं १५-२० वर्षांनी माझ्यापेक्षा लहान वयाच्या ग्रुपसोबत काम केलं तर ते सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करणार नाहीत. टय़ुनिंग जमेल असं नाही..

वेगवेगळ्या हुशार व्यक्तिमत्त्वांना व्हिवातर्फे आमंत्रित केल्यामुळे या व्यक्तिमत्त्वांची हुशारी पाहण्याची संधी  सहजपणे लोकांना गवसते. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे अनुभव ऐकण्यास धमाल येते. स्नेहाबद्दल सांगायचं झालं तर स्वत:चं उत्तम करिअर घडवण्यासाठी कसं आणि कोणत्या पातळीला झपाटून काम करावं हे आजच्या युथने तिच्या अनुभवांतून शिकून घ्यावं. मी कार्यक्रमाची भरपूर मजा लुटली. तिने लोकसंगीताची जी झलक आपल्या गाण्यांतून दाखवली ती खरंच लक्षात राहण्यासारखी आहे. प्रेक्षकांकडून तिला विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नचं तिने समाधानकारक उत्तर देऊन प्रेक्षकांनाही खूश केलं.
भूषण चव्हाण

‘व्हिवा लाउंज’चा हा कार्यक्रम खूपच अवर्णनीय होता. संगीत क्षेत्राबद्दल मोलाचं मार्गदर्शन मिळालं. या कार्यक्रमादरम्यान छान गप्पांची मफल जमली होती. ‘व्हिवा लाउंज’मुळं आम्हाला एवढय़ा प्रसिद्ध सेलेब्रेटीबद्दल जाणून घेता आलं. त्यांच्याबरोबर संवादही साधता आला. त्याबद्दल थँक्स टू व्हिवा लाऊंज..
गार्गी बागडे

कार्यक्रम अतिशय उत्तम होता. स्नेहा खूप सुंदर दिसत होती. तिनं म्हटलेलं ‘काला रे’ गाणं मला खूप आवडलं. गाण्याला संगीत देण्यासाठी इतकी मेहनत घ्यावी लागते, हे प्रथमच कळलं. स्नेहाच्या खटय़ाळ स्वभावानं कार्यक्रमात रंगत आणली.
प्रज्ञा शिंदे

कार्यक्रम खूपच अप्रतिम झाला. एखाद्या गाण्याच्या प्राथमिक अवस्थेपासून ते त्याच्या फायनल टचपर्यंत जे काही काम करावं लागतं, ते स्नेहाकडून कळलं. आगळंवेगळं संगीत तयार करण्यासाठी किती चिकाटी, संशोधन, त्या त्या ठिकाणची संस्कृती जाणून घेणं आवश्यक आहे. संगीतात सतत नवनवीन प्रयोग करत राहिल्यानं नवीन प्रतिकृती साध्य होते, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या कार्यक्रमानंतर महिला वर्गात या फिल्डविषयीची उत्सुकता वाढली असेल.
– सत्यजित राऊत

झगमगाटाच्या मोहात न पडता कलेच्या क्षेत्रात सतत प्रयोगशील असणाऱ्या स्नेहा खानवलकरशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल लोकसत्ताचे मन:पूर्वक आभार. स्नेहाच्या कामाची शैली आणि कलेसाठीचा तिचा प्रामाणिकपणा हा आम्हा तरुणांना अनोखी ऊर्जा देणारा आहे.
अजिंक्य म्हाडगुत

खरं तर एखादी संस्था खूप प्रसिद्ध लोकांची मुलाखत घेते. पण स्नेहा खानवलकर ही एक उभरती कलाकार आहे. ही मुलाखत न वाटता लाइव्ह खुल्या गप्पा किंवा संवाद झाला. महत्त्वाचं म्हणजे तरुणांना वाव दिला गेला. एकतर्फी चर्चा न होता दुहेरी झाली आणि प्रेक्षकांना प्रश्न विचारायची संधी दिली गेली. त्यामुळं चर्चा फुलत गेली.
– सानिका कुसुरकर

हा कार्यक्रम खूप छानपणे आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे कला क्षेत्रातील बरीच माहिती मिळाली. स्नेहा खानवलकरने तिच्या क्षेत्रातील अनेक अनुभव सांगितले. त्याचप्रमाणे संगीताच्या शोधार्थ केलेल्या प्रवासातील काही किस्सेही सांगितले. संगीत नि गाणं कसं तयार होतं तेही या वेळी कळलं. हे सगळं ऐकत असताना बोअर झालं नाही.    
योगिता खरात

सगळ्यात आधी लोकसत्ता व्हिवा लाउंजचे खूप खूप धन्यवाद. संगीत क्षेत्रातील खूप तरुण आणि चलती असलेली स्नेह खानवलकरचं व्यक्तिमत्त्व आहे. एक स्त्री कुठल्याही क्षेत्रात तरबेज होऊन यशाचं शिखर गाठू शकते हे स्नेहाने आपल्या संगीत क्षेत्रातील कामगिरीतून सिद्ध केलंय. मला तिचं ‘ओ वुमनिया’ हे गाणं खूप आवडलं. ती केवळ एक हुशार संगीतकाराच नाही तर तिचा आवाजही सुरेख आहे. तिने कार्यक्रमात गायलेल्या गाण्यांच्या ओळी अजूनही मनात घर करून आहे. स्नेहाला भेटण्याची संधी दिल्याबद्दल व्हिवा लाउंजला पुन्हा एकदा धन्यवाद..
– दीपा गायकवाड

स्नेहा खानवलकरचा इव्हेंट खूपच अमेझिंग होता. विशेष म्हणजे मी स्वत: फिल्म क्षेत्रात टेकनिकल फिल्डमध्ये असल्यामुळे हा कार्यक्रम माझ्या करिअरशी अधिक संलग्न होता. व्हिवा लाउंज हा खरोखरच बेस्ट इव्हेंट आहे. कारण केवळ व्हिवामुळे आम्हाला सेलिब्रिटींना भेटून आमच्या शंका दूर करता येतात किंवा सम टाइम इट कॅन बी इन्स्पिरेशनल फॉर समवन ..
प्रसाद बाबर

नेहमीच्या साचेबद्ध हिंदी गाण्यांच्या पलीकडं जाऊन एखादी मराठी मुलगी इतक्या अल्प काळात स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण करत्येय, हे पाहून खूप अभिमान वाटला. स्नेहा खानवलकर यू रॉक! तुझ्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल खूप उत्सुकता वाटतेय. स्नेहाच्या मुलाखतीचं आयोजन केल्याबद्दल थँक्स टू ‘व्हिवा लाउंज’! यापुढंही अशाच छान मुलाखती ऐकायच्या आहेत.
ओमकार जुवेकर

स्नेहा ही अतिशय इनोव्हेटिव्ह आणि सिन्सिअर संगीतकार आहे. गाण्याला संगीत देताना त्यात काय हवं-नको याबद्दलचे तिचे विचार सुस्पष्ट आहेत. तिची महत्त्वाकांक्षा आणि प्रचंड मेहनतीची तयारी हे गुण तरुणाईनं घेण्यासारखे आहे. तिच्यासोबत काम करणं हे खूप चँलेंजिंग आहे, असं एक गायिका म्हणून मला वाटतं. एखादी संधी मिळाल्यास तिच्यासोबत काम करायला मला नक्की आवडेल.      
प्राची कोकिळ

व्हिवा लाउंजचे कार्यक्रम मस्तच होतात. मला स्नेहाचे ‘काला रे’ आणि ‘इलेक्ट्रिक पिया’ ही दोन गाणी प्रचंड आवडतात. ती निरागस आणि बालिश असली तरी संगीताच्या बाबतीत ती खूप परिपक्व आहे. मी तिची खूप मोठी चाहती आहे. तिला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला मिळाली त्यासाठी लोकसत्ताचे खरचं खूप धन्यवाद..
तेजस्विनी कोटलगी

ओय लक्की लक्की ओयस, गँग्ज ऑफ वासेपूरची स्नेहाने संगीतबद्ध केलेली गाणी मला खूप आवडली. तिच्या संगीतात बॉलीवूड आणि लोकसंगीत या दोघांचाही मेळ असल्याने तिची गाणी आपल्यातलीच वाटतात. मी  तिचं गाणं प्रत्यक्ष ऐकण्यासाठी आणि तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी ‘व्हिवा लाउंज’ला आलो होतो..
– विनायक तळेकर