कुठल्याही हॉटेलात जा..
मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.
टोफू नुडल्स सूप
साहित्य : टोफू तुकडे- ५० ग्रॅम, उकडलेले नुडल्स, लांबट कापलेला पातीचा कांदा, गाजरचे पातळ स्लाइस, गाजर पाकचॉय (चायनीज डिशमध्ये वापरली जाणारी भाजी आहे. असल्यास वापरा नाहीतर पत्ताकोबी वापरली तरी चालेल.) मशरूम स्लायसेस- २ ते ३, व्हेजिटेबल स्टॉक, तिळाचे तेल, सिझनिंगक्युबस्, किसलेले आलं, व्हाइट पेपर पावडर- १ चिमूट, (व्हाइट पेपर नसल्यास लांबट कापलेली हिरवी मिरची -१), मीठ- चवीनुसार.
कृती : १) स्टॉक उकळायला ठेवा. त्यामध्ये भाज्या घाला. दोन मिनिटांनतर नुडल्स, टोफू आणि मशरुम व इतर साहित्य सूपमध्ये घाला. गरमागरम सव्र्ह करा.
टीप : पावसाच्या दिवसांमध्ये असं गरमागरम सूप करून प्यायला खूप मजा येते. हे हेल्दी आणि पोटभरीचे सूप आहे.
रोमँटिक चहा
साहित्य : पाणी- ४ कप, पुदीना (चिरलेली)- १० ते १२ पाने, दालचिनी- १ स्टीक, लवंग- ४ ते ५, अख्खी काळीमिरी, मध- २ चमचे, साखर- १ चमचा, टी बॅग्ज- २ (नसेल तर साधा चहा- १ चमचा), लिंबू.
कृती : पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये मध, लिंबू आणि टी बॅग्ज सोडून इतर सर्व साहित्य टाका. साधारण ५ ते ७ मिनिटे उकळू द्या. आता टी बॅग्ज या पाण्यामध्ये टाका आणि २ ते ३ मिनिटे चहा उकळू द्या. आता लिंबू आणि मध टाका व चहा एका ग्लासमध्ये गाळून घ्या. िलबाच्या स्लाइसने गाíनश करून गरमागरम सव्र्ह करा.
टीप : सध्या मस्त पावसाळी वातावरण आहे. बाल्कनीमध्ये बसून गरमागरम हा चहा प्यायला मजा येते. ट्राय करा.
मेथी मूग पकोडी
पकोडीसाठी साहित्य : मुगाची डाळ- १ वाटी, आलं बारीक चिरलेलं- २ चमचे, हिरवी मिरची बारीक चिरलेली- २ चमचे, कोथिंबिर- ३ चमचे, मीठ- चवीनुसार, तेल, ओवा- अर्धा चमचा, चिरलेला कांदा- मध्यम आकाराचा, धनेपूड- अर्धा चमचा, हळद- पाव टी स्पून, हिंग, मेथी- १ जुडी
कृती : मुगाची डाळ भिजवावी ३ तासांनंतर ती मिक्सरमधून वाटून घ्यावी. आता वाटलेल्या मुगाच्या डाळीत बारीक चिरलेल आलं, बारीक चिरलेली मिरची, चिरलेली मेथी, कोथिंबिर, मीठ, तेल, ओवा, चिरलेला कांदा, धनेपूड, हळद व हिंग व्यवस्थित मिक्स करा व पकोडी बनवून तेलात तळून घ्या.
चीझी मसाला पॅटी
साहित्य : उकडून घेऊन कुस्करून घेतलेले रताळे- १ (रताळे नसेल तर बटाटा वापरला तरी चालेल), बारीक चिरलेली हिरवी मिरची, प्रोसेज्ड चिज, बारीक चिरलेली सिमला मिरची- १, बारीक चिरलेली कोथिंबिर, धणे पावडर, कॉर्नफ्लॉवर, मदा, तीळ- १ चमचा, चाट मसाला, मीठ- चवीनुसार, किसून घेतलेले गाजर, कसूरी मेथी.
कृती : वर दिलेले साहित्य व्यवस्थित एकत्र करा. त्याचे थोडे गोळे तयार करून हातावर दाबून त्याचे पॅटी तयार करून घ्या. मध्यम आचेवर तळून गरमागरम सव्र्ह करा.