दरवर्षी नव्या वर्षांच्या सुरुवातीला त्या वर्षीचा रंग जाहीर होतो. अमेरिकेतली पँटॉन या संस्थेची ‘कलर ऑफ द इअर’ जाहीर करण्यात मोनोपॉली आहे. पँटॉन कलर ऑफ द इअर जाहीर झाला, की जगभरातल्या मोठमोठय़ा कंपन्या, ब्रँड्च्या त्या रंगाला साजेसं नवीन कलेक्शन सादर करतात. दुकानांमधून, मोठय़ा शोरूममधून आणि फॅशन रँपवरून मग तोच रंग प्रकर्षांनं दिसू लागतो. मुलाचं नाव काय ठेवलं याची जशी उत्सुकता लागून राहिलेली असते तशी पँटॉन कलर ऑफ द इअरची सगळी फॅशन इंडस्ट्री उत्सुकतेनं वाट बघत असते.
या वर्षीचा रंग ‘रेडिअंट ऑर्किड’ म्हणून जाहीर झालाय. झळाळता जांभळट रंग आणि त्यामध्ये किंचित गुलाबी झाक म्हणजे रेडिअंट ऑर्किड. हा रंग शाही आहे आणि तरीही त्यामध्ये दुसऱ्याला भुलवण्याची जादू आहे. कल्पकतेला प्रेरणा देणारा असा हा रंग मानला गेलाय. आता रेडिअंट ऑर्किड कलरमध्ये नवीन कलेक्शन यायला लागलेय. कपडे, फूटवेअर, पर्स, अ‍ॅक्सेसरीजबरोबर जांभळ्या खडय़ांचे दागिनेही आता फॅशनध्ये येणार. आपलाही वॉर्डरोब या व्हायब्रंट रेडियंट ऑर्किडनं सजवायला तयार आहात ना?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा