‘तिला’ छंद रंग-रेषांचा, कागदी वस्तू तयार करायचा.. तिचं शिक्षणही कला क्षेत्रातलं. काही काळानं छंदाचं रूपांतर करिअरमध्ये झालं. ‘इन्स्टाग्राम’सह अनेक मोठय़ा ब्रॅण्ड्सची कामं, बेस्ट सेलर पुस्तकांची कव्हर्स ‘तिनं’ केली आहेत. थ्री डायमेन्शनल टायपोग्राफी करण्यात एक्स्पर्ट असणारी ही ‘कल्लाकार’ आहे सबिना कर्णिक.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एका कागदाला काही तरी आकार द्यायचा प्रयत्न.. एका कागदावर चार रेघोटय़ा मारून चित्र काढण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा हे प्रयत्न इतकेच राहतात. काही जण मात्र या प्रयत्नांत सातत्य राखतात आणि त्यात यशस्वी होतात. मग कागदाला येतो आकार, अक्षरांना मिळतं त्यांचं व्यक्तिमत्त्वं आणि साकारतं एक भन्नाट कॉम्बिनेशन. त्यातून ड्रॉइंग + पेपर + टायपोग्राफी = कला असं समीकरण तयार होतं. हे समीकरण घडवणारी कल्लाकार आहे सबिना कर्णिक. सबिनाला लहानपणापासून कला क्षेत्राची आवड होती. तिनं सोफाया पॉलिटेक्निकमधून कमर्शिअल आर्ट केलं. त्यात मुद्रणशैली अर्थात टायपोग्राफी हा तिचा मुख्य अभ्यासविषय होता. शिकताशिकता ती कागदाच्या खूप गोष्टी करून बघायची. उदाहरणार्थ, प्राणी-पक्षी वगरे करून त्यांना थ्रीडी इफेक्टस् द्यायची. सबिना सांगते की, ‘‘पदवीनंतर फ्रीलान्सिग सुरू केलं. लोगो डिझाइन, ग्राफिक डिझाइन वगरे कामं संगणकावर केली. ही कामं करताना वाटलं की, पेपर आणि टायपोग्राफी या दोन गोष्टी कंबाइन कराव्यात का.. मग त्या दृष्टीनं काही प्रयोग करू लागले. तेव्हा नुकतीच माझी वेबसाइट ६६६.२ुंील्लं‘ं१ल्ल्र‘.ूे क्रिएट केली होती. त्यावर या कामाचे फोटो टाकायला लागले. ए, बी, सी, डी ही अक्षरं टाकायला लागले. साधारण एफ-जी अक्षरांपर्यंत पोहोचले असताना तनिष्ककडून कॉल आला. त्यांच्या ज्वेलरीसाठी अॅड कॅम्पेन करायची होती. या प्रयोगातून काम मिळेल, अशी गोष्ट मनातही आली नव्हती. लोकांना माझं काम दिसलं, आवडलं आणि कामं मिळत गेली.’
त्यानंतर सबिनानं ‘झेड’पर्यंतची अक्षरं पूर्ण केली खरी, पण दरम्यान इतकं काम मिळायला लागलं की, तिला वाटलं की, हेच माझं करिअर होऊ शकतं. ती सांगते की, ‘‘कागद आणि रंग ही दिसायलाही साधीच गोष्ट. पण त्यात खूप काही करता येऊ शकतं. फक्त कागद, रंग, पोत, प्रकारांची जाण हवी. टायपोग्राफीमध्ये खूप स्कोप आहे सध्या काम करायला. हल्ली सगळे कम्युटरच वापरतात. सगळं डिजिटली करणं खूप सोप्पं आहे. पण हातानं काही तरी घडवणं, ड्रॉइंग काढणं, या गोष्टी आताशा पटकन बघायला मिळत नाहीत. आपली हस्तकलेची परंपरा हरवत चालली आहे. रोजच्या धावपळीत या गोष्टींसाठी लोकांना वेळ नाहीये. ही कला खूप मन लावून करायला लागते. ती टिकवून ठेवण्यासाठी लोकांचं लक्ष त्याकडं वेधायला हवं. काम मिळत गेलं, मी प्रयोग करत राहिले. आता हा माझा हातखंडा झाला आहे. थोडासा वेळ मिळाल्यास मला देवनागरीसाठी काम करायला आवडेल.’’
तिला देवनागरी आणि सुलेखनात रस वाटू लागला तो ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांच्यामुळे. त्यांच्या कार्यशाळेत ती सहभागी झाली होती. तिची देवनागरीही खूप स्ट्राँग आहे. पण काम अधिकांशी परदेशातील असल्यानं इंग्रजीतच असतं. रोमन अल्फाबेटचे फॉर्म खूप वेगळे आणि मराठी अक्षरांना खूप कव्र्हस् आहेत, तरी ते करणं खूप इंटरेिस्टग आहे. सबिनाचं आर्टवर्क कसं तयार होतं तर आधी ती पेन्सिलनं स्केच काढते. उदाहरणार्थ, ‘ए’ अक्षराचे त्याचे वेगवेगळे फॉम्र्स काढून ते क्लायंटला दाखवते. नंतर रंगवून दाखवते. पण फायनल पेपरवर्क करायचं तर एकेक अक्षराला साधारण एक-दोन दिवस लागतात. एका दिवसात तिला कमीत कमी १२ तास काम करावं लागतं. या कामात खूपच नेमकेपणा लागतो. कारण एकदा पेपर चिटकवला की, तो काढता येत नाही. आर्टवर्क झाल्यावर त्याची फोटोग्राफी होऊन मग फायनल चित्र क्लायंटला पाठवण्यात येतं. ‘तनिष्क’नंतर तिला परदेशांतून पुष्कळ ऑर्डर्स आल्या. तिनं वेगवेगळ्या मॅगझिनची कव्हर्स केली. उदाहरणार्थ- Vpro gids magazine cover, Crains Chicago Business magazine cover, Latam airlines magazine वगरे. काही अॅड कॅम्पेन केल्या.
पुस्तकांची कव्हर्स केली. अमेरिकन बेस्टसेलर लेखक तमारा आर्यलड स्टोन यांच्या ‘टाइम अॅण्ड टाइम अगेन’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ तिनं अत्यंत कल्पकतेनं साकारलं आहे. गेल्या वर्षी सबिनानं ‘इन्स्टाग्राम’साठी काही चित्रं तयार करून पाठवली. त्यांच्या सॅनफ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात हे आर्टवर्क लावलेलं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारची कामं तिच्याकडं आली नि येताहेत. आपल्याकडच्या कामाचं एक उदाहरण सांगायचं तर, दसऱ्याला ‘म्हैसूर पॅलेस’ची सुंदर सजावट केली जाते. त्यायोगे पर्यटनाला अधिक चालना मिळवण्याचा उद्देश असतो. त्याच संदर्भात ‘कर्नाटक टुरिझम’तर्फे सबिनाला विचारणा झाली आणि पर्यटकांपुढं आली एक छानशी जाहिरात. खरं तर तिला जाहिरात म्हणावं की आर्टवर्क, हा प्रश्न पडला अनेकांना.. म्हैसूर पॅलेसवर आधारलेलं डिझाईन नि उत्सवी वातावरणाचा फिल देणारी ही जाहिरात एअरपोर्ट, काही जागतिक दर्जाच्या मासिकांमध्ये प्रसिद्ध झाली. हे कॅम्पेन खूपच चांगलं झालं होतं. त्यानंतर गेल्या ऑलिम्पिक्समध्ये सहभागी झालेल्या यूएसएच्या स्वििमग टीमसाठी तिनं केलेलं आर्टवर्क खूप नावाजलं गेलं. त्यात टायपोग्राफी अजिबात नव्हती. या आर्टवर्कचा उपयोग बिलबोर्डस्, बॅनर्स, कमíशअल्स, वॉलआर्ट, कॅलेंडरवर टीमच्या प्रमोटिंगसाठी केला गेला. अजूनही पुढचे प्रोजेक्ट करताना या कामाचा संदर्भ दिला जातो.
सध्या सबिनाकडे ऑर्डर्स पूर्ण करायच्या असल्यानं पुरेसा वेळ नाही, पण पुढंमागं तिला ही कला लोकांना शिकवायला आवडेल. ती म्हणते की, ‘‘शिकवायला थोडा वेळ लागेल. कारण मी स्वत: हे पेपरआर्ट प्रयोग करत करतच शिकले आहे. मी करत असलेल्या पेपरआर्टला ‘क्वििलग’ म्हणतात हेही मला माहिती नव्हतं. क्वििलगचं टूल असतं, हे लोकांकडून कळल्यावर मी ते विकत घेतलं. कारण तोपर्यंत मी आर्टवर्क हात, स्ट्रॉ, पेंटब्रशनं करत होते. या महिन्यात मला परदेशात बोलावलंय मुलांना आर्टवर्क शिकवायला. त्यासाठी थोडा अभ्यास करणं चालू आहे. ‘‘पेपरक्वििलग म्हणजे लोकांना फक्त ज्युलरी आणि ग्रीटिंग कार्डच्या माध्यमातून माहिती असतं. पण सबिनाच्या कामामुळं त्यातलं आर्टवर्क अनेकांपर्यंत पोहोचलं. हे आर्टवर्क दिसायला सोप्पं वाटतं, पण करायला तितकंच कठीण आहे. त्यासाठी लागते कलादृष्टी, चांगलं ड्रॉइंग, रंग-कागद आदी माध्यमाची जाण, सर्जनशीलता आणि एकाग्रता. हे पेपर आर्टवर्क ती गेली पाच र्वष करतेय. सतत ऑर्डर्स येत राहतात. वेळच मिळत नाही. मग काही वेळा काही कामांना नाही म्हणावं लागतं. तेव्हा वाईट वाटतं. पण वेळेचं गणित दर वेळीच जमतं असं नाही. सध्या सगळं आर्टवर्क ती एकटीच करते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं काम सर्वदूर पोहोचू शकतं, असं तिला वाटतं. इन्स्टाग्रामवरील तिच्या @sabeenu या अकाऊंटचे ७८ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
भारतीय क्लायंट आणि परदेशी क्लायंटच्या मानसिकतेत तिला फरक जाणवतो. आपल्याकडे अजूनही कलादृष्टी विकसित व्हायला वाव आहे. ती म्हणते की, ‘‘अजून आपल्याकडचे लोक थोडे घाबरतात चौकटीबाहेर पडायला. रिस्क घ्यायला. तुलनेनं आपल्याकडे फोटोग्राफी आणि डिजिटल माध्यमाला खूप महत्त्व दिलं जातं. जे पटकन होईल ते आणि स्वस्त असेल ते स्वीकारून थोडं कॉम्प्रोमाइझ केलं जातं. हे बदलायला हवं. आपल्या पारंपरिक नि सुंदर कलासंस्कृतीला प्रोत्साहन द्यायला हवं. त्यासाठी जाहिरातींसारख्या माध्यमांचा वापर व्हायला हवा. मला ते माझ्या परीनं प्रमोट करायला आवडेल. ‘कला’ या गोष्टीचं महत्त्व वाढायला हवं. मी आतापर्यंत अमेरिकन, युरोपियन आदी परदेशी लोकांसोबत काम केलंय. ते कलेला खूप महत्त्व देतात. त्यातही हे आर्टवर्क पाहून ते अचंबित होतात. योग्य कौतुक करतात. या कामासाठी लागणारा वेळ आणि आविष्कारस्वातंत्र्य देतात. कलाकारांवर विश्वास ठेवतात.’ सध्या एका लेखिकेच्या वेबसाइटसाठी डिझाईन सबिना करते आहे. जागतिक दर्जाच्या टायपोग्राफीवरील पुस्तकात तिच्या कामाची दखल घेतली जाणार आहे. न्यूयॉर्कच्या एका प्रकाशनाच्या कव्हरपेजचं डिझाइनही ती करते आहे. तिच्या कागद आणि रंगांच्या दुनियेच्या गोष्टी अधिक कलात्मक होवोत, या अक्षर शुभेच्छा!