|| तेजश्री गायकवाड

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांच्या आरोग्यासाठी कपड्यांपेक्षा पॅड वापरण्यावर आजही भर दिला जातो. परंतु या वापरलेल्या पॅडचं योग्य प्रकारे, पर्यावरणाला त्रास न होता विघटन कसं करायचं?, हा सध्याचा मोठा प्रश्न आहे. याचं उत्तर शोधण्यासाठी अनेक तरुण-तरुणी आपापल्या पद्धतीने संशोधन करत आहेत. अशाच प्रयत्नातून पुण्यातील तरुणांनी जुलै २०१८ मध्ये ‘पॅड केअर बिन’ या स्टार्टअपची सुरुवात केली. सध्या या टीमने मंत्रालयात ‘पॅड के अर बिन्स’ बसवले आहेत. मासिक पाळी दरम्यान वापरल्या गेलेल्या सॅनिटरी पॅड्सची विल्हेवाट लावणारी ही पॅड के अर लॅब आणि पॅड के अर बिन्सची नेमकी संकल्पना काय आहे आणि त्याचा वापर कसा के ला जातो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ने के ला.

मेकॅनिकल इंजिनीअरिंग झालेल्या अजिंक्य धारिया आणि त्याच्या टीमने हे पॅड के अर बिन्स आणि लॅब विकसित के ली आहे. समाजातील अतिशय महत्त्वाच्या समस्येवर उपाय शोधण्याची ही प्रक्रिया नेमकी कशी सुरू झाली याबद्दल तो सांगतो, ‘२०१७ साली माझं मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाचं प्रोजेक्ट आम्हाला करायचं होतं. त्यासाठी समाजात नेमक्या काय समस्या आहेत त्या हेरायच्या आणि त्यावर उपायात्मक योजना काय असेल?, या विचाराने काम करायचं होतं. कोणता विषय निवडायचा हा विचार करत असताना एक दृश्य मी पाहिलं, ज्याने मला विचार करायला भाग पाडलं’. हातात ग्लोव्हज वगैरे काही न घातला सफाई कर्मचाऱ्यांना कचऱ्यातून वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स किं वा पॅड उचलताना मी पाहिलं. तेव्हाच मला यावर गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचं जाणवलं, असं अजिंक्य सांगतो.

मुळात एरव्ही हे पॅड डिस्पोज क से के ले जातात, याची कल्पना नसलेल्या अजिंक्यने या प्रसंगानंतर घरी आई-बहीण, मैत्रिणींना ते वापरत असलेले पॅड्स डिस्पोज कसे करतात?, हा प्रशद्ब्रा विचारायला सुरूवात के ली. त्यावर प्रायव्हसीमुळे हे पॅड्स आम्ही असेच पेपरमध्ये गुंडाळून फे कू न देतो, असं उत्तर त्यांच्याकडून मिळालं, असं तो म्हणतो. मात्र यापध्दतीने फे कू न देण्यापेक्षा स्वच्छतागृहातच त्याची पूर्ण विल्हेवाट लावण्याची सोय झाली तर त्याचा खूप फायदा होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त के ली. त्यामुळे आपल्याला कामासाठी विषय मिळाला आहे, हे लक्षात आलेल्या अजिंक्यने त्या दिशेने आपल्या कामाची सुरूवात के ली. ‘२०१८ मध्ये मला या विषयावर काम करण्यासाठी ‘सोच’ नावाची फेलोशिप मिळाली. प्रोजेक्टच्या सुरुवातीला आम्ही टीमने मिळून १ हजार ५०० महिलांचा सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये आमच्या टीमने महिलांच्या सगळ्या समस्या जाणून घेत त्यावर अभ्यास केला. या अभ्यासातून हे लक्षात आलं की वापरलेल्या पॅडची विल्हेवाट लावणं किळसवाणं न वाटता ते स्वच्छतापूर्ण पद्धतीने कसं करता येईल?, हा विचार स्त्रिया करत होत्या. वापरलेले पॅड्स स्वच्छ पध्दतीने नष्ट करता येण्याची सोय असणं ही त्यांची गरज लक्षात आली आणि या अभ्यासातून खऱ्या अर्थाने ‘पॅड केअर लॅब’ या स्टार्टअपला सुरवात झाली’, अशा शब्दांत अजिंक्यने स्टार्टअपचा प्रवास उलगडला. अजिंक्य या स्टार्टअपचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. आसावरी काने,श्रीनिवास अधे, जेना शहा,आकाश पाटील, अनया शेठ, अवनी डार्णे अशी तरुण टीम त्याच्याबरोबर काम करते आहे.

‘पॅड केअर लॅब’ नक्की काय आणि कशा पद्धतीने काम करते?, याबद्दल त्यांची रिसर्च सायंटिस्ट आसावरी काने सांगते, पॅड केअर लॅबच्या संपूर्ण प्रोसेसवरती मी काम केलं आहे. कॉलेजमध्ये असताना हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या आम्हा मुलींना नेहमी वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट कशी लावायची?, हा प्रश्न कायम छळायचा. हॉस्टेलमध्ये पॅड नष्ट करण्यासाठी इन्सिरेटर बसवलेले होते, परंतु त्याचा वापर करणं टाळलं जायचं. मला तर सुरुवातीला त्याबद्दल काही माहितीही नव्हती. मात्र त्याचा उद्देश समजल्यावर मी ते वापरायला सुरुवात केली. पण इन्सिरेटरमध्ये पॅड नष्ट करताना वास येतो, धूरही होतो आणि याच कारणास्तव त्याचा वापरही के ला जात नव्हता. ही सिस्टिम योग्य नाही याची खूणगाठ मनाशी बांधून पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट कशी करायची?, यावर आम्ही सखोल अभ्यास सुरू के ला’. मी आणि माझ्या टीमने ‘पॅड केअर बिन’ आणि पॅड डिस्पोज करणारी  मशीन तयार केली. ‘पॅड केअर बिन’ प्रत्येक टॉयलेटमध्ये बसवले जातात. ज्यामुळे प्रत्येक महिलेची प्रायव्हसीसुद्धा राखली जाते. वापरलेले पॅड्स या ‘पॅड के अर बिन’मध्ये टाकले जातात. त्यात एकू ण ३० सॅनिटरी पॅड्स स्टोअर करण्याची क्षमता आहे. या बिनला स्पर्श न करता तुम्ही त्यामध्ये वापरलेला पॅड सहज टाकू शकता. हे बिन ९९.९९ % विषाणूविरहित आहेत. आम्ही हे बिन दर १५ दिवसांनी खाली करून आमच्या लॅबमध्ये घेऊन येतो. त्यावर आमच्या मशीनमध्ये प्रोसेस के ली जाते. ही प्रोसेसे संपूर्णपणे धूरविरहीत असते. पॅडच्या विघटनानंतर त्यातून पुन्हा वापरता येईल असं सेल्युलोज आणि प्लास्टिक तयार होतं, असं आसावरीने सांगितलं. याच प्लास्टिकचा वापर पुढे कुंडी, पेवर ब्लॉक्स अशा अनेक गोष्टी बनवण्यासाठी के ला जातो. त्यामुळे ज्या पॅडचं नैसर्गिक पद्धतीने विघटन होण्यासाठी तब्बल ५०० ते ८०० वर्ष लागतात, त्याचं काही दिवसांतच विघटन होऊन त्यापासून वापरण्यायुक्त अशा गोष्टींचीही निर्मिती केली जाते, अशी माहिती आसावरीने दिली. ‘पॅड केअर लॅब’ ही जगातील पहिली धूरविरहीत पॅडचं विघटन करणारी आणि रिसायकल करणारी सिस्टिम ठरली आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावून सस्टेनेबल सोसायटी घडवायचं काम या टीमला करायचं आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pad care lab pad care bin in toilet akp