दरवर्षी पॅन्टोनच्या वतीने ‘कलर ऑफ द इयर’ जाहीर केला जातो. पॅन्टोनच्या ‘कलर ऑफ द इयर’ प्रथेला जगभरातील विविध क्षेत्रात मान्यता मिळाली आहे. हल्ली पेंट्स आणि अन्य उत्पादक कंपन्या विशेषत: फर्निचरच्या कंपन्यांपैकी काहींनी स्वत:चा असा दरवर्षीचा कलर निवडून जाहीर करायला सुरुवात केली आहे. मात्र त्यामुळे पॅन्टोनच्या कलर ऑफ द इयरची लोकप्रियता कमी झालेली नाही. यंदा पॅन्टोनने कोणता कलर जाहीर केला आहे आणि त्याची वैशिष्ट्ये काय हे जाणून घेऊ…

वय कोणतंही असो, कॉफी ही सगळ्यांनाच कायम प्रिय! तरुणाईसाठी तर कॉफी म्हणजे विशेष प्रेम. मिलेनियल्स आधीच मोठे तिशी पार करून गेले आहेत आणि जेन-झीसुद्धा आता टीनेजर राहिलेले नाहीत. सगळ्यांना शांत आणि निवांत तरीही उत्साही असा माहौल हवा आहे. लवकर थकणाऱ्या आणि सहज कंटाळणाऱ्या या पिढ्यांना सतत काहीतरी नवीन हवं असतं आणि त्यातच मिनीमलिस्टसुद्धा राहायचं असतं. एकाच वस्तूमध्ये अनेक वस्तूंचा उपयोग, घरातच ऑफिस, कामातच आनंद आणि छोटासा असला तरी ब्रेक फ्रेशनेस देणारा असला पाहिजे. यावर्षीचा पॅन्टोन ‘कलर ऑफ द इयर’सुद्धा अशाच पद्धतीने या सगळ्या आवडीनिवडी आणि प्राधान्यक्रम लक्षात घेऊन निवडला गेला आहे. २०२५ साठी कलर ऑफ द इयर आहे ‘मोका मूस’. ज्यात थोडं चॉकलेट, थोडी कॉफी, थोडं कोको अशा अनेक डार्क आणि लाइट शेड्सचं मिश्रण आहे.

loksatta editorial on ceasefire between israel and hamas
अग्रलेख : मर्दुमकीच्या मर्यादा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
digital revolution impact of digital usage on social and mental health
डिजिटल जिंदगी : तुम बिन जिया जाए कैसे..?
loksatta editorial Supreme court verdict on madrasa
अग्रलेख: मदरसे ‘कबूल’
Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
new isro chief v narayanan
व्यक्तिवेध : डॉ. व्ही. नारायणन
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…

हेही वाचा >>> डिजिटल जिंदगी : तुम बिन जिया जाए कैसे..?

हे वर्षभर कपड्यांपासून घरातल्या भिंतीपर्यंत आणि स्वयंपाकघरातील क्रोकरीपासून दिवाणखान्यातील पडद्यांपर्यंत सगळ्यावर कोणत्या रंगाचा प्रभाव अधिक असू शकतो, याची कल्पना दरवर्षी ‘पॅन्टोन’च्या कलर ऑफ द इयरच्या घोषणेतून येते. यंदा पॅन्टोनने ‘मोका मूस’ हा यावर्षीचा रंग म्हणून जाहीर केला आहे. या रंगाच्या निवडीबद्दल बोलताना पॅन्टोनच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणतात, ‘कॉम्प्लेक्स नसलेला असा रंग म्हणजे सहजपणे हवासा वाटणारा रंग. सिंपल तरीही लक्झरिअस फील देणारा रंग म्हणजे मोका मूस. ज्यात हरवून जावं असा हा रंग आहे. सोफिस्टिकेटेड आणि क्लासी असा हा रंग आहे.’ तर पॅन्टोनच्या वाइस-प्रेसिडेंटच्या मते ‘मोका मूस हा रंग ब्राऊनला थोडा पॉलिश करणारा आणि कमी डार्क करून उत्साही, आनंदी करणारा आहे.’ एरव्ही आपल्याकडे मळखाऊ म्हणून गणना होणाऱ्या ब्राऊन म्हणजेच तपकिरी रंगाची ही एक वेगळीच क्लासी शेड म्हणता येईल. यावर्षीच्या कलर ऑफ द इयरसाठी अनेक ब्रँड्सनी पॅन्टोनशी जोडून घेत आपली उत्पादनं तयार केली आहेत. यात अगदी इयर बड्सपासून ते सोफ्यापर्यंत आणि फर्निचरपासून ते किचनवेअरपर्यंत अनेक गोष्टी आहेत. मोटोरोलाने मोका मूस या रंगापासून प्रेरणा घेत नॉर्मल फोन आणि फ्लिप फोनमध्येसुद्धा हा रंग आणला आहे. यावर्षी अनेक सेलेब्रिटींच्या कपड्यांपासून ते अगदी शूजपर्यंत सगळ्यामध्ये हा रंग दिसला तर नवल वाटायला नको.

मोका मूस हा रंग केवळ लक्झरी नव्हे तर ‘सस्टेनेबल लिव्हिंग’ या संकल्पनेलाही जोडून घेतो. या रंगात जितकी लेदरची लक्झरी आहे तितकाच मातीचा फील आहे. त्यामुळे हा रंग मातीशी मनाला जोडण्याचं एक माध्यम ठरेल. जितका हा रंग कॉफीशी जोडला जातो, तितकाच तो चॉकलेटशीही जोडला जातो. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आपलासा वाटणारा हा रंग यावर्षी ‘कलर ऑफ द इयर’ ठरवला गेला आहे. सगळ्याच वयोगटाला समाविष्ट करणारा हा रंग असल्याने यावर्षी मार्केटमध्ये या रंगाची चलती सगळ्याच गोष्टींमध्ये पाहायला मिळेल.

दरवर्षी कलर ऑफ द इयर ठरवताना त्या त्या वर्षीच्या मूडचा अंदाज घेतला जातो आणि कंझ्युमर सायकॉलॉजी अर्थात ग्राहक मानसशास्त्र यांचा विचार केला जातो. नवीन वर्ष हे फ्रेश आणि उत्साहाचं जावं हा या रंगामागचा हेतू आहे. मोका मूस या रंगामध्ये ब्राऊन, पिवळा, पांढरा, काळा अशा अनेक रंगांच्या हलक्या-हलक्या शेड्स आहेत. हा रंग फारसा गडदही नाहीये आणि अगदी फिकाही नाहीये. वाईट, दु:खी ते अतिउत्साही, उथळ या स्वभावांच्या आणि मूड्सच्या मध्ये बॅलन्स साधणारी अशी ही छटा आहे. सगळ्या अनुभवांतून मिळालेली मध्यम मार्गाची शांतता दाखवणारा हा रंग आहे. या रंगाला खोल गंभीरपणाही आहे आणि शांत सकारात्मकताही आहे. नवीन वर्षात सगळ्यांचा मूड शांत, स्टेबल आणि सकारात्मक असावा यासाठी या रंगछटेची निवड यंदा केली गेली आहे.

२०२५ मध्ये सगळ्यांनी वेळप्रसंगी गंभीर तरीही हसतखेळत राहावं या उद्देशाने आलेला हा मोका मूस सगळ्यांना वर्षभर कॉफी आणि मातीचा दरवळ देत राहील यात शंका नाही.

viva@expressindia.com

Story img Loader