तेजश्री गायकवाड  viva@expressindia.com

दरवर्षी डिझायनर आणि ट्रेण्ड फोरकास्टर्स ‘पॅन्टोन’ कंपनीकडून जाहीर केल्या जाणाऱ्या वर्षांच्या नव्या रंगाची आतुरतेने वाट पाहत असतात. या कंपनीद्वारे जाहीर झालेला रंग ग्लोबली फक्त फॅशनच नाही तर प्रत्येक प्रॉडक्ट्मध्ये फॉलो केला जातो. ही कंपनी २३ वर्षांपासून अशा पद्धतीने हे रंग जाहीर करते आहे. या वर्षी कंपनीने ‘व्हेरी पेरी’ या आगळय़ावेगळय़ा नावाच्या रंगाची घोषणा केली आहे..

The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
last show of Vastra Haran in new set was held today in Thane
नव्या संचातील ‘वस्त्रहरण’चा शेवटचा प्रयोग आज ठाण्यात, नेत्यांनाही भुरळ
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी

‘पॅन्टोन कलर ऑफ द इअर’ची निवड प्रक्रिया विस्तृत आणि  विचारपूर्वक केली जाते. सध्या लोकांचा कल काय आहे, जगभरात काय काय घडलं आहे, याचा अभ्यास करून रंगाची निवड केली जाते. दरवर्षी नव्या रंगाची निवड करताना ‘पॅन्टोन कलर इन्स्टिटय़ूट’मधील रंगतज्ज्ञ जगावर नवीन कोणत्या रंगाचा प्रभाव पडेल हे आवर्जून बघतात. निवड प्रक्रियेत मनोरंजन इंडस्ट्री, ट्रॅव्हल आर्ट कलेक्शन, फॅशन डिझाइनमधील सर्व क्षेत्रे, लोकप्रिय प्रवासाची ठिकाणे तसेच नवीन जीवनशैली, प्ले स्टाइल आणि सामाजिक – आर्थिक परिस्थिती या सगळय़ाचा तुलनात्मक अभ्यास समाविष्ट केला जातो. या रंगाचा वापर ग्लोबल ते लोकल मार्केटमध्ये केला जातो. 

यंदा व्हेरी पेरी (Very Peri) या रंगांची निवड करण्यात आली आहे. पॅन्टोनच्या मते, हा रंग डायनॅमिक पेरी निळा छटा असलेला आहे. यामध्ये गडद व्हॉयलेट लाल रंग आहे. निळय़ाची विश्वासू आणि स्थिरता, लाल रंगाची ऊर्जा आणि उत्साह यांचे मिश्रण या रंगात आहे. हा रंग ‘पॅन्टोन१७ – ३९३८’ म्हणून ओळखला जाणारा ‘व्हेरी पेरी’ रंग असून सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा रंग अशी या रंगाबद्दलची धारणा आहे.

आपल्या जगण्याच्या शैलीवर रंगांचा खूप प्रभाव पडतो. सध्या आपण परिवर्तनाच्या काळात जगत आहोत. व्हेरी पेरी हे आपण ज्या संक्रमणातून जात आहोत त्याचे प्रतीक आहे. एकीकडे आपण एकाकीपणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी विविध पर्याय चोखाळले जात आहेत. अगदी एकाकीपणा घालवण्यासाठीची सोबत शोधतानाही त्याबद्दलचे ठरावीक ठोकताळे मागे पडले आहेत. प्रत्यक्ष एखादी गोष्ट साध्य होत नसेल, अगदी जवळच्या व्यक्तीचा सहवासही प्रत्यक्ष नाही तर आभासी स्तरावर का होईना मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. प्रत्यक्ष किंवा भौतिक जीवन हे आभासी तंत्रज्ञानाला जोडले गेले आहे. डिजिटल तंत्रज्ञान वास्तविकतेच्या मर्यादा वाढवण्यास मदत करते. या सगळय़ा गोष्टींचे प्रतििबब या नव्या रंगात उमटले आहे. 

‘‘पॅन्टोनने जाहीर केलेला हा वर्षांचा रंग आपल्या जागतिक संस्कृतीत काय घडतं आहे ते प्रतिबिंबित करतो,’’ असं  ‘पॅन्टोन कलर इन्स्टिटय़ूट’चे उपाध्यक्ष लॉरी प्रेसमन यांनी त्यांच्या संकेतस्थळावरील निवेदनात नमूद केले आहे. ‘‘रंग हा संवादाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. कल्पना आणि भावना व्यक्त करणारे, एकमेकांवर प्रभाव टाकणारे, एकमेकांशी जोडून घेणारे माध्यम म्हणून रंग महत्त्वाची भूमिका बजावतात,’’  असंही लॉरी प्रेसमन सांगतात. ‘कलर ऑफ द इअर’चा फक्त फॅशन नाही तर अनेक इंडस्ट्रीवर खूप मोठा प्रभाव पडतो. तुम्ही बाजारात एक नजर टाकली तरी तुम्हाला या रंगाच्या वस्तू या वर्षभरात दिसून येतील. डिजिटलीही तुम्हाला हा रंग नेटीझन्सच्या फोटो बॅकग्राऊंडमध्ये, कपडय़ांमध्ये, व्हिडीओमध्ये, त्यांनी वापरलेल्या अ‍ॅक्सेसरीजमध्ये दिसून येईल. येणाऱ्या स्प्रिंग-समर कलेक्शनमध्येही तुम्हाला हा रंग आवर्जून दिसेल. एवढंच काय, हा रंग घर सजवताना, घराचं इंटिरिअर करतानाही वापरला जाणार आहे. त्यामुळे यंदा काहीही खरेदी करताना ‘कलर ऑफ द इअर’ लक्षात ठेवूनच खरेदी करा.