कुठला रंग तुमचा वर्ण खुलवेल, कुठलं डिझाईन तुमच्या व्यक्तित्त्वातले दोष झाकेल आणि कुठलं फॅब्रिक ते उघड करेल या सगळ्याचा विचार आवश्यक आहे.
कोणतीही फॅशन लोकप्रिय होण्यामागे हिंदी चित्रपटांची किती महत्त्वाची भूमिका होती, ते मागच्या लेखात आपण पाहिलं. तसंच सुरुवातीला फॅशन डिझाय़नर्सची एकाधिकारशाही होती. ते जे काही डिझाईन करतील, ते लगोलग स्वीकारलं जायचं. ग्राहक म्हणून किंवा क्लाएंट म्हणून त्यात स्वतची मतं, मागण्या, अपेक्षा फार यायच्या नाहीत. पण कुठलीही फॅशन अशी आंधळेपणानं स्वीकारणं चुकीचं आहे. कधीकधी असं आंधळेपणानं स्वीकारलेली फॅशन कॅरी करताना खूपच विचित्र दिसतं. हम आपके है कौनमध्ये माधुरीनं घातलेली पोपटी आणि पांढरा लेहंगा चोली आणि चोकर नेकलेस आठवतोय? नंतर कित्येक मुलींच्या अंगावर मी तसाच ड्रेस पाहिला होता. त्याच चित्रपटातला माधुरीचा लीला लेसचा लाल ड्रेस कितीतरी क़ॉमन झाला होता. पण मैत्रिणींनो, ती माधुरी आहे. तिच्यासाठी डिझाईन केलेला ड्रेस सगळ्यांनाच सूट कसा होईल? तिची स्टाईल ब्लाइंडली फॉलो केली तर तुम्ही अगदीच वाईट दिसू शकता हे समजून घेतलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कपडे चित्रपटासाठी डिझाईन केलेले असतात. स्क्रीनवर ते चांगलेच दिसतात. पण सर्वसाधारण मुलींना ते कसे दिसतील तेही तपासायला हवं.आता परिस्थिती बदललीय हे खरं.
आता मात्र फॅशन सेन्स बराच वाढल्याचं दिसतंय. काही शब्द, संकल्पना ज्या फक्त डिझायनर्सशी संबंधित होत्या त्या आता सर्वसामान्य मुलींच्या तोंडीही ऐकू येताता. ड्रेस शिवून न घेता त्या आजकाल ड्रेस डिझाईन करून घेतात. टक्स, पायपिंग, फिंजेस, योक, टॅसेल्स अशा डिझायनर्स लँग्वेजमध्ये सूचना देणाऱ्या मुली आता नवीन नाहीत. प्रत्येकाला आता आपल्याला रंगाची कुठली छटा हवी आहे, हेसुद्धा पक्कं माहिती असतं. घरातल्या भिंतीच्या रंगाची शेड निवडताना ‘मेरावाला पिंक’ असं म्हणणारी ती जाहिरातीतली गृहिणी आठवतेय का? २० – २५ वर्षांपूर्वी बाजारात ग्राहक आपल्या अपेक्षांबाबत जेवढे बेफिकीर होते, अज्ञान होते, तेवढे आज निश्चितच नाहीत. बेबी पिंक आणि रोज पिंकमधला फरक आता सामान्य मुलीलाही चांगलाच कळतो.
आता फॅशनबद्दल विविध माध्यमांमधून अवेअरनेस इतका वाढलाय की, वेगळी स्टाईल करून घ्यायला आता फार महागडय़ा निवडक डिझायनरकडे जायला लागत नाही. सामान्यपणे तुमचा टेलरसुद्धा तुमच्या स्पेसिफिकेशननुसार फॅशनेबल पॅटर्न देऊ शकतात. एवढं सगळं सोपं झालय, तर मग आम्हा डिझायनर्सचं काय काम, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.डिझायनिंग म्हणजे अवेअरनेस असंही काहींना वाटतं. तर काहींना डिझायनिंग म्हणजे ग्लॅमर असं वाटतं. पण हे सगळंच अर्धसत्य आहे. कारण तुम्ही फॅशनबद्दल अगदी जागरुक असलात, तरी त्यानं सगळं काम भागत नाही. एखाद्या फॅशन मॅगझिनमध्ये आलेली स्टाईल तुम्हाला आवडली आणि आपल्या टेलरकडून तुम्ही त्या स्टाईलचा ड्रेस बनवून घेतलात तरी तो आपल्याला हा काही तितकासा सूट होत नाहीयं. तुमच्या मैत्रिणीच्या अंगावर मात्र कदाचित तो चांगला दिसू शकतो.
हे असं होतं, कारण सगळ्यांची शरिरयष्टी, ठेवण, उंची, वर्ण, व्यक्तिमत्त्व सारखं नसतं. एखादा कपडा आपल्या अंगावर घातला तर त्यात जाड दिसायला होतं, पण तोच कपडा बहिणीनं घातला तर तिला सूट होतो. या सगळ्याचं ज्ञान आणि त्याबरोबर डिझायनिंगच्या काही तांत्रिक गोष्टी यांचा मेळ घातला तर एखाद्या व्यक्तीसाठी परफेक्ट डिझाईन बनू शकतं. एखाद्या ऑकेजनला परफेक्ट डिझाईन असू शकतं. कुठलं कापड वापरायचं, कुठला रंग वापरायचा, प्रिंट कसं हवं, ट्रिम्स कसे या सगळ्या घटकांवर डिझायनिंग अवलंबून असतं. कुठला रंग तुमचा वर्ण उजळ भासवेल, कुठलं डिझाईन तुमच्या व्यक्तित्त्वातले दोष झाकेल आणि कुठलं फॅब्रिक ते उघड करेल या सगळ्याचा विचार आवश्यक आहे.
फॅशन पॅशन : व्यक्तिमत्त्व आणि फॅशन
कुठला रंग तुमचा वर्ण खुलवेल, कुठलं डिझाईन तुमच्या व्यक्तित्त्वातले दोष झाकेल आणि कुठलं फॅब्रिक ते उघड करेल या सगळ्याचा विचार आवश्यक आहे.
आणखी वाचा
First published on: 09-08-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Personality and fashion