शाळेत असताना पॉकेटमनी प्रत्येकालाच मिळतो, पण त्यातही बिझनेसचं डोकं चालवणारे काही अवलिया असतात. किशन पांपालिया त्यातलाच एक! महाराष्ट्राच्या अकोल्यात राहिलेला हा मुलगा शाळेत असतानाच स्वत:चं बिझनेसचं डोकं वापरायला लागला. सध्या एका मोठ्या कंटेंट कंपनीचा पार्टनर असलेला हा मुलगा शाळेत रद्दीच्या खरेदी-विक्रीतून नफा कमवण्याचा विचार करत होता. थोडक्यात आयआयटी हुकलेला किशन बिट्स पिलानीमध्ये इंजिनीअरिंगला गेला. तिथून त्याच्या उद्याोगांना अधिक चालना मिळाली आणि फोर्ब्सच्या लिस्टमध्ये नाव मिळवण्यापर्यंत त्याने मजल मारली.

किशन तेव्हा शाळेत इयत्ता आठवीत होता. पटकन आणि सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा त्याचा विचार आणि प्रयत्न त्या वेळीही सुरू होता. त्या वेळी रद्दी विकत घेण्याची कल्पना त्याला सुचली. प्रत्येक किलोमागे एक रुपया फायदा मिळत असे. एवढ्याशा फायद्यावर कोण काम करतं? असा इतरांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता. मात्र किशनला स्वत:च्या बुद्धीवर आणि व्यवसायाच्या कल्पनेवर पूर्ण विश्वास होता. थोड्या प्रयत्नाने त्याने आपले काही नातेवाईक आणि मित्रांना त्यात पैसे गुंतवण्यासाठी तयार केलं. तो रोज काही टन रद्दी विकत घ्यायचा. हे मार्केट असंघटित आणि विखुरलेलं आहे हे त्याला माहिती होतं. त्यामुळे त्याने एका वेळी मोठ्या प्रमाणात रद्दी विकून अपेक्षेपेक्षा खूप जास्त नफा कमावला. सर्वांना त्यांचे पैसेही परत दिले आणि त्यांना फायदाही करून दिला. त्या वेळी किशनसाठी व्यवसाय म्हणजे व्यावहारिक शहाणपणा वापरून केला जाणारा ‘जुगाड’ होता.

Jugeshinder Singh, CFO of Adani Enterprises.
Hindenburg : “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, हिंडनबर्ग बंद करण्याची घोषणा; आदाणी समूहाचा टोला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
kangana ranaut emergency movie ban in bangladesh
कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशने घातली बंदी, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
wardha deoli Shantanu raut
जगातील बारात ‘हा’ एकमेव भारतीय, नोबेल विजेत्याच्या नावे असलेला फेलोशिप सन्मान पटकावला
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ

‘मी जुगाड करण्यात एक्स्पर्ट आहे’, म्हणणारा किशन थोडक्यात आयआयटीमध्ये जाऊ शकला नाही. मात्र त्याने बिट्स पिलानीमध्ये अॅडमिशन मिळवली. पहिल्या वर्षाच्या दुसऱ्या सेमिस्टरमध्ये त्याने ‘पेपर कंटेंट’ जॉइन केलं. त्याच्या कॉलेज सीनियर्सनी सुरू केलेला तो एक कंटेंट मार्केटप्लेस स्टार्ट-अप होता. एका शब्दामागे पंधरा पैसे अशी ऑफर एकाने त्यांना कंटेंटसाठी दिली होती. फाऊंडर टीम याच विचारात पडली होती की हे डील घ्यावं की नाही आणि घ्यावं तर त्यातून आपला फायदा कसा करून घ्यावा? या द्विधा मन:स्थितीत टीम असतानाच किशनने त्यांना बूस्ट दिला. फाऊंडर टीमने स्वत:नेच मिळून १० दिवसांत ३०० राइट-अपचे नमुने तयार केले. अशा पद्धतीने कामाने वेग घेतला. कमी दिवसांत जास्तीत जास्त काम करून टेक्निकने त्यांना या डीलमधून फायदा मिळवून देणारा किशन त्यांचा कोअर मेंबर झाला.

‘पेपर कंटेंट’ ही कंपनी सध्या अडीच हजारहून अधिक क्लायंट्ससोबत काम करते. सव्वा लाख क्रिएटर्सचं नेटवर्क असलेली ही कंपनी आहे. क्रिएटर्सना एकमेकांशी जोडणं आणि त्यांच्याकडून कंटेंट जनरेट करून घेणं अशा स्वरूपाचं काम ही कंपनी करते. त्यांचं फ्रीलान्स क्रिएटर्सचं नेटवर्क त्यांनी तयार केलेलं आहे. सध्याच्या काळात कंटेंट हे एक मोठी मार्केटप्लेस बनलं आहे. सर्व्हिस सेक्टरपासून प्रॉडक्शनपर्यंत सर्वांनाच कंटेंट जनरेशन कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर गरजेचं असतं. त्याचाच वापर स्वत:चं बिझनेस मार्केट म्हणून करून यशाचं आर्थिक गणित साधण्याचं काम पेपर कंटेंट ही कंपनी करते आहे.

किशन पांपालिया याचे वडील सिव्हिल इंजिनीअर होते, मात्र नंतर त्यांनी स्वत: कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू केला आणि त्यात जमही बसवला. त्यामुळे व्यवसाय आणि व्यावहारिक हुशारी ही किशनच्या अंगात लहानपणापासून आहे. तो कॉलेजमध्ये असताना सामान्यत: एखाद्या इव्हेंटसाठी पंचवीस हजार रुपयांची स्पॉन्सरशिप जमत असेल तर त्याने त्याच इव्हेंटकरिता दीड लाखाची स्पॉन्सरशिप मिळवली होती. यावरूनच त्याची व्यावहारिक हुशारी दिसून येते. तरीही अंगभूत व्यवसाय करण्याची ही हुशारी टिकवून ठेवणं आणि नवनवीन कल्पना लढवत व्यवसायाचा व्याप वाढवणं हे सोपं काम नाही. इंजिनीअर असलेला किशन याच हुशारी आणि कल्पकतेच्या बळावर आज यशस्वीपणे कंटेंटच्या व्यवसायात असलेल्या कंपनीचा सर्व बिझनेस सांभाळतो आहे. आणि म्हणूनच फोर्ब्सच्या थर्टी अंडर थर्टीमध्ये त्याने स्थान मिळवलं. व्यावहारिक शहाणपण आणि बुद्धिमत्ता, कल्पकता यांचा मेळ घालत नवं काही तरी करून दाखवण्याची आस असणाऱ्या किशनसारख्या तरुणांची संख्या अधिकाधिक वाढायला हवी हेच खरं.

viva@expressindia.com

Story img Loader