हल्ली वाइल्ड लाइफ फोटोग्राफी आणि नेचर फोटोग्राफीचा नाद असलेली ‘भटकी जमात’ वाढत चाललेली दिसतेय. हातात कॅमेरा आणि त्याला लावलेली छोटी-मोठी नळकांडी मिरवत हे भटके वीर त्या खास क्लिकच्या मागे जातात. निसर्ग सतत आपल्याला काहीतरी सांगत असतो. दाखवत असतो. काहीतरी इमोशन पोचवत असतो. ती नेमकी मोमेंट कॅमेरात बंदिस्त करणं ही कसरतच. ती कॅच केल्यावर आलेलं ‘वॉव फििलग’ अविस्मरणीय. मग ते ख़ास फोटो फेसबुक, ट्विटरवर पोस्ट करणं आलंच. त्यातल्या कुठल्या फोटोला अधिक लाईक्स मिळणार आणि किती समविचारी – ‘भटक्या जमाती’तले मित्र कमेंट्स करणार याची जणू स्पर्धाच लागते. त्या प्रत्येक खास क्लिकची आपली अशी एक गोष्ट असते. त्या ‘वॉव क्लिक’साठी आपण बरीच कसरत केलेली असते किंवा वाट पाहिलेली असते. आपले काही निसर्गवेडे कॅमेराप्रेमी फ्रेंड्स सांगत आहेत त्यांच्या ‘वॉववाल्या क्लिक’च्या आठवणीबद्दल..

कमरेतून वाकल्यासारखी दिसणारी झाडांची रांग टिपण्यासाठी एका उंच दगडावर धडपडत चढावं लागलं
– धनश्री जेरे

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
padsaad reders reactions
पडसाद: अबू यांची चित्रशैली उलगडली
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO
Pushpa, Red Sandal Tree, Red Sandal Tree Tadoba,
चंद्रपूर : ‘पुष्पा’ चित्रपटातील प्रसिद्ध लाल चंदनाचे झाड ताडोबा प्रकल्पात!
Monkey hugs Shashi Tharoor, falls asleep on his lap
Shashi Tharoor : माकडानं शशी थरुरांना मिठी मारुन कुशीत काढली एक डुलकी, फोटो व्हायरल
Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding first photo
नागा चैतन्य दुसऱ्यांदा अडकला विवाहबंधनात! लग्नातील पहिला फोटो आला समोर, सोभिताच्या लूकने वेधलं लक्ष

सोमवार ते शुक्रवारचं हेक्टिक रुटीन वीकेंडला आपल्यातलं भटकेपण बाहेर आणतं. मग आपल्या हौशी लोकांची पावलं वळतात ती नवलाईने नटलेल्या निसर्गाकडे. मग काय.. गळ्यात कॅमेरा अडकवून आपली जिप्सी मंडळी भटकंतीला निघालीच म्हणून समजा. अशाच भटकंतीत लाभतो निसर्गाच्या सहवासातला एक विलक्षण क्षण, एक क्षण जो आपल्या डोळ्यांव्यतिरिक्त कॅमेरातही टिपला जातो. कधी ते इवलंसं गवतफुल असतं, कधी फणा काढलेला पट्टेरी नाग तर कधी पिल्लांना खाऊ घालणारी चिऊताई.
तो नेमका मोमेंट कॅमेरात बंदिस्त करणं ही कसरतच. प्रत्येक हालचालीमधून निसर्ग काहीतरी सांगत असतो, काहीतरी इमोशन पोचवत असतो, ती कॅच केल्यावर आलेलं ‘वॉव फििलग’ अविस्मरणीयच. मग ते फोटो फेसबुक, ट्विटरवरून शेअर करून त्याला अधिकाधिक लाइक्स मिळवायची स्पर्धाच लागते जणू..काही निसर्गवेडय़ा आणि कॅमेराप्रेमी मित्रांना त्यांच्या ‘वॉववाल्या क्लिक’बद्दल बोलतं केलं.
पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजची धनश्री सांगते, ‘‘आमच्या कॉलेजचा कॅम्पस तसा मोठा असल्याने मी सारखी कुठेतरी िहडत असायचे.. कॅमेरा सोबतीला ठेवून. कॉलेजच्या टेकडीवर अशी कमरेतून वाकल्यासारखी दिसणारी झाडांची रांग होती, बघून मला फार मज्जा वाटली. असं वाटलं, जणू वाकून हात जोडून नमस्कार करत, स्वागत करत होती ती झाडे. नुकत्याच पडलेल्या पावसाने त्यांची हिरवाई अजून खुलून आली होती. मला त्याचा ‘पिक’ हवा होता. पण कुठल्याच बाजूने मला हवा तसा फोटो येईना. शेवटी मी एका उंच दगडावर धडपडत चढले आणि तिथून हा फोटो काढला. निसर्गाच्या ‘क्रिएटीव्हिटी’ चा उत्तम नमुना होता तो..’’

नवीन कॅमेऱ्याशी खुडबूड सुरू असतानाच सुपरमॅक्रो मोडनं फुलपाखराचं सौंदर्य अचूक टिपलं
अपूर्वा लेले

 निसर्गाच्या रसिकतेचा असाच काही अनुभव अपूर्वाने पण सांगितला. ती म्हणाली, ‘‘दोन वर्षांपूर्वी माझ्या काकाने मला ‘डीजीकॅम’ गिफ्ट दिला. आणि त्या दरम्यान पावसाळ्यात बनेश्वर कसं दिसतं ते पाहायचा योग आला. मग काय विचारता.. त्या नवीन कॅमेऱ्यावर ‘ट्रायल अ‍ॅण्ड एरर’ असा कार्यक्रम सुरू झाला. पाहता पाहता कॅमेऱ्याचं ‘सुपरमॅक्रो’ मोड सापडला. त्या मोडने काय होतं माहीतही नव्हतं. तितक्यात एक सुंदरसं फुलपाखरू येऊन समोरच्या वेलीवर बसलं. मी काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहिले आणि त्याला कॅमेऱ्यात पकडायचं ठरवलं आणि फार विचार न करता पटकन क्लिक बटन दाबलं आणि ते फुलपाखरू तिथून उडालं. मला वाटलं फोटो ब्लर आला असेल पण नंतर स्क्रीनवर पाहिलं तर काय फुलपाखराचं सौंदर्य माझ्या कॅमेऱ्याने अचूक टिपलं होतं. त्याआधी मी इतका सुंदर फोटो कधीच काढला नव्हता. आजही तो फोटो काढतानाची हुरहुर तितकीच ताजी वाटते.’’
महेशला मात्र त्याची फोटोग्राफीची आवड मुंबई सोडून पाबळला आल्यावरच खुलवता आली. ‘‘असाच एक दिवस माझ्या खिडकीतल्या त्या झाडाच्या फांदीवर एक सुंदर हिरव्या रंगाचा लाल डोकं असलेला आणि पिवळी मान, लाल गळा असा पक्षी मला दिसला, नेमकं मी त्या दिवशी कॅमेऱ्यामधल्या बॅटरीज् काढून ठेवल्या होत्या, त्या परत टाकून कॅमेरा सुरू करेपर्यंत तो पक्षी तिथे नव्हता, दुसऱ्या दिवशी मी तयारीने उभा राहिलो पण पक्षी आलाच नाही. नंतर काही दिवसांनी तो परत आला. मी माझ्या रूममधून काही फोटो काढले. पण त्यापकी एकाही फोटोमध्ये तो पक्षी पूर्ण आला नाही. नंतर त्या पक्ष्याचे असेच कधीतरी दर्शन होत असे. त्यानंतर मी पाबळला आलो. तिथे एक दिवस दुपारी खोलीत बसलो असताना तांब्यांचं भांडं आपटल्यावर येतो तसा आवाज येत होता. पाहिलं तर काय.. मला आवडणाऱ्या त्या पक्ष्यांची.. तांबट पक्ष्यांची जोडी तिथे बसली होती.

‘ये लो मं हारी पिया’ म्हणत तांबट पक्षीण ‘पिया’जवळ जाऊन विसावली. या भांडणाचा साक्षीदार माझा कॅमेरापण झाला
महेश लाडे

ज्याचे फोटो मी मुंबईत असताना काढायचा प्रयत्न करत होतो. त्या पक्ष्यांचा जोडा माझ्यासमोर एकमेकांशी भांडत होता. बराच वेळ त्यांचा भांडणाचा कार्यक्रम सुरू होता. ती पक्षीण रागावली असावी त्या पक्ष्यावर असं वाटत होतं.. थोडय़ा वेळाने त्यातली पक्षीण शांत झाली आणि अगदी ‘ये लो मं हारी पिया’च्या थाटात तिच्या ‘पिया’जवळ जाऊन विसावली. त्यांच्या भांडणाचा साक्षीदार माझा कॅमेरापण झाला. त्यांचं भांडण संपल्यावरही बराच वेळ मी फक्त हसत होतो. कारण ते भांडण कुणा नवरा-बायकोच्या भांडणाइतकंचं ‘रियल’ होतं. मला तो प्रसंग.. तो फोटो फार भावला, कारण त्यांच्यातलं प्रेम माझ्यापर्यंत ‘कन्व्हे’ झालं होतं.’’ महेश उत्साहाने सांगत होता.
जंगलात कॅमेरा घेऊन भटकणं म्हणजे कॅमेऱ्याला सुद्धा पर्वणी वाटेल इतक्या गोष्टी टिपता येतात असं प्रणवचं म्हणणं. ‘‘ गडचिरोलीच्या जंगलात फिरत असताना एखाद्या प्रवेशद्वाराला असते तशी कमान वाटावी असं दोन बाजूंच्या दोन झाडांचा आधार घेत एका कोळ्याने जाळं विणलं होतं. त्याखालून माणसं न वाकता जाऊ शकतील इतक्या उंचीवर विणलेलं ते जाळं इतकं शिस्तबद्ध होतं की बस्स. ते बघून वाटलं की, हा कोळी फारच शिस्तीचा आणि अनुभवी असावा. मी त्याच्या ‘क्रिएशन’कडे वेडय़ासारखा पाहतच राहिलो. प्रश्न आता फक्त हा होता की,मला ते एका वेगळ्या अँगलने कॅच करायचं होतं. जाळं बऱ्यापकी उंचीवर होतं. त्यामुळे फोटो हवा तसा येत नव्हता. मग हात वर उंचावत तसा कॅमेरा धरून क्लिक्स मारले. हा क्लिक त्यापकीच एक..’’ असं म्हणत प्रणव त्याचा तो वॉव क्लिक अभिमानानं दाखवतो. ‘‘आजही जेव्हा जेव्हा मी काही सामान अस्ताव्यस्त टाकतो तेव्हा त्या कोळ्याच्या शिस्तीची आठवण होते.’’ प्रणव हसत हसत सांगतो.

इतक्या उंचीवर विणलेलं ते जाळं इतकं शिस्तबद्ध होतं की त्या ‘क्रिएशन’कडे वेडय़ासारखा पाहतच राहिलो
प्रणव नाफडे

सिद्धार्थला भावली ती प्राण्यांमधली एकमेकांची माया आणि काळजी. सिद्धार्थ म्हणतो, ‘‘ एका जंगल सफारीतून परतताना उन्हं उतरणीच्या वेळेला एका छोटय़ा पाणवठय़ाजवळ आम्ही थांबलो. तेव्हा दिसलं की, तीन सांबरं पाण्यात उभी आहेत. त्यातलं मोठं सांबर इतर दोन छोटय़ांना पाण्यातून निघून घरी परतण्यासाठी घाई करत होतं आणि ती दोन पिटुकली मात्र पाण्यात खेळत बसली होती. ते मोठं सांबर काळजीने दटावत होतं..असं ते दृश्य होतं. आम्ही ‘अगेन्स्ट लाइट’ साइडला उभे होतो त्यामुळे मी फोटो काढला तरी तो काळा येणार होता. तरीही मी क्लिक मारला. स्क्रीनवरसुद्धा फोटो काहीसा अंधारलेलाच आला होता. जेव्हा मी मोठय़ा स्क्रीनवर पाहिला तेव्हा कळलं की माझ्या प्रयोगानं बाजी मारली होती आणि फोटो खूप सुंदर आला होता. या क्लिकला किती र्वष झाली ते आठवत नाही पण प्रत्येक वेळी मला ‘वॉव क्लिक’ म्हणून या फोटोची आठवण येते आणि त्याबरोबरच त्या मोठय़ा सांबराची काळजी त्याची माया तितकीच आठवते..’’

जंगलामध्ये मला भावली ती प्राण्यांमधली एकमेकांची माया. ती टिपण्याचा प्रयत्न करतो.
– सिद्धार्थ प्रभुणे

खरं तर प्रत्येक क्षणानिशी निसर्ग आपल्याशी काहीतरी ‘शेअर’ करू पाहत असतो. गरज असते ती आपण आपल्या जाणीव विस्तारून ते शोधायची. फेसबुकवरचे लाइक्स कमी पडतील इतकं सुंदर चित्र निसर्ग रंगवत असतो. हिरव्यागार पानांच्या घोळक्यातलं एकुलतं एक पिवळं पानही काहीतरी म्हणत असतं. या निसर्ग नावाच्या ‘फ्रेंड’ ने केलेलं ‘शेअिरग’ जेव्हा आपल्याला उमजतं, टिपता येतं तेव्हाच येतं ‘वॉव फििलग’ आणि त्या टिपलेल्या ‘शेअिरग’चा होतो ‘वॉववाला क्लिक’. एक वॉववाला क्लिक’ तुमची पण वाट पाहतोय…

Story img Loader