आपल्याकडे लेटेस्ट फॅशनचे आणि ट्रेंडी कपडे, अ‍ॅक्सेसरीज् असलेच पाहिजेत असं सगळ्यांनाच वाटतं. पण कुठली फॅशन ‘इन’ आहे, कुठे चांगला चॉईस मिळेल आणि बेस्ट डील काय असू शकेल हे कळत नाही. व्हिवाच्या फॅशन रिपोर्टर त्यांना आवडलेल्या गोष्टी या सदरातून तुमच्याशी शेअर करतील. फक्त एक अंदाज मिळावा म्हणून त्या गोष्टी कुठे मिळाल्या आणि केवढय़ाला मिळाल्या तेही सांगतील.  शॉपिंगसाठी व्हिवा पीक ऑफ द वीक किती उपयुक्त ठरतंय, आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आयडी – viva.loksatta@gmail.com

पार्टीवेअर चप्पल
नेहमी सोनेरी आणि चंदेरी चप्पल घालून पार्टीला जायचा कंटाळा आला असेल तर या चप्पल त्याला मस्त पर्याय ठरतील. यांचा बेस जरी मरून असला तरी तो पायाखाली लपला जातो आणि पिवळ्या, लाल, निळ्या रंगांच्या तीन मोठय़ा खडय़ांनी या मल्टीयुज ठरतात आणि लूक पूर्ण करायला सोबत खडे आहेतच.     
यूएसपी : नेहमीच्या सोनेरी चप्पलांना ऑप्शन
ठिकाण : बांद्रा ल्ल किं. : २०० रु.

ऑरेंज बॅग
िवटर सिझन इज ऑन. तेव्हा तुमचा संपूर्ण वॉडरोब डार्क शेड्सनी भरून जायला हवा. पण तरीही आपण मागच्या सिझनमधील काही गोष्टी या सिझनमध्येसुद्धा वापरतो. ही ऑरेंज बॅग त्यातलीच एक आहे. छोटी आणि सुटसुटीत असल्यामुळे सिनेमाला जाताना किंवा सहज एक फेरफटका मारताना तुमच्या सिंपल लूकला एक हटके अंदाज देते.  
यूएसपी : कूल कलर कूल लूक
ठिकाण : शिवाजी पार्कजवळील एक दुकान
किंमत : १५० रुपये

बकल लेदर ब्रेसलेट
फॅशन म्हटलं तर नेहमीच मुलींचा विषय का काढायचा. म्हणूनच आम्ही या वेळच्या ‘पीक’मध्ये मुलांसाठी हे एक खास ब्रेसलेट उचललं.  ब्राऊन कलर आणि बेल्टचा लुक यातून या ब्रेसलेटचा फंकीनेस मस्त उठून येतो. रोज कॉलेजला जाताना टी शर्ट आणि जीन्सबरोबर हे ब्रेसलेट नक्कीच भाव खाऊन जाईल.     
यूएसपी : बेल्टचा फंकीलूक
ठिकाण : स्टेशनजवळील ठेलेवाला ल्ल किंमत : ५० रु.

Story img Loader