पूरी दुनिया के जज्बात एक तरफा,
तुमसे वो पहली
मुलाकात एक तरफ.
स्पॉटिफायवर प्रसारित होणाऱ्या
‘मेरा नाम है नीलेश मिसरा कहानियाँ

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनाता हूँ’ या प्रसिद्ध पॉडकास्टमध्ये आर. जे नीलेश मिसरा अनेक प्रसिद्ध लेखकांच्या कथा आपल्या श्रोत्यांसमोर सादर करतो. या पॉडकास्टमधील ‘पहली मुलाक़ात’ या भागात आर. जे. नीलेशने कांचन पंत यांची कथा सांगितली आहे. ही कथा एका मुलीभोवती फिरते. शहरात राहून आपलं काम करणारी निकिता होळीच्या सुट्टीसाठी आपल्या घरी जायला निघते तेव्हा ती काही जुन्या आठवणींमध्ये रमते.

महाविद्यालयात शिकताना तिच्या घरी तिच्या बाबांच्या मित्राचा मुलगा मुकुंद परीक्षेसाठी राहायला येतो. त्याला गच्चीवरचा तिचा
आवडता रूम द्यावा लागतो, त्यामुळे निकिता मुकुंदचा खूप राग करू लागते. या रागात ती त्याला खूप त्रास देते, पण मुकुंद कधीही तक्रार करत नाही. त्याच्या या स्वभावामुळे तिला हळूहळू तो आवडू लागतो. पण त्याला आपण आवडतो की नाही हे तिला समजत नाही. परीक्षा झाल्यानंतर मुकुंद पुन्हा त्याच्या घरी जायला निघतो तेव्हा तो निकिताला भेटून एक पत्र देतो. त्यात तो तिला म्हणतो, ‘आपली पहिली भेट कधीच झाली नाही, पण जाण्याआधी मी तुला पसंत करतो.’ याच आठवणीतून बाहेर येऊन ती आपल्या घरी पोहोचते तेव्हा तिची आई मुकुंद आल्याचं सांगते. हे ऐकून निकिता त्यांची राहिलेली पहिली भेट पूर्ण करण्यासाठी गच्चीवरच्या तिच्या आवडत्या खोलीकडे जाते. ही कथा सांगून झाल्यावर आर. जे. नीलेश ‘पूरी दुनिया के जज्बात एक तरफा, तुमसे वो पहली मुलाकात एक तरफ’ ही शायरी बोलून हा भाग संपवतो.

इंग्रजी चित्रपटात पहिल्या भेटीला ‘मीट क्यूट’ बोलतात हे मला समजलं.आपण ज्या ज्या लोकांना भेटतो त्या प्रत्येक भेटीची एक गोष्ट नक्कीच असते. काही लोक आपल्याला पहिल्या भेटीतच पसंत पडतात. तर काही लोक काही केल्या आपल्याला आवडत नाहीत. मी महाविद्यालयात शिकत असताना मलादेखील असाच एक मुलगा खूप आवडला होता. दिसायला साधा, अभ्यासू, कोणासोबत न बोलणारा. शांत. मी स्वत:हून अनेक वेळा बोलायचा प्रयत्न केला, पण माझ्यासोबत तो कधीच बोलला नाही.

या फेब्रुवारी महिन्यात अचानक स्टेशनवर मला तो भेटला, मी नाही ओळखलं त्याला.. त्यानेच मला हाक मारली. आम्ही खूप बोललो आणि नंतर तो त्याच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने.. जाताना तो मला आज पण तू तशीच आहेस असं बोलून गेला. घरी आल्यावर उत्साहात हा प्रसंग नवऱ्याला सांगितल्यावर तो पण खूप हसला. काही दिवसांपूर्वी हा पॉडकास्ट ऐकताना जाणवलं दोन लोकांमध्ये ज्या दिवशी संवाद सुरू होतो तीच त्यांची पहिली मुलाखत असते.-तृप्ती उंडे (गृहिणी)

शब्दांकन: श्रुती कदम

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Podcast sunta hu r j k nilesh misra first meeting amy