दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या बटाटा चिप्सवर ‘अनावश्यक खाद्यपदार्थ’  (non essential food) म्हणून बंदी घातली होती. अर्थात या चिप्सच्या उत्पादकांनी ही बंदी मोडून काढली. १४ मार्च हा अमेरिकेत नॅशनल पोटॅटो चिप्स डे म्हणून साजरा केला जातो. बटाटा चिप्स हा अमेरिकन मंडळींचा नंबर वन स्नॅक्स आहे. भारतातली परिस्थिती काही वेगळी नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

उपवासाचे दिवस आणि काही पदार्थ यांचं समीकरण पक्कं आहे. एक काळ उपवासानिमित्त खास घरी रांधल्या जाणाऱ्या पदार्थाचा होता. त्यानंतर रेडीमेड पदार्थाची मागणी वाढली. या पदार्थात सर्वात जास्त डिमांडमध्ये असणारा पदार्थ म्हणजे बटाटा वेफर्स. उपवासच कशाला, साखरपुडा, पूजा, वाढदिवस, बारसं, छोटी मोठी पार्टी या सर्व ठिकाणी संचारी असलेले बटाटा वेफर्स त्यांच्या सहजपणामुळे आवडीचे असले तरी फारसे गंभीरपणे पाहिले जात नाहीत. मुळात हा पदार्थ गंभीरपणे पाहण्याचा नाहीच. क्षणांचा चस्का किंवा तात्पुरतं खाऊ-पिऊ  या वर्गातले वेफर्स बाजारपेठेत मोठी उलाढाल घडवतात.

आज बटाटय़ाशिवाय भारतीय स्वयंपाकघराची कल्पनाच होऊ  शकत नाही. पण बटाटा हे कंद आपणा भारतीयांसाठी खूप अलीकडचं आहे. पोर्तुगिजांनी ते स्पॅनिश दर्यावर्दींकडून स्वीकारलं आणि पोर्तुगिजांमार्फत पश्चिम किनाऱ्यावर बटाटा रुजला. त्यानंतर तो भारतभर पसरला. बटाटा हे पोटॅटोचं पोर्तुगीज नाव आपण स्वीकारलं हे मान्य करता येतं पण ब्रिटिशांमार्फत बाकीच्या भारतात पसरताना तो आलू का झाला हे कळत नाही. तर असा हा बटाटा म्हटला तर, खूप अलीकडचा. पण कंद म्हणून त्याने रताळ्याला मागे टाकत उपवासाच्या पदार्थात बाजी मारली.

आता या वेफर्सच्या जन्माकडे येऊ या. बटाटा युरोपात नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. १८१७ मध्ये इंग्लंडमधील विल्यम किचनर्सने त्याच्या द कुक ओरॅकल  या पाककृती पुस्तकात एक पाककृती छापली. ज्यात बटाटय़ाचे अगदी पातळ काप करून ते तळण्याविषयी लिहिले आहे. त्या अर्थाने बटाटा वेफर्सचा उद्गाता विल्यम किचनर्स ठरावा. मात्र हे नाव फारसे प्रचलित नाही. युरोपीय देशात बटाटा चिप्सच्या शोधाची कृती अनेकजणांनी जॉर्ज क्रम या प्रसिद्ध शेफशी जोडली आहे. या पाककृतीला तितकीच खमंग एका आख्यायिकेची फोडणी आहे. या जॉर्ज क्रमचं न्यूयॉर्क मधल्या saratoga spring नामक शहरात मून लेक हाउस नावाचं रेस्टॉरंट होतं. २४  ऑगस्ट १८५३ रोजी एका गिऱ्हाईकाने फ्राइड पोटॅटोची मागणी केली. जॉर्जने त्याला ते सव्‍‌र्ह केले मात्र गिऱ्हाईकाने त्या बटाटय़ाच्या जाड-जाड कापांबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रख्यात शेफ असणाऱ्या जॉर्जला कदाचित हा अपमान वाटला. त्याने खोचकपणे अतिपातळ काप करून ते खूपच जास्त तळले जेणेकरून ते कडक होतील आणि त्यावर मीठ भुरभुरवले. हेतू होता की त्या ग्राहकाला डिवचता यावे, घे लेका! किती पातळ काप हवेत ते खा ! पण परिणाम उलट झाला. ग्राहक खूश झाला. त्याला ते काप तुफान आवडले आणि अशा प्रकारे बटाटा चिप्सच्या पर्वाला सुरुवात झाली.

या दोन्ही जन्मकथांकडे नीट नजर टाकता, क्रमच्या बाबतीत घडलेली गोष्ट अतिरंजित वाटू शकते. याचं पहिलं कारण एखाद्या ग्राहकाला धडा शिकवण्यासाठी कोणताही शेफ चुकीच्या अर्थाने पदार्थ खराब करण्याचा प्रयत्न करणार नाही. हा किस्सा नक्की घडला असावा मात्र ग्राहकाला धडा शिकवणे वगैरे खमंगपणाच्या मिषाने जोडले गेले असावे. आता प्रश्न उरतो, मग या किचनर साहेबांच्या पाककृतीचे काय? यावर असं म्हणता येईल की शेफ खूप सारे प्रयोग करत करत एखादा पदार्थ अजमावून पाहतो. पाककृतींच्या पुस्तकातसुद्धा पाहा चित्रविचित्र नावांच्या हजार पाककृती असतात. पण त्या सगळ्याच लोकप्रिय होतात का? शेफ किचनरने पाककृती दिली आणि शेफ क्रमने ती लोकप्रिय केली असा सुवर्णमध्य काढता येईल.

या वेफर्सच्या जन्माच्या सफळसंपूर्ण कहाणीनंतर एक मुद्दा खास मांडावसा वाटतो तो नावाबद्दलचा. आपण बटाटा वेफर्स म्हणतो. अमेरिकन मंडळी पोटॅटो चिप्स म्हणतात. तर ब्रिटिशांनी पोटॅटो क्रिस्प (क्रिस्प्स असं अनेकवचन ते करतात.) हे नाव स्वीकारलं आहे. एक गोष्ट आणखी नमूद करण्यासारखी आहे- ती वॅक्स पेपरच्या वापराची. बटाटा वेफर्सचा प्रचार तर जोरात होत होता, मात्र हवेच्या संपर्कात आल्यावर ते पटकन नरम पडतात हे लक्षात घेऊन लॉरा स्कडर या कॅलिफोर्नियास्थित उद्योजिकेने वॅक्स पेपरबॅग्जमधून वेफर्स विक्री सुरू केली आणि त्यामुळे त्याचा खप वाढला. आज प्लस्टिक बॅग्जमधून हे चिप्स खूप मोठय़ा प्रमाणावर विकले जातात. या चिप्सच्या पाकिटातल्या चिप्सच्या संख्येवर आणि हवेच्या प्रमाणावर होणारे विनोद सुप्रसिद्ध आहेत. वेफर्स कमी आणि हवा जास्त असण्याचं कारण असं की, सध्या या रॅपर्समध्ये वेफर्स, चिप्स जास्त काळ टिकावे याकरता नायट्रोजन गॅस त्या पाकिटात आधी ब्लो केला जातो. त्यामुळे चिप्स मोडत नाहीत व अधिक काळ टिकतात.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ट्रेनमधून घरी जाईपर्यंत पोटाला आधार म्हणून पाच -दहा रुपयांची बटाटा वेफर्सची पाकिटं घेणाऱ्या चाकरमान्यांपासून ते डब्यात बटाटा वेफर्सच हवेत म्हणून हट्ट करणाऱ्या चिल्यापिल्यांपर्यंत आणि उपवास ना उद्या वेफर्स आणा हां ! म्हणणाऱ्या गृहिणीपर्यंत वेफर्स सर्वप्रिय आहेत. तळलेला बटाटा, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, वाढती चरबी यावर सगळेच हिरिरीने बोलतील. पण समोर बटाटा वेफर्सचं पाकीट वा डिश आल्यावर मात्र जास्त नको म्हणता म्हणता सगळी डीश कधी संपते कळत नाही. एक वेफर खाऊन गप्प बसणारी मंडळी साधक असावी. सर्वसामान्य पामर मात्र एक, एकसे भले दो, दो से भले तीन म्हणत बॅटिंग करतात, त्यात त्यांचा दोष नाही. हा पदार्थच असा आहे. त्याचा तो केवडय़ासारखा रंग, गोलसर लांबट आकार आणि कुरकुरीत चव कुणालाही प्रेमात पाडणारी. दोन बोटांच्या चिमटीत पकडून वेफरचा तुकडा मोडावा. अगदी सूक्ष्मपणे उडणारे मिठाचे कण चेहऱ्यावर झेलावे. तेलकट तवंग मुखात पसरावा आणि त्या करमकुरम आवाजाने उगाचच उत्साही वाटू लागावे ही भावावस्था आपोआप निर्माण होते. त्या वेफर्ससारखीच कुरकुरीत.

रश्मि वारंग