शब्दांकन: श्रुती कदम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्दी वालों के जीवन का भी अजब फ़साना है,

तीर भी चलाना है और परिन्दे को भी बचाना है

कूकु एफएमवर प्रसारित होणाऱ्या ‘कातील अड्डा’ या पॉडकास्टमध्ये गुन्हेगारी विषयावर आधारित अनेक कथा सांगितल्या जातात. यामधील ‘पोलीस इन्स्पेक्टर’ या भागात रमेश पारिक नावाचा पोलीस अधिकारी बलात्कार आणि हत्येची केस कशा प्रकारे सोडवतो हे या पॉडकास्टमध्ये सांगण्यात आले आहे. मनोरुग्ण गुन्हेगार कशा प्रकारे गुन्हे करतात याचं वर्णन या पॉडकास्टमध्ये करण्यात आलं आहे. या पॉडकास्टमध्ये आर. जे. संयम शर्मा पोलीस कशा पद्धतीने विचार आणि नियोजन करून गुन्हेगारांना पकडतात हे समजावून सांगतो. या भागातील गुन्हेगार एक पोलीस अधिकारीच असून मनोरुग्ण असल्याचे या कथेच्या शेवटी समजते. या कथेला सुरुवात करताना आर. जे. संयम शर्माने ‘वर्दी वालों के जीवन का भी अजब फ़साना है, तीर भी चलाना है और परिन्दे को भी बचाना है’ हा शेर ऐकवला आहे. याचा अर्थ मात्र त्याने कथेच्या शेवटी उलगडून सांगितला आहे. 

हेही वाचा >>> एकांकिकेचं ‘तंत्र’

चित्रपट, वेब मालिकांमध्ये नेहमी गुन्हेगार गुन्हा कसा करतात हे दाखवले जाते, पण त्या गुन्हेगारांना पोलीस कशा प्रकारे पकडतात त्यासाठी काय मेहनत घेतात? कोणत्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो हे ठळकपणे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात नाही. या पॉडकास्टमधून या गोष्टी सविस्तर उलगडून सांगितल्या आहेत. मला गुन्हेगारी विश्वाबद्दल आणि पोलिसांच्या शोधकार्याबद्दल माहिती जमा करायला नेहमी आवडते. त्यामुळे  गुन्हेगारी विषयावर आधारित चित्रपट, वेब मालिका, लेख आणि ‘कातिल अड्डा’सारखे पॉडकास्ट आवर्जून ऐकत असतो. या भागात एक पोलीस अधिकारी दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला कसा पकडतो हे उत्तम प्रकारे मांडलं आहे. मला एकंदरीतच हा पॉडकास्ट आणि त्यातील ‘पोलीस इन्स्पेक्टर’ हा भाग अधिक आवडतो.

– अजिंक्य शिगवण, विद्यार्थी

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Qaatil ada podcast on kuku fm based on crime zws