एक काळ असा होता की, मॉडेलिंग करणारी मुलगी म्हणजे वाया गेलेली असा समज होता. अनेक समज-गैरसमज प्रचलित असले तरीही अनेक मराठी तरुणींनी या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. एका फॅशन शोच्या निमित्ताने भेटलेल्या अलीसिया राऊत आणि अमृता पत्की या दोन मॉडेल्सनी त्यांचे अनुभव ‘व्हिवा’बरोबर शेअर केले. अलीसिया आहे एस्टॅब्लिश्ड मॉडेल पण त्याबरोबरच.. सिंगल मदरही. घटस्फोट घेतल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं बळ तिला मॉडेिलगच्या क्षेत्राने दिलं. तर दुसरी अमृता -एका सर्वसामान्य मराठी घरातली मुलगी केवळ आपल्या स्वप्नांचा माग काढत आंतरराष्ट्रीय स्तरावर सौंदर्यवती झाली. त्यांची कहाणी त्यांच्याच शब्दात.
करियरचा प्रवास
मी जेव्हा या क्षेत्रात पुनरागमन केलं तेव्हा मी एक आई होते. स्वत:च्या मुलाला सांभाळून मॉडेिलगसारख्या क्षेत्रात एक स्त्री खंबीरपणे स्वत:चे स्थान निर्माण करू शकते, हे मला सिद्ध करायचे होते. भारतीय स्त्रियांमध्ये असलेली ‘आई झालो म्हणजे आयुष्य संपलं’ ही संकल्पना पुसत ताठ मानेने जगण्याची संधी मला या क्षेत्राने दिली. २००७ मध्ये जेव्हा मी माझ्या करियरमध्ये पुनरागमन केलं तेव्हा मॉडेिलगसोबतच काही आयटम नंबर, मालिकांचं सूत्रसंचालन करण्यास सुरुवात केली होती. मॉडेिलगनं माझ्या आयुष्याला कलाटणी दिली.
घर आणि करियर यांमधील कसरत
मॉडेिलगच्या बिझी वेळापत्रकामुळे मी माझ्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अशावेळी माझे आईवडील त्याची संपूर्ण जबाबदारी उचलतात. परंतु जेव्हा कधी मला मोकळा वेळ मिळतो तेव्हा पार्टीजमध्ये जाण्यापेक्षा मी त्याच्याबरोबर वेळ घालवते. आपल्या कुटुंबाबरोबर छोटेछोटे आनंदाचे क्षण साजरे करण्याला मी नेहमीच प्राधान्य देते.
मॉडेलिंग क्षेत्रातील अनुभव
प्रत्येक क्षेत्रात काही चांगल्या काही वाईट गोष्टी असतात. मॉडेिलगचा आणि नशाबाजी, सेक्स अशा गोष्टींचा संबंध जोडला जातो, परंतु तुम्ही कोणत्या परिस्थितीत कसे वागता हे तुमच्यावर अवलंबून आहे. माझ्या आईवडिलांची मुलगी आणि एका मुलाची आई म्हणून माझ्यावर असलेल्या जबाबदारीचं भान मला आहे. आजही मी दारू पिणं, सिगारेट फुंकणं टाळते. म्हणून मला मान मिळत नाही असं नाही. मी केलेल्या कामामुळे माझ्या वाटणीचा मान मला मिळतोच.
हेल्थ इज वेल्थ
उत्तम फिगर ही मॉडेिलग क्षेत्राची गरज आहे. परंतु सडपातळ असणं आणि झीरो फिगर यात फरक आहे. मॉडेिलग करण्यासाठी तुम्ही झीरो फिगर असलाच पाहिजेत हा समज चुकीचा आहे. नसíगकरीत्या मी सडपातळ शरीरयष्टीची आहे. मी मूलत: विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतींची शौकीन आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या खाद्यपदार्थावर मनसोक्त ताव मारते, परंतु त्याचवेळी स्वत:च्या आरोग्याची काळजीसुद्धा तितकीच घेते.
मॉडेल म्हणून घडताना
मॉडेिलग करण्यासाठी कोणत्याही डिग्रीची गरज नसते. मॉडेिलगसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे तुमची उंची. त्याचबरोबर तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व कसं सादर करता याला महत्त्व दिलं जातं. तसंच मॉडेल म्हणून करियर निवडताना अनियमित कामाच्या वेळा आणि भरपूर मेहनत घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. या क्षेत्रात तुमच्या कामासाठी योग्य तो मोबदला तुम्हाला मिळतो, परंतु मॉडेल बनल्यास रातोरात श्रीमंत होऊ हा समज चुकीचा आहे.
शब्दांकन : मृणाल भगत
करियरची सुरुवात
मुंबईतल्या मध्यम वर्गात वाढलेली आणि मराठी माध्यमात शिकलेली कन्या थेट ‘मिस अर्थ’पर्यंतचा पल्ला गाठेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. माझ्यासारखी एक वजन वाढलेली मराठमोळी मुलगी जेव्हा एका कोरिओग्राफरच्या म्हणण्यावरून ट्रेिनग घेते आणि संधी मिळताच ‘मिस मुंबई’, ‘मिस इंडिया’, ‘मिस अर्थ’ अशा पायऱ्या चढत गेले तेव्हा कळलं, खरंच.. स्काय हॅज नो लिमिट! नंतर मागे वळून पाहणं झालंच नाही.
घर आणि करियर
आतापर्यंतच्या प्रवासात, यशात घरातील प्रत्येक व्यक्तीचा सुद्धा तेवढाच मोठा वाटा आहे. कोणत्याही क्षेत्रात गेलीस तरी स्वत:ची मूल्यं सोडू नकोस, असा संस्कार माझ्यावर लहानपणापासून झाला. अर्थात, आपली मुलगी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही क्षेत्रात वा कोणत्याही पदावर गेली तरी ती बिघडणार नाही, असा विश्वास पालकांच्या मनात टिकवून धरणं महत्त्वाचं होतं आणि मी तो मिळवला! त्यांचं मला सतत प्रोत्साहन मिळत राहिलं, जे खरंच खूप मोलाचं ठरलं.
ऑन द रॅम्प
आपलं कोणतंही क्षेत्र असो.. चांगल्या-वाईट अनुभवांची सोबत घेऊनच पुढे चालत राहतो. आपण धडपडतो.. पण स्वत:वर विश्वास ठेवून आपलं १०० टक्के द्यायचं आणि उंच भरारी घेण्यासाठी सुसज्ज व्हायचं. या प्रवासात चांगली माणसं भेटणं हे खरंच नशीब. नृत्य, कॅम्पेिनग (जाहिरात मोहीम) यांसारख्या अनेक ठिकाणी मी मनापासून काम केलं. त्यातला रॅम्प वॉक हा प्रकार तसा आव्हानात्मक असतो. त्या नेमलेल्या मोजक्या वेळात तुम्हाला एकदाही रिटेक मिळत नाही. यू हॅव टू लिव्ह इन दॅट मोमेंट.
फिटनेस
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. तुम्हाला सुंदर दिसायचंच असतं. पण तितकंच हेल्दीसुद्धा राहायचं असतं. शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
मॉडेलिंग क्षेत्रात येताना…
ग्लॅमर, फॅशन याबाबत आपल्याकडे खूप गरसमज आहेत. फॅशन विश्वाचं उभं केलं जाणारं चित्र सरसकट खरं नाही. त्यामुळे या सगळ्याचा बाऊ न करता त्याकडे आपण कला म्हणून पाहावं. मॉडिलग क्षेत्रात पाऊल टाकायचं झाल्यास स्वत:चा आत्मविश्वास वाढण्यास वाव द्यायची आवश्यकता असते. तुमची जिद्द तुम्हाला नक्कीच अफाट उंचीवर नेऊन सोडेल.
शब्दांकन : गार्गी गीध
छाया : गार्गी गीध