– राजेंद्र जाधव
स्त्रीचं अवास्तव चित्रण
‘व्हिवा’मधून आलेल्या माध्यमातल्या स्त्रीविषयीच्या लेखासंदर्भात माझं मत देत आहे. आजच्या जाहिराती आणि मालिकांमधली स्त्री वास्तवातल्या स्त्रीबरोबर रिलेट करताच येत नाही. जी स्त्री ती जाहिरात करते किंवा मालिकेत काम करते, तिच्या नाटय़मय प्रसंगांचा ठसा उमटतो पण तरीही जी मुलगी रोजच्या आयुष्यात स्ट्रगल करते तिचं कुठलंच प्रतिबिंब ह्य़ात दिसत नाही.
मालिकांमध्ये दाखवण्यात येणारी स्त्री तर नेहमीच मुळूमुळू रडणारी, सदसदविवेकबुद्धी गाठोडय़ात गुंडाळून ठेवलेली अशी दाखवतात. त्यामुळे समाजप्रबोधन तर दूरच उलट चुकीचाच संदेश समाजात जातो. खऱ्या आयुष्यात स्त्री अशी वागूच शकत नाही.
अनेक सुधारणा झाल्या असल्या तरी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन तसाच आहे. तो बदलत नाही, तोपर्यंत यात बदल होणार नाही. सध्या सुरू असणाऱ्या मराठी मालिकांमध्ये एका लग्नाची तिसरी गोष्ट ही मालिका त्या मानानं क्रांतीकारी वाटते. वेगळी वाटते. पण आता त्या लग्नाचीही वेगळी गोष्ट सांगायला हवी नाहीतर त्यातही पुन्हा तोचतोचपणा येईल.
– तृप्ती वैद्य
@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. viva.loksatta@gmail.com