कुठल्याही हॉटेलात जा.. मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.  

पनीर मशरूम शासलिक
साहित्य : पनीर क्युब्स – ८ ते १०, बटन मशरूम  – ७ ते ८,  ब्लॅक ऑलीव्ह – ५ ते ६, ग्रीन ऑलीव्ह – ५ ते ६, रंगीत सिमला मिरची – १ इंच कापलेले ५ ते ६ तुकडे, शासलिक स्टिक्स (बांबू स्टिक्स) – ५ ते ६,
मॅरीनेशनसाठी साहित्य : मोहरी पूड – १ चमचा, मीठ, बाब्रेक्यु सॉस – २ ते ३ चमचे, (बाब्रेक्यू सॉस नसेल तर टोमॅटो केचप वापरा) व्हाइट पेपर पावडर- चिमूटभर, तेल – ३ ते ४ चमचे, बारीक चिरलेली लसूण – १ टीस्पून, बारीक चिरलेली बेसील पाने – २ चमचे (असल्यास), वरील सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र मिक्स करून मॅरीनेशन तयार करून घ्या.
कृती : तयार मॅरीनेशनमध्ये पनीर व मशरूम, ऑलीव्ह, रंगीत सिमला मिरची, डीप करून बांबू स्टिक्सला एकामागोमाग एक लावून घ्या. नॉनस्टिक पॅनवर थोडंसं तेल टाकून या स्टिक्स ग्रिल करून घ्या. गरमागरम बाब्रेक्यू सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…

मोझरेला चीज िफगर्स
साहित्य : मोझरेला चीज िफगर साइजमध्ये कापून घेतलेले – १२ ते १५ पिसेस, अंडं – १,  मदा, काळी मिरी पावडर – चिमूटभर,  मीठ, ब्रेड क्रम्स, तेल – तळण्यासाठी, मिक्स हर्ब्स – १ चमचा, लसूण पेस्ट – २ चमचे
कॉकटेल सॉससाठी साहित्य : टोमॅटो केचप, मेयोनिज सॉस, सोबॅस्को सॉस – ५ ते ६ थेंब  
(सर्व एकत्र करून कॉकटेल सॉस तयार करा.)    
कृती :  कापलेल्या मोझरेलावर काळी मिरी पावडर, मिक्स लसणाची पेस्ट व १ टीस्पून मदा टाकून नीट मिक्स करून घ्या.  आता एका बाउलमध्ये १ अंडं, ३ ते ४ टीस्पून मदा आणि काळी मिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या.  मॅरीनेट केलेले मोझरेलाचे तुकडे  या अंडय़ाच्या मिश्रणात बुडवून घ्या आणि हलकेच काढून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या. नीट हाताने दाबून घ्या म्हणजे बेड क्रम्स सगळ्या बाजूंनी व्यवस्थित चिकटतील. आता गरम तेलात तळून क्रिस्पी मोझरेला चीज िफगर्स काढून घ्या आणि  कॉकटेल सॉससोबत गरमागरम सव्‍‌र्ह करा.

क्रिस्पी फ्राइड चिकन
साहित्य : बोनलेस चिकन – १ इंच कापून घेतलेले ८ पीस,  ब्रेड क्रम्स – १ वाटी, चिली फ्लेक्स
मॅरीनेशनसाठी साहित्य : मोहरी पूड – १ चमचे, ब्लॅक पेपर पावडर- चिमूटभर, मीठ – चवीनुसार, तेल – तळण्यासाठी, अंडं – १, मदा, चिली फ्लेक्स .
मॅरीनेशनचे सर्व साहित्य एका बाउलमध्ये एकत्र मिक्स करून त्यामध्ये चिकन घाला. कमीतकमी अर्धा ते एक तास ठेवून द्या.
कृती : चिकनचे तुकडे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या व हाताने दाबून घ्या. गरम तेलामध्ये मध्यम आचेवर तळून घ्या. हे क्रिस्पी फ्राइड चिकन गरमागरम आवडीच्या सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

फिश कोरीएंडल चिमी चुरी
(नाव ऐकून तुम्ही कदाचित म्हणाल हा काय प्रकार आहे. हा एक अर्जेटिनामधील प्रकार आहे. ओरिजनल रेसिपीमध्ये कोथिंबीरऐवजी पासल्रे (एक प्रकारची हिरवी भाजी) वापरली जाते.)
साहित्य : कुठलाही आवडीचा बोनलेस फिश  – १ इंच चौकोन कापलेले ८ ते १० पीस, मदा – २ टीस्पून, ब्रेड स्लाइस – २,
चिमी चुरी मसाल्यासाठी साहित्य : बारीक चिरलेले लसूण – २ टीस्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर , काळी मिरी पूड – ५ ते ६, ऑलीव्ह ऑइल – ३ ते ४ टीस्पून, मीठ – चवीनुसार, व्हिनेगर –
वरील मसाल्याचे साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करा.
सॅलेडसाठी साहित्य : आइस बग, रंगीत सिमला मिरची, अ‍ॅसपॅग्रस, लिंबाचा रस, व्हाइट पेपर पावडर, मीठ – चवीनुसार. (ज्या प्रमाणात सॅलेड बनवायचे त्या प्रमाणात क्वांटिटी घेणे.) वरील भाज्या चिरून एकत्र करून त्यामध्ये व्हाइट पेपर आणि चवीनुसार मीठ टाकून सॅलेड तयार करा.
कृती : फिशच्या तुकडय़ांवर थोडा मदा भुरभुरून घ्या. आणि सर्व मसाला एकत्र करून घ्या.  किमान १ ते १.३० तास लावून ठेवा (म्हणजे मसाला व्यवस्थित चिकटेल.) ब्रेडच्या कडा काढून घ्या आणि हाताने चोळून त्याचे क्रम्स तयार करून घ्या. आता हे फिश ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या. तव्यावर थोडे तेल टाकून श्ॉलो फ्राय करावे. सॅलेडसोबत सव्‍‌र्ह करा.
टीप : ब्रेड क्रम्स लावल्यामुळे मसाला जास्तीतजास्त चिकटण्यास मदत होते. आणि श्ॉलो फ्राय करताना रंगपण छान येतो.

Story img Loader