हाय!
तुमचा ओपन-अप कॉलम वाचल्यावर खूप छान वाटलं. तुम्ही इतक्या फ्रेंडली-वेने सोल्यूशन्स देता लोकांच्या प्रॉब्लेम्सना ते पाहून मलापण माझं कन्फ्यूजन शेअर करावंसं वाटलं. माझा प्रश्न करीअर आणि रिलेशन्सशी रिलेटेड आहे. मी ग्रॅज्युएशन आणि CWA करते आहे. मी खूपच सेन्सिटिव्ह आहे. मला माझ्या एका स्कूल फ्रेंडसाठी गेल्या तीन वर्षांपासून फीलिंग्ज आहेत. तो सीए करतोय. खूप सीरियस आणि शांत आहे. मुलींशी जास्त बोलत नाही. स्कूल संपल्यानंतर फेसबुकवर आम्ही खूप फ्रीली बोलायचो. त्यानं एकदा भेटायलासुद्धा बोलावलं. त्यानंतर त्यानं बोलणं खूप कमी केलं. मी त्याला माझी फीलिंग्ज एक्स्प्रेस केली तेव्हा तो म्हणाला की, Its better you concentrate on your career. आपण एकमेकांच्या आयुष्यात असू तर भेटूच. तो आता नॉर्मली बोलतो, मला माझ्या अभ्यासाबद्दल विचारतो; पण मला कळत नाही त्याला फीलिंग्ज आहेत की नाही माझ्यासाठी. मला त्याला विसरता येत नाही. या सगळ्यामुळे खूप कन्फ्यूजिंग फील होतंय. आय होप तुम्ही मला सोल्यूशन द्याल यासाठी.
– स्नेहल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रिय स्नेहल!
तुझं कन्फ्यूजन अगदीच समजण्यासारखं आहे. करीअर आणि प्रेमात पडणं या दोन्ही गोष्टी घडण्याचं वय एकच असल्यानं या जवळजवळ पॅरलल जाणाऱ्या गोष्टी आहेत. तुझ्या मित्राशी तू ऑलरेडी तुझ्या भावना शेअर केल्या असल्यामुळे आता त्याला भेटताना तुला दर वेळी थोडं ऑकवर्ड वाटत असेल.
तुमची एकमेकांशी खरी ओळख फेसबुकवर झाली, नाही का? फेसबुकवरची ओळख म्हणजे खरं तर ‘फेस-लेस’ ओळख. समोरासमोर न येता बोलणं, स्वत:ला एक्स्प्रेस करणं काही जणांना सोपं जातं. यंग जनरेशन तर या फेस-लेस कन्व्हर्सनशीच अधिक कम्फर्टेबल असते. समोरासमोर आलं की त्यांना गडबडून जायला होतं. अशा वेळी मग एक मुखवटा पांघरला जातो आणि त्यामागे खरा चेहरा लपवला जातो. काही तरी फॉर्मल बोलून वेळ मारून नेली जाते. तुझा मित्र तसा २ँ८ आहे म्हणतेस, म्हणजे त्याला तर हा इश्यू खूप जाणवत असेल. फेसबुकवर मनापासून बोलणारा तो हाच का, अशी शंका यावी इतका तो प्रत्यक्ष भेटीत वेगळा वाटत असेल.
फेसबुकवर बोलताना तुमच्या आवडी, तुमचे विचार जुळतात असं वाटलं म्हणून तुला तो आवडतो का? आता तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष बोलता, तेव्हाही तितक्याच मोकळेपणानं गप्पा मारता का? तुला त्याच्याशी लग्न करायची इच्छा असेल तर त्यासाठी कास्ट, घरची परिस्थिती इ.सारखे इतर काही बॅरियर्स आहेत का, की ज्यामुळे तो या विषयावर कमिट करायला बिचकतोय? तो जर तुझ्याच वयाचा असेल तर कदाचित त्याला आत्तापासून लग्नाचा वगैरे विचार फार प्रीमॅच्युअर वाटत असण्याची शक्यता आहे. लग्नाआधी मुलांकडून असणाऱ्या अपेक्षा जास्त असतात. तो वेल सेटल्ड असावा, त्याचं चांगलं इन्कम असावं, स्वत:चं घर, गाडी इ.इ. काही मुलांना याचं बर्डन येतं, नकोच ती जबाबदारी असं वाटतं. लग्नाबरोबर येणारी नवीन नाती, सण-समारंभ, बंधनं, मुलं हे सगळं स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते. मुलींना जितकी कमिटमेंटची, परमनंट रिलेशनशिपची गरज वाटते तितकी त्यांना वाटत नाही बहुधा. तू जेव्हा तुझी फीलिंग्ज त्याला सांगितलीस तेव्हा हे सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याच्या मनात ही इनहिबिशन्स आहेत का आणि असतील तर ती दूर कशी करता येतील याचा विचार करून बघ. लग्न या विषयावरचे त्याचे विचार काय आहेत हेही हळूच काढून घेता येईल तुला, पण ते करताना तुमचा संदर्भ न घेता इतर कुणाच्या तरी संदर्भात किंवा काल्पनिक सिच्युएशनविषयी बोल म्हणजे तुला त्याचे खरे विचार समजतील. याबाबतीत खूप घाई किंवा उतावळेपणा दाखवू नकोस, की ज्यामुळे तो दबून जाईल. त्याला मनाची तयारी करायला पुरेसा वेळ दे.
तू तुझी फीलिंग्ज सांगितल्यावरही तो तुझ्या संपर्कात आहे, तुझी चौकशी करतो म्हणजे त्याला तुझ्याविषयी हार्ड फीलिंग्ज नक्कीच नाहीत, पण त्याच्या चांगुलपणाचा तू चुकीचा अर्थ काढत नाहीयेस ना याचीही खात्री कर.
The person you are meant to be with will never have to be chased, begged or given an ultimatum. – Mandy Hale.

विचारा तर खरं…
तरुणपणात निसर्गनियमाप्रमाणे प्रेमात पडायला होतंच. अर्थात ओघानं प्रेमभंगही आलाच. नवीन नाती, नवीन अभ्यासक्रम, नवीन जॉब आणि त्यांमधल्या गुंतागुंती. शरीराविषयी शंका, निर्णयांविषयी शंका असं खूप काही मनात सुरू असतं. खरं तर शंका खूप जेन्युईन असते पण ऐकणारा काय म्हणेल, हसेल की काय असं वाटतं. कुणाला विचारावं हेही कळत नाही. तुम्हाला वाटतंय असं काही? मग हा कॉलम आहे खास तुमच्यासाठी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नांना वाट देण्यासाठी. इथे तुम्हाला वाटणाऱ्या शंकेला कुणी नाकं मुरडणार नाहीये की फालतू म्हणून त्या निकालात काढणार नाहीये. बिनधास्तपणे त्या शेअर करा. viva@expressindia.com या आयडीवर. सब्जेक्टलाईनमध्ये ओपन अप असं लिहायला विसरू नका.