व्हिवाच्या अंकात नव्या पिढीच्या रिलेशनशिपविषयी लिहून आलंय. खूप कमी वयात मुलं-मुली प्रेमात पडतात आणि खूप वर्षांनंतर लग्नाचा विचार करतात. पण यादरम्यान खूप गोष्टी घडतात.. रिलेशनशिपमध्ये अनेक चढ-उतारही येतात. काही वेळेला अंडरस्टँडिंग वाढते, तर काही वेळेला तुलना होते आणि वाद वाढून ते विकोपला जातात. जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हा खूप छान असतं सगळं, पण रिलेशन थोडं ग्रो होतं तेव्हा चुका दिसू लागतात. मग ते आकर्षण आहे की प्रेम, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी वाटू लागतं की, कोणी दुसरा योग्य आहे का आपल्यासाठी?
मला वाटतं, अशा वेळी त्या मुलीनं किंवा मुलाने आपल्या अपेक्षा तपासल्या पाहिजेत. आपल्या जोडीदाराने नेमकं काय केलंय ते लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. त्याच रिलेशनमध्ये राहून आपण इतरांचा विचार करतो आणि आपल्या पार्टनरला अंधारात ठेवण्याची चूक करतो. तुमच्या सुंदर रिलेशनशिपला त्यामुळे गालबोट लागू शकतं. दुसरा मार्ग असा की, अगदीच टोकाचे वाद होत असतील तर योग्य वेळी निर्णय घ्या आणि पुढे चला. कारण नंतर खंत व्यक्त करण्याचा काही फायदा नसतो. ज्या वेळी आपण योग्य निर्णय घेतो त्या वेळी आपण आपल्या जोडीदाराला त्याच्या गुण-दोषासहित स्वीकारायला पाहिजे. त्याच्या मताचा आदर केला पाहिजे. त्याच्याशी सगळं शेअर केलं पाहिजे. त्यामुळे कोणताही मनस्ताप ना होता आनंद मिळेल. जोडीदाराला समजून घेऊन वागलो तर सामंजस्याने सगळे वाद मिटतात. आपले विचार कधी चुकीच्या मार्गाने गेलेच आणि त्याचं रिअलायझेशन झालं तर चुकीची कबुली तातडीनं देऊन पुन्हा तशी चूक न करण्याचं आश्वासन जोडीदाराला द्यावं. हे खूप अवघड मुळीच नाही.
पल्लवी पाटणकर, जोगेश्वरी, मुंबई
@व्हिवा पोस्ट : व्हिवा पुरवणीतील सदरं कशी वाटतात, लेखातील विचार पटतात का, पुरवणी कशी वाटते, ते आम्हाला सांगा. त्याबरोबर या पुरवणीत आणखी काय वाचायला आवडेल तेही शेअर करा. आमच्या या मेल आयडीवर व्हिवा पोस्ट असं सब्जेक्ट लाइनमध्ये लिहून तुमच्या सजेशन्स पाठवा. viva.loksatta@gmail.com