मला वाटतं, अशा वेळी त्या मुलीनं किंवा मुलाने आपल्या अपेक्षा तपासल्या पाहिजेत. आपल्या जोडीदाराने नेमकं काय केलंय ते लक्षात घेऊन निर्णय घेतला पाहिजे. त्याच रिलेशनमध्ये राहून आपण इतरांचा विचार करतो आणि आपल्या पार्टनरला अंधारात ठेवण्याची चूक करतो. तुमच्या सुंदर रिलेशनशिपला त्यामुळे गालबोट लागू शकतं. दुसरा मार्ग असा की, अगदीच टोकाचे वाद होत असतील तर योग्य वेळी निर्णय घ्या आणि पुढे चला. कारण नंतर खंत व्यक्त करण्याचा काही फायदा नसतो. ज्या वेळी आपण योग्य निर्णय घेतो त्या वेळी आपण आपल्या जोडीदाराला त्याच्या गुण-दोषासहित स्वीकारायला पाहिजे. त्याच्या मताचा आदर केला पाहिजे. त्याच्याशी सगळं शेअर केलं पाहिजे. त्यामुळे कोणताही मनस्ताप ना होता आनंद मिळेल. जोडीदाराला समजून घेऊन वागलो तर सामंजस्याने सगळे वाद मिटतात. आपले विचार कधी चुकीच्या मार्गाने गेलेच आणि त्याचं रिअलायझेशन झालं तर चुकीची कबुली तातडीनं देऊन पुन्हा तशी चूक न करण्याचं आश्वासन जोडीदाराला द्यावं. हे खूप अवघड मुळीच नाही.
पल्लवी पाटणकर, जोगेश्वरी, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा