सिनेमातल्या फॅशनचा लगेच ट्रेण्ड बनतो; पण चंदेरी पडद्यावरचं हे स्टाइल स्टेटमेंट प्रत्यक्षात कसं मिरवावं यासाठी हा कॉलम.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जगभरातील कॉलेजमध्ये तीन प्रकारचे लोक नेहमीच पहायला मिळतील. एक कायम इस्त्रीचे कपडे, डोळ्यावर चष्मा मिरवणारे.. टापटीप, आटोपशीर पण नियमबद्ध. दुसरे लेटेस्ट ट्रेंड मिरविणारे फॅशनिस्ता.. अप टू डेट, बोल्ड आणि तिसरी जमात म्हणजे – जगभराचे फॅशनचे नियम धुडकवून स्वत:ची वेगळी ओळख तयार करणारे हिप्पी. सध्या चर्चेत असलेल्या कंगना रनौट आणि इम्रान खान यांच्या ‘कट्टी बट्टी’ चित्रपटातील कंगनाचा लुक या तिसऱ्या जमातीला जवळचा आहे. अर्थात पूर्वी हिप्पी म्हटलं की, अतरंगी कपडे, हातात सिगारेट, पिंजारलेले केस आणि रॉक संगीताच्या ठेक्यावर डोलणारे तरुण डोळ्यासमोर यायचे. त्यामुळे या लुकबद्दल काहीशी नाकं मुरडली जातात. पण आता चित्र बदललंय आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कंगनाचा हा लुक.

लूज शर्ट, टी-शर्ट्स, गंजी, प्रिंटेड स्कर्ट्स, चंकी ज्वेलरी आणि केसांना कर्ल्स अशा लुकमधली कंगना या सिनेमामध्ये पाहायला मिळते. तिच्या गोल चेहऱ्यावर येणारे फ्रिंजेस छान सूट झालेत. बाजूबंद, पैंजण अशा खास ठेवणीतल्या ज्वेलरीला या चित्रपटाच्या निमित्ताने नवीन लुक मिळालाय असं म्हणायला हरकत नाही.

कसा कॅरी कराल?

हिप्पी लुकसाठी मुळात तुम्ही क्रिएटिव्ह असणं महत्त्वाचं आहे. कारण कितीही शॉपिंग केलीत तरी तुम्ही स्टाइलिंग कसं करता याला जास्त महत्त्व आहे. तरीही बेसिक म्हणून लूज शर्ट, टीशर्टस, गंजीस, प्रिंटेड स्कर्ट्स, मॅक्सीज, ढगळ टय़ुनिक्स, स्कार्फस असले पाहिजेत. रंगांबद्दल कंजुषी अजिबात चालणार नाही. त्यामुळे प्रिंट्स, ब्राइट रंग तुमच्या ड्रेसमध्ये हवेच. अर्थात त्यांची योग्य सरमिसळ केली पाहिजे. नाहीतर लुक फसण्याची शक्यता असते. ज्वेलरी तुमच्या लुकचा महत्त्वाचा भाग असणार आहे. त्यामुळे चंकी ज्वेलरी हवीच. राजस्थानी स्टाइलची सिल्व्हर किंवा अँटिक ज्वेलरी असेल तर क्या बात.. तसंच नेहमीचे नेकलेस, कडे वापरण्यापेक्षा बाजूबंद, मांगटिका, कमरबंद अशी हटके ज्वेलरी नक्की वापरून पहा. घरच्याघरी दुपट्टा किंवा स्कार्फला गोंडे, लटकन लावल्यास त्याचा लुक अजूनच खुलेल. मोकळे केस किंवा मेस्सी पोनीटेलमध्ये या लुकची खरी मजा आहे. केसांमध्ये हायलाइट्स केलेत तर मस्तच..पण मेकअप मात्र कमी असू द्यात. तुमचे कपडे आणि ज्वेलरी यांमध्ये बरेच रंग असतील, त्यामुळे मेकअप बेताचा असेल तर उत्तम. न्यूड मेकअप या लुकला सूट होतो. आणि सोबत तुमचा योग्य अ‍ॅटीटय़ुड हवा..अँड देन यू विल रॉक!
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com