कारचा ब्रँड आणि सोशल स्टेटसचं गणित काही नवं नाही. ब्रिटिश साम्राज्यकाळापासून उच्चभ्रूंना महागडय़ा कार मोहात पाडत आल्या आहेत. आपल्याकडच्या अतिश्रीमंत राजा-महाराजांचे इम्पोर्टेड गाडय़ांसंदर्भातले अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी विशेष आहे तो रोल्स रॉइस गाडीचा किस्सा. ब्रिटिश बनावटीची ही स्टेटस कार अनेकांना हवी असायची. राजस्थानातल्या अल्वरचा राजा जयसिंह एकदा लंडनला गेला असताना साध्या वेशात फिरत होता. रोल्स रॉइसच्या कंपनीच्या शोरूममध्ये गाडय़ांची चौकशी करण्यासाठी गेला तेव्हा तिथल्या गोऱ्या कर्मचाऱ्यानं गरीब भारतीय समजून त्याला हटकलं आणि हाकलून दिलं.
राजानं मग हॉटेलमध्ये जाऊन आपल्या नोकरांकरवी सहा गाडय़ा घेण्याची इच्छा कंपनीकडे व्यक्त केली. तिथल्या तिथे पैसे मोजून वर गाडय़ा भारतात पाठवण्याची आगाऊ रक्कम भरून त्यानं शोरूममधल्या सगळ्या सहाच्या सहा नव्या गाडय़ा भारतात आणल्या. गाडय़ा अल्वरला पोहोचल्यावर या रोल्स रॉइसचा उपयोग शहरातला कचरा उचलण्यासाठी करण्याचे आदेश राजानं दिले. खरोखर या गाडय़ांतून कचरा ने-आण होऊ लागला आणि हा हा म्हणता ही बातमी जगभर पसरली. भारतात रोल्स रॉइसच्या गाडय़ा कचरा ने-आण करण्यासाठी वापरतात म्हणून कंपनीची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. युरोप-अमेरिकेतले प्रतिष्ठित लोक या गाडय़ा घेणं नाकारू लागले. या गाडय़ांची मागणी घटली. त्यामुळे व्यवसाय कमी झाला. शेवटी रोल्स रॉइस कंपनीने राजाला टेलिग्राम पाठवून माफी मागितली आणि कचरा व्यवस्थापनासाठी त्या गाडय़ांचा वापर करू नये, अशी विनंती केली. त्यासोबत ६ कोऱ्या गाडय़ाही देऊ केल्या. रोल्स रॉइसकंपनीकडून अपमानाचा बदला घेतल्यानंतर आणि त्यांची चूक लक्षात आलीये हे कळताच राजाने त्या गाडय़ांचा वापर थांबवला म्हणतात.
कचरा उचलणारी रोल्स रॉइस
कारचा ब्रँड आणि सोशल स्टेटसचं गणित काही नवं नाही. ब्रिटिश साम्राज्यकाळापासून उच्चभ्रूंना महागडय़ा कार मोहात पाडत आल्या आहेत. आपल्याकडच्या अतिश्रीमंत राजा-महाराजांचे इम्पोर्टेड गाडय़ांसंदर्भातले अनेक किस्से प्रसिद्ध आहेत.
First published on: 20-06-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rolls royce for transporting garbage