कुठलाही नव्या जमान्याचा हिट मराठी सिनेमा तिच्याशिवाय पुरा होऊच शकत नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. तिचा आत्मविश्वास, तिची स्टाइल, तिची फॅशन तरुणाईला भुरळ घालते. मराठी चित्रपटसृष्टीचा ग्लॅमर कोशंट वाढवणारी अभिनेत्री म्हणून नि:संशय जिचं नाव घेता येईल त्या
सई ताम्हणकरशी थेट गप्पा मारण्याची संधी ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाउंज’मधून मिळणार आहे. हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात मंगळवार दिनांक ३ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता होईल. प्रवेशिकांविषयी माहिती ‘लोकसत्ता’मधून लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

Story img Loader