इमामीचे व्हॅसोकेअर लिपकेअर
इमामीने हिवाळ्याच्या निमित्ताने चार वेगवेगळ्या सुगंधाचे व्हॅसोकेअर लिपकेअर बाजारात आणले आहेत. प्रगत अशा नव्या फॉर्मुल्यामुळे हा लिपकेअर नेहमीपेक्षा पाचपट जास्त प्रभावी आहे. त्यामुळेच तो ओठ थंडीने कोरडे पडण्यापासून वाचवतो. तसेच ओठांना तकाकी देतो. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा लिपकेअर अॅलोव्हिरा, चामोमाईल व तुळसीने युक्त असल्यामुळे सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे, तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये ज्यांचा आयुर्वेदिकचा आग्रह असतो अशा व्यक्तींसाठी ते फायदेशीर आहे. हे लिपकेअर स्टॉबेरी, क्लासिक, सिनफुल चॉकलेट आणि ऑरेंज अशा चार सुगंधात उपलब्ध आहे.
ख्रिसमस सुटय़ांसाठी फनस्कूलची खेळणी
फनस्कूलने ख्रिसमसच्या अनुषंगाने लहान मुलांसाठी खास खेळणी बाजारात आणली आहेत. मुलांची ख्रिसमस सुट्टी अधिक आनंददायी होण्यासाठी फनस्कूलची ही खेळणी उपयोगी पडतील, असे कंपनीचे म्हणणे आहे. मुख्यत: प्रिस्कूल गटातील मुलांसाठी ही खेळणी बनवण्यात आली आहेत. रुबिक्स रेस, नाईटिंग जेनी, सँड वंडर, मेटालाइझ्ड आर्ट, नट्स अॅण्ड बोल्ट्स अशी सुमारे दहा प्रकारची खेळणी व पझल्स उपलब्ध केली आहेत. लहान मुलांना रंग, आवाज आणि आकारांची ओळख होण्यासाठी याची मदत होईल, असा कंपनीचा दावा आहे.
हायपरसिटी ख्रिसमस स्पेशल
सण कुठलाही असो सणाचा आनंद द्विगुणित होतो तो म्हणजे खरेदीने. हायपरसिटीने ख्रिसमसचे निमित्त साधुन विविध ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये जेन्टस् आणि लेडीजवेअरवर जवळपास ५० टक्के सूट लागु करण्यात आलेली आहे. खास पार्टी सीझनला अनुसरून असलेल्या या कपडय़ांवर मिळणारी ही ५० टक्के सूट म्हणजे शॉपिंग करणाऱ्यांसाठी मेजवानीच आहे.
आला.. लाल बादशाह
जातीच्या खवय्याला जेवण नुसतं तिखट असून चालत नाही, तर ते खमंगही असावं लागतं. या खमंगपणासाठी तुम्ही तिखट आणि मसाले कोणते वापरता हे फार महत्त्वाचं असतं. मसाले आणि तिखटाचा मुद्दा आला की गृहिणींसमोर अनेक पर्याय असतात. त्यातलाच एक महत्त्वाचा पर्याय म्हणजे बादशाह मसाले. खमंग मसाल्यांच्या या बादशाहने आता लाल बादशाह हे नवीन उत्पादन बाजारात आणलं आहे. जेवणाची लज्जत वाढवणारं हे तिखट तयार करताना प्रत्येक मिरची काळजीपूर्वक निवडून, कोरडी करून घेतली गेली आहे आणि पुढच्या सगळ्या प्रक्रियाही काटेकोरपणे पार पाडण्यात आल्या आहेत असं कंपनीचं म्हणणं आहे. मुख्य म्हणजे या मिरच्या देठांशिवाय वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिखटाचा खमंगपणा अधिक वाढतो. लाल बादशाहचं हे गुपित तुमच्या जेवणाची लज्जत वाढवायला नक्कीच मदत करेल.
ताराचे ब्रायडल कलेक्शन
लग्न म्हटल्यावर सर्वात महत्त्वाची खरेदी असते ती म्हणजे ज्वेलरी. ताराने खास लग्नाचा सीझन साधून अॅंटिक ज्वेलरी बाजारात आणली आहे. यामध्ये हार्ट शेपची अंगठी, गळ्यातील वेगळ्या पद्धतीचा साज त्याचबरोबर अंगठ्यांमध्येही वैविध्य आहे. लग्नाला साजेशी अशी ही ज्वेलरी असल्यामुळे चारचौघात तुम्ही नक्कीच वेगळे दिसाल यात शंका नाही.