ब्लॉसम कोचर अरोमा मॅजिकने पाच वेगवेगळ्या प्रकारचे फेस वॉश बाजारात आणले आहेत. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी आणि सर्व वयोगटांसाठी ही रेंज उपयुक्त आहे, असा कंपनीचा दावा आहे. नवीन फेस वॉश हे पूर्णत: अरोमा थेरपीयुक्त असून अल्कोहोल, कृत्रिम सुगंध आणि रंगापासून मुक्त असल्याचा कंपनीचा दावा आहे, तसेच यामध्ये स्ट्रॉबेरी, लव्हेंडर, ग्रेपफ्रूट व नीमचा नसर्गिक अर्क वापरला आहे, असा कंपनीचा दावा आहे. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी स्ट्रॉबेरी, ट्री तेलकट त्वचेसाठी नीम आणि टी, कोरडय़ा त्वचेसाठी लव्हेंडर, सामान्य व तेलकट त्वचेसाठी ग्रेपफ्रूट, व्हाईट टी आणि चामोमिले फेस वॉश सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
मॅट्रिक्सचे डँड्रफ शॅम्पू
मॅट्रिक्सने बोईलागे स्काल्प थेरपीवर आधारित अँटी डँड्रफ शॅम्पू बाजारात आणला आहे. हे उत्पादन सलूनसाठी प्रोफेशनल अँटी डँड्रफ प्युरीफाइंग सव्र्हिस आणि घरी वापरासाठी अँटी डँड्रफ शॅम्पू अशा दोन प्रकारे उपलब्ध आहे. या अँटी डँड्रफ सोल्युशनमुळे केस आणि डोक्याला / मेंदूला ५ प्रकारचे फायदे मिळतात, असा कंपनीचा दावा आहे. प्रोफेशनल अँटी डँड्रफ प्युरीफाइंग सव्र्हिस ही फक्त मॅट्रिक्स सलूनमध्येच उपलब्ध आहे.
ताराचे पार्टीवेअर दागिने
पार्टीला जाताना नेमके कुठले दागिने घालावेत असा प्रश्न पडतो. परंतु आता मात्र या प्रश्नावर अगदी सोप्पे उत्तर आहे ते म्हणजे तारा ज्वेलर्सचे दागिने. खास पार्टीचा सीझन डोळ्यासमोर ठेवूनच ताराने हे पार्टीवेअर कलेक्शन आणले आहे. यामध्ये अंगठी, पेंडंट असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आता पार्टीवेअर दागिन्यांचा प्रश्न मिटला!