मनमोहक गिफ्ट
दिवाळी म्हणजे गिफ्टींगचा सीझन. या वेळी तुम्ही गिफ्ट किती छान रॅप करता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. खास दिवाळीच्या सीझनला अनुसरून मनमोहन मिठाई या शॉपने काही आकर्षक गिफ्ट पॅक आणले आहेत. यामध्ये विविध प्रकारची मिठाई असून ती आकर्षक अशा पॅकिंगमध्ये सजवलेली आहे.
कुछ तिखा हो जाए..
सणासुदीच्या काळात तिखट खायला कुणाला आवडेल का, या प्रश्नावर अनेकांचे उत्तर नाही असंच असेल. पण तुम्हाला हातात चॉकलेट आणून दिलं आणि ते तिखट आहे असं सांगितलं तर नक्कीच तुम्ही ते चॉकलेट टेस्ट करून बघाल की नाही! असंच एक तिखट चॉकलेट तुमच्या भेटीला आलेलं आहे. डिवीनिटीने आणलेली ही चॉकलेट्स या सणाचा आनंद नक्कीच वाढवतील अशीच आहेत. या चॉकलेटमध्ये मिरची, लसूण, दालचिनीचा स्वादही तुम्हाला अनुभवायला मिळेल. तेव्हा चला तर या सणाला कुछ तिखा हो जाए..
उडाणची कलाकुसर
कलाकुसर कुठलीही असो तिचं महत्त्व हे आगळंच असतं. अशीच खास आदिवासी महिलांनी उडाणच्या माध्यमातून नानाविध वस्तू साकारल्या आहेत. यामध्ये घराला बांधण्याचे तोरण, बटवा, देवाला घालायचे हार असे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतील. काहीतरी वेगळं हवं असेल तर उडाणच्या या वस्तूंना भेट द्यायलाच हवी.
फॉरएव्हर मार्कचे दिवाळी कलेक्शन
दिवाळीच्या सणाला थोडं महागाचं गिफ्ट द्यायचं असेल तर काहीतरी आठवणीत राहण्याजोगं दिलं तर अधिक उत्तम नाही का.. दिवाळसणाला अनुसरून फॉरएव्हरमार्कने डायमंड कलेक्शन आणलेलं आहे. नाजूक असं हे डायमंडचं कलेक्शन खास पार्टीवेअरला साजेसं आहे.
गजा गोल्डचे डायमण्ड कलेक्शन
गजाने दिवाळीसाठी बाजारात खास फेस्टिव्ह सिजन ज्वैलरी आणली आहे. यात जडायु वर्क केलेली ज्वैलरी आहे. त्याचबरोबर डायमण्ड नेकलेस, पेंडण्ट सुद्धा आहेत. तुमचा सणाचा आनंद वाढविण्यासाठी ‘गजा ज्वैलर्स’ ला नक्की भेट द्या.