अ‍ॅरोकेमचे रोल ऑन क्लब अत्तर
रतलाममधील अ‍ॅरोकेम इंटरनॅशनलने रोल ऑन क्लब नावाचे अत्तर (परफ्युम) नवीन पॅकमध्ये बाजारात विक्रीस आणले आहे. या अत्तराचा वैशिष्टय़पूर्ण रोझ, फ्लोरल, पाचोळी, जास्मिन आणि मस्क चा सुंगध आहे. तसेच हा सुगंध धुतल्यानंतरही कायम राहतो. यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण नसल्याने हे वापरण्यास हानिकारक नसल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये कॉन्सट्रेट परफ्युमचा वापर करण्यात आला आहे. हे उत्पादन पूजेसाठी वापरू शकता किंवा याचा उपयोग रूमफ्रेशनरसारखा घरात किंवा कारमध्ये देखील होऊ शकतो.

न्यू सफोला मसाला ओट्स
सफोलाने आता मसाला ओट्स बाजारात आणले आहेत. तीन चवदार स्वादांमध्ये उपलब्ध आहेत. तसेच त्यामध्ये भरपूर पोषक द्रव्ये आहेत जी दिवसभर आपणास उल्हसित ठेवण्यास पुरेशी ठरु शकतील. सफोला मसाला ओट्स हे ओट धान्य, मसाले आणि ख-या भाज्यांचे अद्वितीय मिश्रण आहे. जे पेपी टॉमॅटो, व्हेगी ट्विस्ट, आणि क्लासिक मसाला अशा विविध नव्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. एक वेळच्या वापरासाठी पुरतील अशा छोट्याछोट्या पाकिटांमध्ये उपलब्ध असलेले हे मसाला ओट्स पाणी टाकून तीन मिनिटे उकळताच खाण्यासाठी तयार होतील. सफोला मसाला ओट्स शंभर टक्के नसíगक ओट्सपासून तयार करण्यात आले आहेत.

Story img Loader