हायपरसिटीची बॅक टू स्कूल रेंज
शाळा सुरू झाली म्हटल्यावर नवीन दप्तर, वॉटरबॅग, कंपास बॉक्स अशा कित्येक गोष्टी हव्या असतात. हायपरसिटीने खास लहान मुलांना नजरेसमोर ठेवून काही नवीन डिझाइन्सच्या बॅंग्ज, वॉटबॅंग, टिफीन बॉक्स बाजारात दाखल केले आहेत. लहान मुलांना आवडतील अशी कार्टून कॅरेक्टर्स या बॅगेवर विराजमान झालेली आहेत. शाळा सुरू झाल्यावर मित्रांमध्ये मिरवण्यासाठी का होईना या वस्तूंशिवाय पर्याय नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बार्बी अवतरेल घरी
लहान मुलींच्या खेळण्यामधील आवडती व्यक्ती म्हणजे बार्बी. बार्बीमध्ये मुलींचा जीव हा खूप गुंतलेला असतो. बार्बीचा सेट घेणं म्हणजे आई वडिलांसाठी खास एक अभ्यासाचा विषय असतो. या सेटमध्ये अनेक नवनवीन वस्तू येत असतात. आता हे सर्व करण्यापेक्षा तुमच्याच मुलीला बार्बीसारखं सजवायला मिळालं तर मज्जाच येईल की नाही.. बार्बीचे सर्व ड्रेसेस आता काही ठराविक शो रुममध्ये उपलब्ध झाले आहेत. खास अमेरिकन  डिझाइनर्सने हे कपडे बनवले आहेत. ग्लोबस, लाइफस्टाइल, शॉपर्स स्टॉप, पॅन्टालून्स याठिकाणी बार्बीचे कलेक्शन उपलब्ध आहे.

अलुमा वॉलेट
वॉलेट हा आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट. वॉलेटमध्ये अनेक गोष्टी सामावल्या जाव्यात म्हणून आपण त्यात हव्या असलेल्या गोष्टी तर ठेवतोच. पण नको असलेल्याही अनेक गोष्टी त्यात ठेवत असतो. यामुळे वॉलेटचा आकार बदलतो. अलुमाने आणलेल्या या वॉलेटचा आकार तुमच्या गरजा डोळ्यासमोर ठेवूनच केल्या आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डस्, डेबिट कार्डस्, ओळखपत्र अशा अनेक गोष्टी ठेवता येतील. हे वॉलेट मुख्य म्हणजे वॉटरप्रुफ असल्याने पावसात भिजण्याची भिती नाही.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopping dot com
Show comments