पावसाळ्यात वाफाळत्या चहा मोठय़ा मगमध्ये पिण्यात एक वेगळीच मजा असते की नाही.. पण हे मग नेहमीच्या वापरातले नकोत. थोडी वेगळी डिझाइन आणि क्रिएटीव्हीटी वापरुन केलेल्या मगमध्ये पर्सनल फिलिंगही येईल असे मग हवेत. लेटरनोट या कंपनीने असेच युनिक मग डिझाइन केले आहेत. या मग्जमध्ये विविध डिझाइन्स आहेत. तुम्हाला हव्या तशा डिझाइन्स यावर तुम्ही करूनही घेऊ शकता. या मग्जची किंमत केवळ २४५ रुपये असल्याने आवडत्या व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन ठरु शकेल.
अव्हॉनची डय़ुअल एण्ड प्रॉडक्ट्स
अव्हॉनने लिक्विड आयलायनर, आयश्ॉडो, लिपस्टिक आणि लिपग्लॉसची नवी रेंज बाजारात आणली आहे. या रेंजचं वैशिष्टय़ म्हणजे एका एण्डला तुम्हाला आयशॅडो पाहायला मिळेल तर दुसऱ्या एण्डला आयलायनर दिसेल. याचप्रमाणे एका बाजूला लिपग्लॉस तर दुसऱ्या बाजूला लिपस्टिक असे कॉम्बिनेशन दिसून येईल. आयश्ॉडोमध्ये प्लम, ब्राऊन, ब्लू तर आयलायनरमध्ये रोझ, ग्रीन, सिल्वर या रंगाच्या विविध छटा पाहायला मिळतील. वाईन शाईन, ब्राऊन, ब्रिक रेड तर लिपग्लॉसमध्ये व्हायोलेट, चॉकलेट आणि पीच शाइन या रंगछटांची कमाल दिसेल. सो बी रेडी टू बी ब्युटीफूल
पिंपल्स चल हट..
उद्या त्याचा वाढदिवस म्हणून आज लवकर झोपताना लक्षात आलं की ईऽऽ आपल्या चेहऱ्यावर तर पिंपल्स आलेयत. ओ नो आता काय करायचं? असं होऊ नये म्हणूनच गार्नियरने प्युअर अॅक्टीव्ह ही तीन प्रॉडक्टसची रेंज आणली आहे. यामध्ये पिंपल रिलीफ रोल ऑन, ब्लॅकहेडस अपरूटींग स्क्रब आणि पोअर अनक्लॉगिंग वॉशचा समावेश आहे. रोल ऑन तुमच्या पिंपल्सचे डाग घालवून टाकायला मदत करेल. तर स्क्रब आणि अनक्लॉगिंग वॉश त्वचेतील छिद्र मोकळी करून त्यातील घाण बाहेर काढायला मदत करतील.