कडक उन्हाळा सुरू झाल्यावर आपल्या नेहमीच्या आऊटफिटमध्येही बदल होणं स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात काय खावं आणि काय खाऊ नये’ इथून ते ‘कोणते कपडे घालावेत, कोणते रंग उन्हाळ्यात वापरावेत या अशा अनेक प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्वचेसाठी कोणतं क्रीम लावावं इथपासून ते बॉडीलोशन कुठलं उत्तम या अनेक गोष्टींच्या शोधात आपण बाहेर पडतो. या सर्व गोष्टींची तयारी करणंही हे ऋतुबदलांचं स्वागत करणंच नाही का?
ऋतुबदलानंतर सर्वात महत्त्वाचा फरक पडतो तो म्हणजे आपल्या कपडय़ांमध्ये. एरवी आपण थंडी म्हटल्यावर थर्मल वेअरच्या कलेक्शनमध्ये स्वत:ला गुंडाळून घेतो. आता उन्हाळा म्हटल्यावर कॉटनच्या राज्यात डोकवायला हवंच. या कॉटनमयी रंगीबेरंगी दुनियेच्या बरोबरीने आपण थोडं स्टाइल स्टेटमेंटही जपण्याचा प्रयत्न करायला हवा. केवळ कॉटनचे तेच ते टॉप्स वापरण्यापेक्षा थोडय़ा वेगळ्या पद्धतीने आपण उन्हाळा साजरा करायला हरकत नाही.
उन्हाळ्यासाठी सुती कापडाचा वापर जास्त केला जातो त्यामुळे फॅशन स्ट्रीटवर, बांद्रय़ाच्या िलकिंग रोडवर सध्या सुती कपडय़ांची चलती दिसून येत आहे. उन्हाळ्याच्या गरम हवेमध्ये घाम त्याचबरोबर चिक-चिक या साऱ्यातून जरासं फ्रेश व्हायचं असेल तर वेगवेगळ्या रंगांचे कपडे वापरायला हरकत नाही. गुलाबी, निळे, पांढरे असे डोळ्यांना सुखद आणि ब्राइट फ्रेश रंगाचा वापर खूपच आरामदायी ठरतो. ब्राइट कलर्स इज ऑलवेज बेस्ट ऑप्शन फॉर समर.
सध्या फ्लोरल िपट्र्सचे टॉप्स मुली हल्ली वापरताना दिसत आहेत. या फ्लोरल प्रिंटबरोबरीने ट्रॅंगल आणि
उन्हाळ्यात खासकरून सिल्क तसेच घाम न शोषणाऱ्या कपडय़ांचा वापर टाळावा. जास्तीत जास्त सुती कपडय़ांवर भर द्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे टाळावेत. याचबरोबर हॉट पॅन्ट्सचा वापर पूर्णपणे टाळावा. जेणेकरून उन्हाळ्यामध्ये उन्हाचे तीव्र चटके लागणार नाहीत. बाहेर पडताना सुती ओवर कोट तसेच सुती स्कार्फ असल्यास बेस्ट..
उन्हापासून रक्षण होण्यासाठी पुण्यामध्ये हा ट्रेण्ड खूप वर्षांपासून आहे. सगळ्या ऋतूंपकी सगळ्यात जास्त कंटाळवाणा आणि नको असणारा उन्हाळा ऋतू खूप त्रासदायक असतो. याच काळात त्वचेची, आरोग्याची सगळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते. पण त्यातूनही मार्ग काढत, वेगवेगळ्या युक्त्या लढवत जो तो या उन्हाशी लढण्यासाठी प्रयत्न करत असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा