समर फ्रेश नावाचे पॅराशूटचे अॅडव्हान्स्ड बॉडी लोशन महिलांची सुंदर त्वचा सदा ताजीतवानी व निरोगी राखण्यास मदत करते. यामध्ये नारळाचा रस आणि पुदिनाचा नसíगक थंडावा यांचे मिश्रण असलेले हे लोशन आपली त्वचा टवटवीत आणि निरोगी राखण्यास समर्थ आहे. याशिवाय या लोशनमुळे आपल्या त्वचेस अल्टा व्हायलेट व ए अँड बी संरक्षणदेखील मिळणार आहे. तेव्हा उन्हाळ्यात गारवा अनुभवण्यासाठी या समर फ्रेश बॉडी लोशनला पर्समध्ये जागा द्यायलाच हवी.
पोलोराइडचे सनग्लासेस
उन्हाळ्यात खास डोळ्यांच्या संरक्षणासाठी म्हणून आपण गॉगल्स वापरतो. परंतु अनेकदा हा गॉगल चांगल्या कंपनीचा नसल्याने डोळ्यांना त्रास होतो. खास उन्हाळ्यातील किरणांपासून बचाव करण्यासाठी पोलोराइडने नवीन सनग्लासेस आणले आहेत. या गॉगल्समुळे उन्हापासून पुरेपूर संरक्षण होईल असा दावा कंपनीने केलेला आहे. विविध रंगात हे गॉगल्स उपलब्ध असून, तुमच्या आवडत्या वेस्टर्न आऊटफिटला अगदी साजेसे असेच आहेत.