व्यक्त होण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी आता इतकी सगळी माध्यमं हाताशी आहेत. पण व्यक्त होण्याचा एक कलात्मक मार्ग म्हणून सध्या तरुणाई लघुपटाच्या प्रेमात पडलीय. तरुणांकडून कधी नव्हे इतके लघुपट बनवले जाताहेत आणि ते बघितलेही जाताहेत. अगदी मित्र-मित्र जमवून, खटपटी करून ‘बजेटलेस’ लघुपट करण्याचा एक नवा ट्रेंड येतोय. काही तरुण चित्रपटनिर्मितीचा पहिला टप्पा म्हणून याकडे बघतात, तर काहीजण केवळ व्यक्त होण्याचं एक माध्यम म्हणून. यूटय़ूब आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून आता अशा हौशा-नवशांच्या फिल्म्सना ऑडियन्सही भेटतो. त्यावर त्वरित प्रतिक्रिया उमटतात. पण त्यातलेच काही हौशी कलाकार गंभीरपणे या माध्यमाकडे वळतात. अशाच तरुण, हौशी कलाकारांनी तयार केलेले तीन लघुपट अनुबंध या कार्यक्रमातून मुंबईत रवींद्र नाटय़ मंदिराच्या मिनी थिएटरमध्ये सोमवारी (९ डिसेंबर)संध्याकाळी सात वाजता दाखवण्यात येणार आहेत. हे तीनही लघुपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून निवडले गेलेले आहेत हे विशेष. लघुपटनिमिर्तीचा प्रवास, फेसबुक- ट्विटरचं काँट्रिब्युशन याबद्दल या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी ‘व्हिवा’बरोबर शेअर केलेल्या भावना..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिकणं आणि व्यक्त होणं हाच उद्देश
– मकरंद सावंत (दिग्दर्शक @ कबुतरखाना)
आंतरमहाविद्यालयीन स्पध्रेत काम करत असताना काही प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटय़संस्थांनी त्यांच्या नाटकात अभिनय करण्याची संधी मला दिली. या संस्थांमधील अनेक तरुण हे थिएटर अ‍ॅकॅडमी, मास कम्युनिकेशनमधील पदवीधर होते. त्यांच्या चर्चा कानावर पडत असत. शिवाय चित्रपट महोत्सवासाठी प्रेक्षक म्हणून जाणं, त्यांचे स्वत:चे काही प्रोजेक्ट्स यामध्ये त्यांनी मला नेहमीच सामावून घेतल्याने चित्रपटांविषयी आकर्षण आणि कुतूहल निर्माण झालं. पदवी परीक्षा दिल्यानंतर लगेचच चित्रपटासाठी साहाय्यक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. इतर काही चित्रपटांमध्ये अभिनयाला वाव मिळाला; त्यामुळे चित्रपटाचा मोठा कॅनव्हास जवळून अनुभवता आला. नाटकांमुळे दिग्दर्शनाची आवड होतीच, पण आता व्यक्त होण्यासाठी या नव्या माध्यमाचा विचार करणं आवडू लागलं; परंतु चित्रपटासारखं महागडं माध्यम शिकणं आणि प्रत्यक्षात आणणं आíथकदृष्टय़ा शक्य नव्हतं. साहाय्यक म्हणून, अभिनेता म्हणून काम करताना जे काही शिकलो त्याची चाचणी घेण्यासाठी लघुपट आणि माहितीपटांचा आधार घेण्याच ठरवलं. त्यानंतर काही मित्रांच्या मदतीने लघुपट बनवून पाहिले. चित्रपट माध्यम तांत्रिकदृष्टय़ा प्रचंड कठीण असल्याची जाणीव झाली. त्यानंतर काही व्यावसायिक संस्थांसाठी माहितीपट केले. त्यानंतर काही चित्रपट महोत्सवांमध्ये लघुपटासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याने ते आपल्या आवाक्यात असू शकेल असा विचार करून काही महोत्सवांमध्ये सहभागी होऊ लागलो. ‘मिफ’च्या ‘डायमेन्शन्सऑफ मुंबई’ या विभागात ३ वर्षे सातत्याने सहभागी झाल्यानंतर या वर्षीच्या महोत्सवात ‘@ कबुतरखाना’ या माझ्या लघुपटाची निवड झाली. मुंबईतील अनेक निनावी नात्यांचं प्रातिनिधिक चित्रण असणाऱ्या या लघुपटाला बऱ्याच ठिकाणी प्रदर्शनासाठी मागणी आली. यामध्ये शहरी शाळा, कॉलेजांत लघुपट दाखवण्याची संधी मिळाली. त्याबरोबरच रत्नागिरी, तुळजापूर, नगर यांसारख्या ग्रामीण भागांतही फिल्म पोहोचली हे विशेष! इतरांप्रमाणे आम्हालाही अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, परंतु येणाऱ्या अडचणींना सामोरं जायला शिकणं, हा लघुपट करण्यामागे माझा महत्त्वाचा उद्देश असतो.
आपल्या शैक्षणिक मर्यादांमध्ये नाटक, संगीत, लेखन, चित्रकला, खेळ अशा विषयांना प्रोत्साहन दिलं जातं;  परंतु चित्रपटनिर्मितीबाबत आवड निर्माण होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं प्रोत्साहन अथवा उपकरणांची उपलब्धता करून दिली जात नाही. अधिकाधिक संस्थांनी पुढाकार घेऊन विशेषत: शाळा-कॉलेजांमध्ये लघुपट प्रदíशत करावेत, जेणेकरून आपल्या आवाक्यातील या माध्यमाची ओळख विद्यार्थ्यांना होईल आणि फाळकेंच्या पुण्याईचा वापर करायला नवी पिढी धजेल.

हौसेखातर सर्वकाही!
– आशीष नाईक (दिग्दर्शक – ड्रीमवीवर)
लघुपटासाठी एक प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे आणि आता या माध्यमाचा प्रसार या वर्गाबाहेरही होत आहे. आम्हा तरुणांमध्ये लघुपट निर्माण करण्याची आणि बघण्याची रुची निर्माण होण्यामागे इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सचा वाटा मोठा आहे. कारण याच माध्यमातून लघुपट प्रेक्षकांपर्यंत पोचतात. आमच्यासारख्या अनेकांना लघुपट हे स्वत:चे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, समाजात मांडण्यासाठी लघुपट हे उत्तम माध्यम वाटतं. काही फिल्ममेकर्स याकडे एक आर्ट म्हणूनदेखील बघतात. लघुपटनिर्मितीतून तसं पाहायला गेलं तर फारसं अर्थार्जन होत नाही. त्यामुळे हौशी फिल्ममेकर्सचाच या लघुपटांकडे कल आहे.
माझ्या ‘ड्रीमवीवर’ या लघुपटाविषयी मला सुचलेली कल्पना माझ्यासारख्याच फिल्मवेडय़ा मित्रांना बोलून दाखवली. सच्चिदानंद, रोहित, रुपेश यांना ती आवडली आणि ऐकताक्षणीच त्यांनी त्यात काम करण्याची तयारी दाखवली. छायाचित्रणाची आवड असलेल्या रोहनने स्वत:च कुठूनसा एक डीएसएलआर कॅमेरा आणि आम्हाला काही ठरावीक शॉट्स घेण्यासाठी हवी असलेली लेन्स अक्षरश: दोन दिवसांसाठी मिळवली. आम्हाला भर रस्त्यात शूटिंग करायचं होतं. गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी आम्हाला हवे असलेले शॉट्स कसे घ्यायचे याची तयारी दोन दिवस आधीच त्या जागेवर जाऊन केली होती. काही शॉट्स लपूनछपून घ्यावे लागणार होते. माहीमची खाडी, रेल्वे ट्रॅक यांसारखे शॉट्स घेण्यासाठी आम्ही पहाटे साडेतीन, चार वाजताच उठून शॉट्स घेतले. फिल्म स्कूलचा विद्यार्थी असल्याने एडिटिंगचे अस्थेटिक्स माहिती होते. पण सॉफ्टवेअर वगरे या तांत्रिक गोष्टींवर ट्रायल अँड एरर पद्धतीनं पुढे ढकलत एडिटिंग पूर्ण केलं. डबिंग करायचं नाही, असं आधीच ठरवलेलं होतं. पण संवाद स्पष्ट ऐकू येत नव्हते. मग प्रदीप पांचाळ यांच्या मदतीनं एका बंद खोलीत रात्रीच्या सामसूम वेळी कलाकारांनी रात्रभर जागून डबिंग पूर्ण केलं आणि ‘ड्रीमवीवर’ पूर्ण झाला.

प्रगल्भ करणारी प्रक्रिया
– सिद्धेश सावंत (दिग्दर्शक – दहीहंडीसाठी वाटेल ते)
पत्रकारिता शिकत असतानाचा माझा संबंध डॉक्युमेन्टरीशी आला. डॉक्युमेन्टरीचा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट हा मी माझ्या कॉलेजसाठी केला होता. डॉक्युमेन्टरीकडे कमर्शिअली बघण्याचा माझा दृष्टिकोन कधीच नव्हता. मात्र हे क्षेत्र नकळतपणे भुरळ पाडत गेलं. डॉक्युमेन्टरीचे विविध प्रकार यांची ओळख नकळतपणे होत गेली. ठरवून वगरे डॉक्युमेन्टरी बनवण्याचा असा निर्णय नव्हता. अनेक विषय डोक्यात घोळत होते. शॉर्टफिल्मसारख्या (लघुपट) प्रभावी माध्यमाची ओळखही या कॉलेजच्या काळातच झाली.
सध्या मराठी तरुण खूप मोठय़ा प्रमाणात या क्षेत्राकडे आकर्षलेि जात आहेत. गेल्या वर्षभरात मराठी तरुणांचा या क्षेत्रातला वावर लक्षणीयरीत्या वाढलेला आहे. डॉक्युमेन्टरीज आणि शॉर्ट फिल्म बनवणाऱ्यांची संख्या जोमाने वाढतेय याचं श्रेय डिजिटल युगाला जातंय.
मोबाइल कॅमेऱ्यापासून ते प्रोफेशनल कॅमेरे वापरणाऱ्यांपर्यंत.. लघुपट तयार करणाऱ्यांची ही रेंज आहे. पण या सगळ्यांनीच या नव्या डिजिटल तंत्राला आपलंस करून घेतलंय. माहितीपट तयार करत असताना मिळणारा अनुभव खूप काही शिकवून जाणारा आहे. माहितीपटाच्या आधारे एखाद्या गोष्टीचं डॉक्युमेन्टेशन करण्याचा प्रयत्न तर असतोच, पण ते करत असताना विषयाचा सर्वागीण अभ्यास माणसाचं जगणं प्रगल्भ करत असतो, असे मी समजतो.
दहीहंडीवर माहितीपट करत असताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मात्र माहितीपट ज्या लोकांसाठी आपण करतो, त्यांच्यापर्यंत तो पोहोचवणाचं मुख्य आव्हान आताच्या पिढीसमोर आहे. यूटय़ूब आणि सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचता येत असलं तरी प्रेक्षकांपाशी अजूनही हे माध्यम तितक्या ताकदीनिशी पोहोचलेले नाही. अनुबंधच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणारा हा प्रयत्न तरुण फिल्ममेकर्सना नवी प्रेरणा देणारा आहे.

अमेरिकन ड्रीम्स
अमेरिकेत जन्मलेल्या आणि भारतात वाढलेल्या  मौक्तिक कुलकर्णीला बाईकवरून केलेल्या विश्वभ्रमंतीचे अनुभव, वेगवेगळ्या देशांची संस्कृती कॅमेराबद्ध करावीशी वाटली आणि त्यातूनच त्याची ‘रायडिंग ऑन ए सनबीम – जर्नी थ्रू टाईम,स्पेस,लाईफ अ‍ॅन्ड लव्ह’ही डॉक्युमेंट्री आकाराला येतेय. मौक्तिक सांगतो यात मुख्य अडचण येतेय ती पैशाची. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आणि न्यूरोसायंटिस्ट असलेल्या मौक्तिकला मानवी मनाचा शोध घेण्याची, निरनिराळ्या व्यक्ती समजून घेण्याची आवड आहे. त्यातूनच डॉक्युमेंट्री करण्याचा विचार आल्याचं तो सांगतो. ‘दक्षिण अमेरिकेत मी बाईकवरून भटकंती केली. सुमारे ५ हजार किलोमीटरच्या या यशस्वी भटकंतीनंतर गेल्या वर्षी मी विश्वभ्रमंतीवर गेलो. वर्षभरात ३६ देश पालथे घातले. आता भारतात परतल्यावर या भटकंतीत त्याला आलेले अनुभव, तेथे पाहिलेली संस्कृती, सामाजिक जीवन आणि आता भारतातील संस्कृती, समाजजीवन, रुढी-परंपरा, भारताची आर्थिक प्रगती, नीतीमूल्ये आणि महत्वाचं म्हणजे भारतीय जनमानसात राष्ट्रीय एकात्मतेची भावना कितपत रुजली आहे? आदी विषयांमधील परस्परविरोधी वैशिष्टय़े सांगणारी डॉक्युमेंटरी करतोय. प्रवासाची आवड असणाऱ्यांना ‘बॅगपॅकिंग स्टाईल’चा प्रवास कसा असतो, त्यातून कसा आनंद मिळतो हे डॉक्युमेन्टरीच्या माध्यमातून सांगण्याची माझी धडपड आहे. नॅशनल अ‍ॅवार्ड विनर बह्मानंद सिंग हे त्याचे दिग्दर्शन करणार आहेत. या संपूर्ण प्रॉजेक्टसाठी सुमारे २० ते २५ लाखांचा खर्च असून, त्यासाठी पैसा उभा करण्यासाठी कुणी व्यक्ती वा संस्थांकडून देणग्या वा अनुदान मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नात त्याला बऱ्यापैकी अडथळ्याची शर्यत पार करावी लागतेय. आतापर्यंत १०० तासांचे शुटिंग तयार आहे. पुढल्या वर्षी मे-जून पर्यंत ही डॉक्युमेन्टरी प्रदर्शित करण्याचं मानस आहे.’