‘सिलहाऊट्स २०१३ बॉलीवूड बाइट्स’ या बी. डी. सोमाणी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट अ‍ॅण्ड फॅशनने आयोजित केलेल्या वार्षकि फॅशन शोमध्ये रॅम्पवर कपडय़ांच्या अभिनव कलाकृती सादर करण्यात आल्या. या वेळी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेला बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराणाने ‘पानी दा रंग’ गायले आणि त्यावर नृत्यही केले.
या समारंभामध्ये विविध क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तिमत्त्वांनी आपली हजेरी लावली होती. मात्र प्रमुख आकर्षण होते ते प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिलेला बॉलीवूड अभिनेता आयुषमान खुराणा. त्याने विद्यार्थ्यांबरोबर ‘पानी दा रंग’ हे गाणे गायले आणि तो विद्यार्थ्यांबरोबर नाचलाही, पण त्याच वेळी ‘सिलहाऊट्स २०१३ बॉलीवूड बाइट्स’ या वार्षकि फॅशन शोमध्ये विद्यार्थी खऱ्या अर्थाने स्टार असतील याची काळजी त्याने घेतली. या फॅशन शोचे आयोजन बी. डी. सोमाणी इन्स्टिटय़ूट ऑफ आर्ट अ‍ॅण्ड फॅशनने केले होते. मुंबईत षण्मुखानंद सभागृहामध्ये हा धमाकेदार फॅशन शो नुकताच पार पडला.
आराधना सोमाणी यांनी येथे उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यात मेहेर कॅस्टेलिनो, अ‍ॅमी बिलिमोरिया आणि फरझाद बिलिमोरिया, बबिता मल्कानी आणि विनीत गांजावाला, तसेच युवा जादूगार शेल्डन यांचा समावेश होता. या सर्वानी फॅशन शोला हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांनी या फॅशन शोमध्ये ज्या अतुलनीय अशा फॅशन आणि कलाकृती सादर केल्या त्यांचे कौतुक केले.
कॅण्डाईस मारिया, सोनी अ‍ॅन्ना, दीप्ती सुरभी, लॉरा, श्वेता, सिपोरा, रीकी, अ‍ॅलेसिया, डायना, सांग्या, ज्युलिया, शीला, ओटीलिया सॅलोम आणि शोनल या मॉडेलनी फॅशन शोमध्ये बहार आणली. त्याचबरोबर टोनी, कबीर, प्रभा, गाझी, प्रदीप सुनील आणि गौरव या पुरुष मॉडेलनीही या फॅशन शोमध्ये सहभागी होत नावीन्यपूर्ण अशा कपडय़ांची रेंज लोकांसमोर आणली. ‘मदर अर्थ’या संकल्पनेवर कपडय़ांची ही रेंज बेतली होती.

Story img Loader