वैष्णवी वैद्य

ऋतू बदलतात त्या प्रमाणे आपल्याला आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक असते. सगळय़ात जास्त काळजी घ्यावी लागते ती म्हणजे आपल्या चेहऱ्याची. चेहऱ्याची त्वचा नाजूक असते, तसेच ती सगळय़ात जास्त धूळ, प्रदूषण, ऊन, हवा या सगळय़ाला ओपन असते. म्हणूनच चेहऱ्यावर वातावरणातील बदलाचा लगेच परिणाम होतो. थंडी, ऊन, पावसाळा या ऋतूबदलांप्रमाणे चेहरा सुंदर, ग्लोईंग आणि तजेलदार ठेवायचा असेल तर काही गोष्टी, काही टिप्स फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे.

Madhuri dixit shared glowing skincare hack for dull dry skin in winters know expert advice
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने सांगितलं त्वचेचं रहस्य! ‘या’ रेसिपीने चेहरा दिसेल चमकदार, कोरड्या त्वचेची समस्या दूर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
What To Eat To Beat Hormonal Acne? Experts Share Tips And Foods To Eat
चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, तर काय खावे आणि काय खाऊ नये? वाचा अन् पिंपल्स कायमचे दूर करा
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Milk or Curd face pack Ideas
Face Pack: दही की दूध? चेहऱ्याला लावताना बेसनाच्या पिठात नक्की काय मिसळावे? मग वाचा, ‘या’ टिप्स
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
plastic banned
खबरदार प्लास्टिकचा वापर कराल तर… कर्जत नगरपंचायतची धाडसी कारवाई…
Protect yourself from HMPV : How to choose the right mask
HMPV चा धोका टाळण्यासाठी अन् सुरक्षित राहण्यासाठी कोणता मास्क वापरावा, जाणून घ्या तुमच्यासाठी योग्य मास्क कोणता?

सनस्क्रीन- तुमचा बेस्ट फ्रेण्ड

उन्हाळय़ात जर त्वचा सुरक्षित ठेवायची असेल तर सनस्क्रीन तुमचं ब्रह्मास्त्र आहे. कोणत्याही ऋतूत बाहेर पडताना सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे, पण उन्हाळय़ात ते जास्त गरजेचं कारण त्याचा एक लेअर आपल्या चेहऱ्यावर, शरीरावर असला की सूर्याच्या प्रखर किरणांपासून आपली त्वचा सुरक्षित राहते. घराबाहेर पडायच्या  १५-२० मिनिटं आधी सनस्क्रीन लावलं तर ते तुमच्या शरीरात चांगलं मुरतं आणि तुमचा हेतू साध्य होतो. चांगल्या कंपनीचे आणि कमीत कमी ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीनच उपयोगी आहे हे लक्षात असू दे. तुमची चेहऱ्याची त्वचा कशी आहे (सेन्सिटिव्ह, ऑयली, ड्राय) त्याप्रमाणे सनस्क्रीन निवडावं.

आरामदायक कपडे वापरा (ब्रीदेबल फॅब्रिक)

भारताच्या कुठल्याही भागात, शहरात चिकटपणा आणि घाम या गोष्टी कॉमन आहेत. अशावेळी जर तुमच्या अंगावर सुटसुटीत कपडे असतील तर तुम्हाला कमीतकमी चिकटपणा जाणवेल. कॉटन अर्थातच सगळय़ावर रामबाण औषध आहे. दिसायला सुंदर, घालायला आणि वावरायला सुटसुटीत असे ट्रेण्डी कपडे कॉटनमध्ये आजकाल मिळतात. दिवसभरात जर बाहेर पडायचं असेल तर कॉटनचे किंवा तत्सम कापड जे अंगाला चिकटणार नाही असे कपडे परिधान करा.

हेवी मेकअप टाळा

तयार होण्याची, सुंदर दिसण्याची, मेकअप करण्याची हौस सगळय़ांनाच असते. मेकअपमध्ये आपण आपल्या ओरिजनल चेहऱ्यावर एक लेअर बसवतो. उन्हाळय़ात आपली त्वचा जास्तीत जास्त ऑइल सोडते. अशा वेळी जर तुमच्या चेहऱ्यावर लेअर असतील तर चेहऱ्यावरचे पोअर्स ब्लॉक होतात आणि त्याचा परिणाम म्हणजेच पिंपल्स, डाग, फोड इ. त्यामुळे उन्हाळय़ात हेवी मेकअप शक्यतो टाळावा किंवा मेकअप करणे गरजेचेच असेल तर तो नॅचरल ठेवावा. मेकअप प्रॉडक्ट्स जपून आणि योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे.

त्वचा हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा

हे तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यातूनच करू शकता. कितीही कॉस्मेटिक्स वापरले तरी आहारातून त्वचेला सगळय़ात जास्त पोषण मिळतं. चेहऱ्याचा ग्लो भरपूर पाणी पोटात गेल्याने वाढतो. तसेच सिट्रस फळे खाऊनसुद्धा तुमच्या शरीरातल्या पाण्याचा इन्टेक वाढतो. रात्री झोपताना चेहऱ्याला हायड्रेटिंग मास्क, मॉश्चरायझर वगैरे लावून झोपलात तर पुढचा दिवसभर चेहरा टवटवीत राहतो व त्याला पुरेसा ऑक्सिजनसुद्धा मिळतो. सतत चेहरा धूत राहिल्यानेसुद्धा उपयोग होतो. कमीतकमी दिवसात २ वेळा तरी चेहरा स्वच्छ धुणे गरजेचे आहे.

कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळा

उन्हाळय़ात एक गोष्ट मात्र आपण अतिशय सर्रास करतो आणि जी आपल्याला नकळत त्रासदायक असते ती म्हणजे कोल्ड ड्रिंक्स..! तहान लागल्यावर, उन्हात फिरल्यावर, खूप थकवा आल्यावर आपण कोल्ड ड्रिंक पितो ज्यात साखरेचे प्रमाण अतिउच्च असते. अर्धा लिटर कोल्डिड्रकच्या बाटलीत साधारण २०० ग्रॅम साखर असते. इतकी साखर आपल्या पोटात गेल्यावर आपले शरीर सहज डिहायड्रेट होते. तसेच वजनावरही याचा परिणाम होतो. उन्हाळय़ात कितीही तहान लागली तरी कोल्ड ड्रिंक्स पिऊ नका.

चांगला टोनर वापरा

तुम्ही जवळून पाहिलेत तर आपल्या चेहऱ्यावर छोटी छोटी रंध्रे असतात (pores) ती मोकळी होणं गरजेचं आहे. त्याच्यात जर धूळ साठून राहिली तर पिंपल्स आणि अ‍ॅक्ने येऊ शकतात. जर ओपन पोअर्स बंद नाही झाले तर त्वचेमधून अतिरिक्त तेल बाहेर पडत राहते ज्यामुळे त्वचा तेलकट होते आणि त्वचेची छिद्रे ब्लॉक होतात. टोनर हे फक्त मेकअप करतानाच वापरायचे असं काही नसतं. ते तुम्ही रोजच्या तयारीत सुद्धा वापरू शकता. टोनर आपल्या चेहऱ्यावरची रंध्रे बंद करण्याचं काम करतं जेणेकरून ते स्वच्छ राहतात. टोनर आतपर्यंत जातं त्यामुळे ते जर अ‍ॅलोवेरा, चंदन किंवा तत्सम थंड गोष्टींच्या बेसचे असेल तर फायदेशीर आहे.

आपल्या सगळय़ांचीच लाडकी मराठी युटूबर उर्मिला निंबाळकर सांगते, ‘सीटीएमएस हे रुटीन फॉलो झालंच पाहिजे. क्लीन्सिंग, टोनिंग, मॉश्चरायझर, सनस्क्रीन या चार गोष्टी चेहेरा सुरेख ठेवण्यासाठी फार गरजेच्या आहेत. आपण ट्रॉपिकल भागात राहत असल्याने घाम, चिकटपणा सगळीकडेच असतो. क्लीन्सिंगमुळे तुमचा चेहरा साफ राहतो व साठलेल्या घामामुळे, धुळीमुळे चेहऱ्यावर परिणाम होत नाही. चेहऱ्यासाठी फेसवॉश वापरताना सगळय़ांनीच थोडा स्ट्राँग किव्हा पिंपलप्रोन स्किनसाठी जे फेसवॉश वापरले जातात ते वापरले तरी काही हरकत नाही. याचं कारण ज्यांची ड्राय स्किन असते त्यांनासुद्धा उन्हाळय़ात ब्रेकआउट्सचा त्रास होऊ शकतो. क्लीन्सिंग किंवा मॉश्चरायझर हे कुठल्याही ऋतूत फॉलो करायला हवं फक्त त्याचं प्रमाण ऋतूप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता’. 

चेहऱ्यासाठी सोप्पे आणि घरगुती फेसपॅक

कोरफडीचा गर (अ‍ॅलोवेरा) : हे निसर्गाने आपल्याला दिलेलं रेडिमेड मॉश्चराईझर आहे. रात्री झोपताना, घरी असताना किंवा दिवसातून कधीही तुम्ही चेहऱ्यावर लावून ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील धूळ आणि तेलकटपणा कमी होतोच, शिवाय त्वचा मऊ देखील होते. आठवडय़ातून एकदा तरी चेहऱ्यावर कोरफडीचा गर लावा. चेहऱ्यावर त्याचा फेसपॅक लावून वीस मिनिटांनी चेहरा थंड अथवा कोमट पाण्याने धुऊन टाका.

बेसन, हळद, २ थेंब लिंबाचा रस, दूध- हा उर्मिलाने सांगितलेला सोप्पा फेसपॅक आहे. हे सगळे जिन्नस एकत्र करून मऊ लुसलुशीत करून घ्या. बेसन ऐवजी तुम्ही इतर कुठलंही पीठ वापरू शकता. पीठ अगदी पावडर फॉर्ममध्ये असायला हवं, भरडा नको याची काळजी घ्यावी. चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि पूर्ण कोरडे होऊ न देता, थोडे वाळल्यावर छान गार पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही आठवडय़ातून २ वेळा लावू शकता. हा टॅन घालवण्यासाठी उपयोगी आहे.

कॉफी स्क्रब

आपली साधी कॉफी पावडर घ्या व त्यामध्ये अगदी २-३ थेंब मध घाला जेणेकरून ते चांगले एकजीव होईल. ते तुम्ही हातांवर, चेहऱ्यावर लावू शकता. फक्त हे लावताना अतिशय काळजी घ्यायची ती म्हणजे ज्यांची स्कीन अति नाजूक आहे त्यांनी जास्त घासून लावू नये जेणेकरून रेडनेस येईल. कुठल्याही प्रकारचे स्क्रब केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन नाहीशी होते व टॅन जाण्यासाठी सुद्धा मदत होते.

पपईचा गर : पपईचा उपाय ऐकून घाबरू नका. हे फळ उन्हाळय़ात शरीराला उष्ण असते, परंतु याच्या गराचा फेसपॅक म्हणून अतिशय चांगला उपयोग आहे. पपईचा गर छान मऊ लुसलुशीत करून घ्या व त्यात चिमूटभर मध मिसळा. हा पॅक १५-२० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. यामुळे तुमची त्वचा फ्रेश व नितळ दिसू लागेल.

चंदन पावडर आणि रोज पावडर फेसपॅक या दोन्ही गोष्टी चेहऱ्याच्या त्वचेसाठी बेस्ट आहेत. अनेक पार्लर्समध्येही याचे क्लीनअप्स आणि फेशिअल्स असतात. चंदन पावडर आणि गुलाबाच्या पाकळय़ांची पावडर मिक्स करून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळू शकतो. यासाठी या दोन पावडर समप्रमाणात घ्या आणि त्यात मध टाकून एक पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका. टोमॅटो अर्धा कापून चेहऱ्याला लावणं हा उत्कृष्ट स्क्रब आहे ज्याने त्वचा पूर्ण क्लीन होते, असं उर्मिलानेही सांगितलं.

बदलापूरची मेकअप आर्टिस्ट सुप्रिया लक्ष्मण गजरे सांगते, ‘दूध हे अत्यंत उत्तम असे क्लीिन्सग आहे. बाहेर जे मिळतं तेसुद्धा क्लििन्सग मिल्कच असतं. रात्री झोपण्यापूर्वी कच्चं दूध चेहऱ्याला लावून मग कापसाने पुसून टाकलं की चेहरा फ्रेश होतो. तसंच रात्रीची झोप मिळाल्यावर सकाळी चेहऱ्याला छान ग्लो येतो. उन्हाळय़ात जास्तीत जास्त थंड गोष्टी आहारात ठेवाव्यात. फळं, पालेभाज्या, ग्रीन टी याने तुमची स्किन हायड्रेट राहते. तसंच उन्हाळय़ात आपण जास्त पावडरचा वापर करतो. त्यामुळे साधी पावडर चेहऱ्याला लावली तरीही नंतर चेहरा धुणं फार गरजेचं आहे. घरगूती उपाय हे फायदेशीर आहेतच, पण महिन्यातून एकदा क्लीनअप, फेशिअल या गोष्टी सुद्धा चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळण्यासाठी गरजेच्या असतात’.

हे सगळे उपाय फक्त महिला किंवा मुलींसाठी नसून वेगवेगळय़ा प्रमाणात मुलांना देखील लागू होतात. फक्त चेहरा नाही तर संपूर्ण शरीराच्या त्वचेची काळजी घेणं गरजेचं आहे. एकंदर तरुणांशी आणि या तज्ज्ञांशी बोलून लक्षात आलं की सनस्क्रीनला उन्हाळय़ात पर्याय नाही. संपूर्ण शरीराची त्वचा सुदृढ ठेवण्यासाठी घरगुती आणि ब्युटी टेक्निक यांचा योग्य तो मेळ घालून काळजी घेणं गरजेचं आहे.

viva@expressindia.com

Story img Loader