रेस्टॉरण्टमध्ये मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्यालाही असे पदार्थ जमतील का असं अनेकदा वाटतं. खास तुमच्यासाठी घरबसल्या चटपटीत मेन्यू कार्ड आम्ही घेऊन आलोय. या भागात आपण भाज्यांपासून तयार होणारे काही स्टार्टरचे प्रकार बघूया..

चीज मेथी पकोडे
साहित्य : बारीक चिरलेली समुद्र मेथी १ वाटी, चीज क्यूबचे सम आकाराचे तुकडे ९ नग, चण्याच्या डाळीचे पीठ १ वाटी, इनो १ चमचा, मीठ चवीनुसार, लसूण, हिरवी मिरची, कोिथबीर पेस्ट ३ चमचे, चाट मसाला अर्धा चमचा
कृती : सर्वप्रथम चण्याच्या डाळीच्या पिठात हिरवी चटणी, मीठ, चाट मसाला व मेथी घाला. थोडय़ा पाण्याने मिश्रण घट्टसर भिजवा. सर्वात शेवटी यात इनो घालून मिश्रण चांगले फेटून त्यामध्ये चीजचे तुकडे घाला. एक-एक चीजचा तुकडा घालून डीप फ्राय करा.

ओनियन िरग
साहित्य : मोठे कांदे २ नग, ताक १ वाटी, चण्याच्या डाळीचे पीठ १ वाटी, आरारोट किंवा कॉर्नस्टार्च २ चमचे, मीठ चवीनुसार, हळद, तिखट चवीनुसार,
चाट मसाला १ चमचा
कृती : कांदा सोलून त्याच्या मोठय़ा स्लाइस कापा. ताकामध्ये मीठ मिसळून त्यामध्ये त्या अर्धा तास बुडवून ठेवा. अध्र्या तासानंतर गोलाकार चकती मोकळी करून घ्या म्हणजे त्याच्या िरग तयार होतील. चण्याच्या डाळीच्या पिठात मीठ, कॉर्नस्टार्च/आरारोट, हळद, तिखट घालून मिश्रण घट्टसर भिजवून घ्या. नंतर त्यात ताकात बुडवलेली कांद्याची एक-एक चकती बुडवून डीप फ्राय करा. हिरवी मिरची व चटणीबरोबर खायला द्या.

पालक पनीर रोल
पालक पनीर म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पालक पनीरची भाजीच येते, पण आज येथे आपण पालक आणि पनीर वापरून तयार केलेला एक स्नॅक्सचा प्रकार पाहणार आहोत ज्यामधे आपल्याला ब्रेडसुद्धा बनवायचा आहे.
साहित्य : पालक पेस्ट ५ वाटय़ा, मदा २ वाटय़ा, व्हेजीटेबल ऑइल १ चमचा, मीठ ५ ग्रॅम, यीस्ट १० ग्रॅम, मध ४ चमचे, बटर २ चमचे, तीळ १ चमचा, पनीर किसलेलं १ वाटी, मेयॉनीज अर्धी वाटी, मोझेरेला चीज पाव वाटी, प्रोसेस्ड चीज पाव वाटी, मिक्स हर्ब्स १ चमचा
कृती : पालकाच्या पेस्टमध्ये यीस्ट, कणीक, मीठ, मध घालून चांगले मळून घ्या. आवश्यकता असल्यास थोडे पाणी घाला. सर्वात शेवटी बटर घालून असा गोळा ब्रेड बनविण्याच्या भांडय़ात ठेवून एक तास फुलायला ठेवा. नंतर यावर तीळ घालून १८०  डिग्रीवर २५ मिनिटे बेक करा. ब्रेड तयार झाल्यावर त्याच्या आडव्या लांब-लांब स्लाइस कापा. बारीक चिरलेल्या पालकात थोडेसे मीठ, िलबू, साखर, आलं-लसूण पेस्ट मिसळून पसरवा. त्यावर किसलेले पनीर घालून वर मिक्स हर्बस घाला. नंतर ब्रेडवर घाला. याचा रोल तयार करून अर्धा इंच जाडीच्या गोल-गोल चकत्या कापून त्यावर मोझेरोला व प्रोसेस चीज एकत्र करून घाला. प्रीहीट २०० डीग्री ओव्हनवर चीज मेल्ट होईस्तोवर बेक करून सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

पुडाची वडी (वैदर्भीय)
पुडाच्या वडीच्या आवरणासाठी

साहित्य : बेसन १ वाटी, मदा २ चमचे, आरारोट किंवा कॉर्नस्टार्च २ चमचे, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार
कृती : सर्व जिन्नस एकत्र करून त्यात थोडे पाणी घालून १ चमचा तेल घालावे व गोळा मळून ठेवावा.
मसाल्याकरिता साहित्य : तेल २ चमचे, आलं-लसूण पेस्ट १-१ चमचा, हळद पाव चमचा, तिखट चवीनुसार, जिरे पावडर १ चमचा, गरम मसाला १ चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, साखर चवीनुसार, भाजलेली खसखस १ चमचा, दाण्याचे कूट ४ चमचे, खोबरा कीस अर्धी वाटी, बारीक चिरलेली कोिथबीर अर्धा किलो, बेदाणे २ चमचे, किसमीस ४ चमचे
कृती : दोन चमचे तेलात आलं-लसूण पेस्ट घालून त्यात हळद, तिखट, जिरे पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, चवीनुसार साखर घालावी. नंतर त्यात दाण्याचे कूट, १ चमचा भाजलेली खसखस व बेदाणे घालावे. त्यानंतर खोबरा कीस घालून थोडेसे परतून थंड झाल्यावर हा मसाला अर्धा किलो बारीक चिरलेल्या कोिथबिरीमध्ये घालावा. नंतर बेसनाच्या गोळ्याची पोळी लाटून त्यावर आमचूर व गरम मसाल्याचे पातळ मिश्रण बनवून पसरवा. नंतर त्यावर तयार केलेला कोिथबीरचा मसाला पसरवून पोळीच्या कडा दोन्ही बाजूंनी पाण्याचे साहाय्याने बंद करा. मंद आचेवर डीप फ्राय करून सव्‍‌र्ह करा.

पालकाचा चिवडा
साहित्य : पालक अर्धा किलो, आमचूर पावडर अर्धा चमचा, तिखट अर्धा चमचा, साखर पाव चमचा, मीठ पाव चमचा, तेल तळायला, कॉर्नस्टार्च १ वाटी, बेसन १ वाटी, आलं-लसूण पेस्ट २ चमचे, धने-जिरे पावडर १ चमचा, तीळ ४ चमचे, बदामाचे काप पाव वाटी, किसमीस ४ चमचे, कढीपत्ता
कृती : पालकाची पाने तोडून घ्या. त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट, तिखट, कढीपत्ता, हळद व मीठ घालून १० मिनिटे ठेवा. कॉर्नस्टार्च व बेसन एकत्र करून त्यामध्ये ही ओलसर पाने घोळवून मंद आचेवर तळा. त्यानंतर धने-जिरे, आमचूर पावडर एकत्र करून मिक्सरमधे बारीक करून या पानांमध्ये घाला. वरून बदामाचे काप, किसमीस व तीळ घालून खायला द्या.