दागिन्यांचा समावेश अॅक्सेसरीजमध्ये व्हायला लागला आणि त्याला खऱ्या अर्थानं वेगळेपण आलं. सध्या दागिने घालायच्या जागाही बदलल्या आहेत. असेच काही हटके ज्वेलरी ट्रेंड्स देत आहोत.इअर कफ्स, मिडी रिंग आणि टियारा किंवा हेडबॅण्ड या टॉप थ्री ज्वेलरी ट्रेंडविषयी..
सध्या जरा वेगळ्या पद्धतीचे दागिने.. खरं तर अॅक्सेसरीज घालण्याचा ट्रेंड आहे. जगभर या हटके ज्वेलरीतले तीन ट्रेंड्स सध्या दिसताहेत. कानातले डूल, कुडय़ा, खडे हे नेहमीचे झाले. आता ट्रेंड आहे अख्खा कान सजवण्याचा. इअर कफ्स हा असाच कानभर घालण्याचा दागिना सध्या जगभर ट्रेंडमध्ये आहे. टियारा याचा शब्दश: अर्थ मुकुट, पण हे टियाराच्या आकाराच्या हेड अॅक्सेसरीज, हेडबँड्स सध्या फॅशनमध्ये आहेत. अंगठी बोटाच्या पहिल्या पेरापर्यंतच घालायची फॅशन आली आहे. या अंगठीला मिडी रिंग म्हणतात.
इअर कफ्सचा जलवा
इअर कफ हा अलंकार कानाच्या पाळीला आभूषित करण्यासाठी तयार केला आहे. ज्यासाठी तुम्हाला अतिरिक्त कान टोचायची गरज नाही. हा अलंकार कानाच्या आकाराप्रमाणेच घडवला जातो. इअर कफ वेगवेगळ्या आकार आणि प्रकारांत आपल्याला बघायला मिळतात. फुलं, पानांचे आकार तर यात असतातच, पण त्याबरोबरच Love, Forever, Pretty, Friend अशा शब्दांचेसुद्धा कफ्स बाजारात उपलब्ध आहेत. ही फॅशन तरुणाईमध्ये हॉट फेव्हरिट आहे. एवढेच नाही तर या इअर कफने हॉलीवूड आणि बॉलीवूडच्या नटय़ांना भुरळ पाडलीये. आपल्याकडे प्रियांका चोप्रा, दिपीका पदुकोण, विद्या बालन या आघाडीच्या अभिनेत्री विविध सोहळ्यांमध्ये इअर कफ्स मिरवताना बघायला मिळतात. इअर कफ्स साधारणत सोनं किंवा चांदीत बनवले जात असत. परंतु ते प्रत्येकाच्या खिशाला परवडणं शक्य नसल्याने आता ते टिटॅनिअम, तांबे अशा धातूंमध्येसुद्धा बनवतात. ट्रेंडी आणि एथनिक अशा दोन्ही लुक्ससाठी हा पर्याय उत्तम आहे. शक्यतो एकाच कानात इअर कफ आणि दुसरा कानात छोटा स्टड असा भन्नाट कॉम्बो तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. आम्रपाली ज्वेलर्ससारख्या ब्रँडेड ज्वेलरनी इअर कफ्सची रेंज बघायला मिळते. पण अर्थातच याच्या किमती किमान काही हजारांच्या घरातच असतात. मुंबईत कुलाबा कॉजवे, अंधेरी इथे १०० रुपयांपासून इअर कफ्स मिळतात.
मिडी रिंग
टियारा
लूक टिप्स
* पार्टीला जायचय आणि फंकी तरी क्लासी लूक हवाय तर तुम्ही कॉपर बेस्ड किंवा हँगींग कफ्स ट्राय करायला हरकत नाही.
* लग्नसराईत चारचौघात उठून दिसायला कोणाला आवडत नाही? तर त्यासाठी ट्रेडिशनल म्हणजेच स्टडेड इअर कफ्स हा हा बेस्ट ऑप्शन आहे.
* इअर कफ्स वापरताना ते कोणत्याही एकाच कानात घालावेत. दुसरा कान रिकामा वाटत असेल तर त्यात एक छोटासा स्टड क्लासी दिसेल.
* कफ्स वापरताना वन साईड हेअरस्टाईल किंवा हाय पोनीटेलचा प्रयोग करून बघू शकता.
* मोकळे केस त्रासदायक ठरू शकतात कारण कफ्स मधे ते अडकून खेचले जाऊ शकतात.
* स्टडेड टियारा हेडबँड आणि इअर कफ्स हे मस्त कॉम्बिनेशन ठरेल. पण हे कॉम्बिनेशन फंक्शनल वेअर म्हणूनच वापरा.
* हेड बॅण्ड किंवा टियारा वापरायचा असेल तर तो हेअर स्टाईलला सूट होणारा असावा. हेअरस्टाईल फार गुंतागुंतीची नसावी. साधीच असावी. टियारा किंवा स्टडेड हेड बँड एखाद्या सण-समारंभप्रसंगीच वापरायला चांगले वाटतात.
* मिडी रिंगची फॅशन आणखी खुलवण्यासाठी छोटय़ा अंगठय़ा असतील तर किमान दोन बोटात तरी त्या घाला.